AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Plastics Action : प्लास्टिक वापरताय सावधान! नागपुरात 1 जुलैपासून मनपाची धडक कारवाई

प्रतिबंधित सर्व प्रकारच्या प्लास्टिकचा वापर हा पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत घातक आहे. प्रतिबंधित प्लास्टिक संदर्भात येत्या 1 जुलैपासून नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकामार्फत बाजारपेठ, दुकाने, आस्थापनांमध्ये तपासणीची धडक मोहीम राबविण्यात येणार आहे.

Plastics Action : प्लास्टिक वापरताय सावधान! नागपुरात 1 जुलैपासून मनपाची धडक कारवाई
नागपुरात 1 जुलैपासून धडक कारवाई
| Edited By: | Updated on: Jun 30, 2022 | 10:13 PM
Share

नागपूर : प्रतिबंधित प्लास्टिक संदर्भात नागपूर शहरात शुक्रवार 1 जुलैपासून कारवाई करण्यात येणार आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकामार्फत ही कारवाई होईल. सिंगल यूज प्लास्टिक साहित्याची निर्मिती करण्यावर प्रतिबंध आहे. आयात, साठवणूक, वितरण, विक्री आणि वापर यावर 1 जुलै 2022 पासून पूर्णपणे प्रतिबंध आहे. केंद्रीय पर्यावरण (Environment), वने व वातावरण बदल मंत्रालयाने 12 ऑगस्ट 2021 रोजी यासंदर्भात अधिसूचना जारी केली. त्यानुसार नागपूर शहरात ही कारवाई केली जाणार आहे. त्यामुळं प्लास्टिकचा वापर करत असाल, तर सावध होण्याची वेळ आली आहे. प्लास्टिक संदर्भात केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाचे निर्देश आहेत. या निर्देशानुसार 30 सप्टेंबर 2021 पासून 75 मायक्रॉनपेक्षा (micron) कमी जाडीच्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. 31 डिसेंबर 2022 पासून 120 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या सर्व प्रकारचे प्लास्टिक प्रतिबंधित (restricted) करण्यात आले आहे.

हे असणार प्रतिबंधित

कचरा व नर्सरीसाठी उपयोगात येणाऱ्या पिशव्या वगळण्यात आल्या आहेत. सर्व कम्पोस्टेबल प्लास्टिकसह पकड असलेल्या व नसलेल्या सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या (कॅरी बॅग), डिश बाउल, कंटेनर (डबे) आदींना प्रतिबंधित करण्यात आले आहे. याशिवाय सजावटीसाठीचे प्लास्टिक व पॉलिस्टीरिन (थर्माकोल), प्लास्टिकचे आवरण असलेले मिठाईचे बॉक्स, निमंत्रण पत्रिका, सिगारेटची पॉकिटे यावर सुद्धा बंदी असेल. यासोबतच प्लास्टिकच्या कांड्यासह कानकोरणी, फुग्यांना लावण्यात येणा-या प्लास्टिक कांड्या, प्लास्टिकचे झेंडे, आईसक्रीम कांड्या, प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी – जसे : काटे चम्मच, चाकू, स्ट्रॉ, ट्रे इ. आणि 100 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक किंवा पीव्हीसी बॅनर हे सर्व प्रतिबंधित करण्यात आले आहे.

दंडात्मक कारवाई केली जाणार

प्रतिबंधित सर्व प्रकारच्या प्लास्टिकचा वापर हा पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत घातक आहे. प्रतिबंधित प्लास्टिक संदर्भात येत्या 1 जुलैपासून नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकामार्फत बाजारपेठ, दुकाने, आस्थापनांमध्ये तपासणीची धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. या कारवाईमध्ये प्रतिबंधित प्लास्टिक साहित्याचा वापर, वाहते व साठवणूक आढळायला नको. अन्यथा महाराष्ट्र विघटनशील कचरा नियंत्रण कायदा 2006 अंतर्गत महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अधिसूचना 2018 चे उल्लंघन केल्या प्रकरणी नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.