भाजपचं मिशन नागपूर महापालिका, युवा वॉरिअर्सची फळी उभारणार,चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

गजानन उमाटे

| Edited By: |

Updated on: Aug 18, 2021 | 10:40 AM

राज्याच्या राजधानीत भाजपनं निवडणुकांची तयारी सुरु केल्याचं दिसून येत आहे. नागपूर महापालिकेत भाजपची सत्ता असून विरोधी काँग्रेसनं देखील येणाऱ्या निवडणुकीत ताकदीनं लढण्याचा निर्णय घेतल्यानं भाजपही जोरदार तयारीला लागलंय.

भाजपचं मिशन नागपूर महापालिका, युवा वॉरिअर्सची फळी उभारणार,चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
chandrashekhar bawankule

Follow us on

नागपूर: राज्याच्या राजधानीत भाजपनं निवडणुकांची तयारी सुरु केल्याचं दिसून येत आहे. नागपूर महापालिकेत भाजपची सत्ता असून विरोधी काँग्रेसनं देखील येणाऱ्या निवडणुकीत ताकदीनं लढण्याचा निर्णय घेतल्यानं भाजपही जोरदार तयारीला लागलंय. भाजपनं मिशन नागपूर महानगरपालिका सुरु केलं असून युवा मतदारांवर डोळा ठेवत भाजपची निवडणूक तयारी सुरु आहे. नागपूरमधील प्रत्येक विधानसभा निवडणुकीत तरुणांचे मेळावे सुरु आहेत.

भाजपचं मिशन नागपूर महानगरपालिका

नागपूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. विधानपरिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नागपूरचे तत्कालीन महापौर आणि उमेदवार संदीप जोशी यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्या पराभवानंतर भाजप सतर्क झाल्याचं दिसून येत आहे. नागपूर महापालिका क्षेत्रात येणाऱ्या सर्व विधानसभा मतदारसंघात भाजपच्या वतीनं तरुणांचे मेळावे आयोजित करण्यास सुरुवात झाली आहे. भाजपनं एक प्रकारे मिशन नागपूर महापालिका सुरु केलेय.

50 हजार तरुणांची फळी तयार करणार

भाजपच्या वतीनं प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तरुणांचे मेळावे सुरु करण्यात आले आहेत. भाजप नागपूर जिल्ह्यात 50 हजार तरुणांची युवा वॅारियर्सची फळी तयार करणार आहे. एका बुथवर 25 तरुणांची फळी काम करेल. त्यादृष्टीनं भाजपची तयारी सुरु असल्याची माहिती भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

महाविकासआघाडी सरकारला टक्कर देण्याची तयारी

भाजपच्या वतीनं एका बुथवर 25 तरुणांची फळी तयार करण्यात येणार आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावतीनं ही माहिती देण्यात आली आहे. 18 ते 25 वयोगटातील नव्या मतदारांवर भाजपा डोळा असून महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपची तयारी सुरु आहे.

जुलै महिन्यात देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजप नगरसेवकांची बैठक

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूरातील भाजप नगरसेवकांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली होती. नागपूर महानगरपालिका निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येवून ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने नागपुरातील सर्व नगरसेवकांची बैठक घेतली होती. त्या बैठकीत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगरसेवकांना निवडणुकीचा कानमंत्र दिला होता.

नागपूर मनपात गेल्या तीन टर्मपासून भाजपची सत्ता आहे, आगामी मनपा निवडणूक जिंकण्याचीही भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपकडून रणनिती आखली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागपूरातील भाजप नगरसेवकांची एक महत्त्वपूर्ण बैठक आज घेण्यात आली होती. नागपूर मनपा निवडणुकीच्या कामाला लागलो आहोत, असे माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.

इतर बातम्या:

वयोवृद्ध महिलेला निद्रानाश, घरात सून-नात असताना बाल्कनीत टोकाचं पाऊल, आत्महत्या की घातपात? नागपुरात खळबळ

तालिबान्यांची ‘किल लिस्ट’, तीन ते चार लाख नागरिकांना अमेरिकेचे ‘खबरी’ म्हणून मारणार?

BJP starts preparation of Nagpur Municipal Corporation youth meeting started info given by Chandrashekhar Bawankule

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI