इथे बावनकुळे म्हणाले शिवसेना संपवणार, तिथे गडकरींच्या उपस्थितीत सेनेच्या दोन नगरसेविका भाजपात

नागपूर जिल्ह्यातील शिवसेनेला भाजपनं लावला सुरुंग लावला आहे. बुटीबोरी नगरपरिषदेतील शिवसेनेच्या दोन नगरसेविकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या दोन नगरसेविकांनी भाजपात प्रवेश केला | Butibori Shivsena Two Corporator Joins BJP

इथे बावनकुळे म्हणाले शिवसेना संपवणार, तिथे गडकरींच्या उपस्थितीत सेनेच्या दोन नगरसेविका भाजपात
Nitin Gadkari
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 11:09 AM

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील शिवसेनेला (Butibori Shivsena) भाजपनं लावला सुरुंग लावला आहे. बुटीबोरी नगरपरिषदेतील शिवसेनेच्या दोन नगरसेविकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या दोन नगरसेविकांनी भाजपात प्रवेश केला (Butibori Shivsena Two Corporator Joins BJP In The Presence Of Central Minister Nitin Gadkari).

विकासनिधी मिळत नसल्याने शिवसेनेवर नाराजी

विकासनिधी मिळत नसल्याने या नगरसेवकांची शिवसेनेवर नाराजी होती. त्यामुळे नंदा सोनवणे आणि विद्या दुधे यांनी भाजपचा कमळ हाती घेतला. तसेच, शिवसेनेचे आणखी काही कार्यकर्ते भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. बुटीबोरीचे नगराध्यक्ष बबलू गौतम यांच्या प्रयत्नामुळे शिवसेनेला सुरुंग लागला आहे. तर काँग्रेसच्याही काही कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला.

‘शिवसेनेला संपवल्याशिवाय राहणार नाही’

“राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची गेल्या निवडणूकीतंच छुपी युती होती, शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसलाय, आता आगामी निवडणूकीत सेना – राष्ट्रवादी एकत्र लढली तरिही काही परिणाम नाही, आम्ही निवडणूकीच्या राजकारणातून शिवसेनेसा संपवल्याशिवाय राहणार नाही” असं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते. आगामी सर्व निवडणूका जिंकण्याचा विश्वासंही त्यांनी व्यक्त केला आहे.

नितीन गडकरी यांच्या हस्ते बुटीबोरी उडानपुलाचं लोकार्पण

नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग सातवरील हिंगणघाट येथे नांदगाव चौरस्त्यावरील उड्डाणपुलाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर उड्डाणपूल लोकांसाठी खुला करण्यात आला. तब्बल 69 कोटी रुपये खर्च करुन हा सहा लेनचा उड्डाणपूल बनवण्यात आला आहे. बुटीबोरी महामार्गावर ट्राफीक जामपासून दिलासा मिळणार आहे.

गडकरींनी बुटीबोरी नगरपरिषद घेतली दत्तक

नागपूर शेजारी असलेल्या बुटीबोरीची औद्योगिक शहर म्हणून ओळख आहे. या बुटीबोरी शहराला दत्तक घेण्याचा निर्णय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतलाय. यापूर्वी गडकरी यांनी गावं दत्तक घेतलीय, पण पहिल्यांदाच त्यांनी नगरपरिषद दत्तक घेण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे बुटीबोरी शहराचा सर्वांगीण विकास आणि हे शहर हरित शहर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितले. बुटीबोरीचे नगराध्यक्ष बबलू गौतम यांनी, बुटीबोरी नगरपरिषद दत्तक घेतल्यामुळे नितीन गडकरींचे आभार मानले.

Butibori Shivsena Two Corporator Joins BJP In The Presence Of Central Minister Nitin Gadkari

संबंधित बातम्या :

नागपुरात लहान मुंलांमध्ये अँटिबॉडीज आढळल्या, तज्ज्ञ म्हणतात धोका कायम, पालकांनी मुलांची काळजी घ्यावी

राज्य सरकारकडून मुंबई महापालिकेला वेगळा आणि पुणे, नागपूर महापालिकेला वेगळा न्याय?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.