CCTV footage | नागपुरातील रेतीउपशाचे सीसीटीव्ही फुटेज हवेत; केव्हापासून होणार अंमलबजावणी?

CCTV footage | नागपुरातील रेतीउपशाचे सीसीटीव्ही फुटेज हवेत; केव्हापासून होणार अंमलबजावणी?
बैठकीत उपस्थित पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी रेतीचे अवैध उत्खनन केले जाते. त्यामुळं याचे सीसीटीव्ही फुटेज तयार ठेवावेत. त्यामुळं संबंधितांवर कारवाई करणे सोपे जाईल, असे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी बैठकीत सांगितलं.

गजानन उमाटे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 18, 2022 | 1:39 PM

नागपूर : बैठकीत जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. जिल्हा खनिकर्म अधिकारी गजानन कांबडे यांनी आढावा सादर केला. जिल्ह्यात सुरू असलेले अवैध उत्खनन, रेती उपसा यासंदर्भात राज्य शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. आवश्यक त्याठिकाणी सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले पाहिजे. तसेच खनिज प्रतिष्ठानचा कामांना मंजुरी देताना लोकप्रतिनिधींना माहिती दिली गेली पाहिजे, असे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी स्पष्ट केले. मातोश्री ग्रामसमृद्धी शेत, पांदण रस्ते योजनेबाबतची अंमलबजावणी करताना नव्या शासन निर्णयाप्रमाणे कामे करण्यात यावी. राज्य शासनाचा हा पथदर्शी प्रकल्प आहे. त्यामुळं जिल्ह्यात त्याची योग्य ती अंमलबजावणी करण्यात यावी. कोरोनामुळे अनेक कामे प्रभावी झाली आहेत. त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन पांदण रस्त्याबाबत पुरवणी आराखडा तयार करण्यात यावा, असे निर्देश डॉ. नितीन राऊत यांनी काल येथे दिले.

पांदण रस्त्यांचा पुरवणी आराखडा तयार करा

बचत भवनात झालेल्या या बैठकीमध्ये जिल्ह्यामध्ये या योजनेची समतोल अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली. त्यानंतर त्यांनी पादंण रस्त्याबाबत सुटलेल्या कामांना घेऊन पुरवणी आराखडा तयार करण्याबाबतचे आदेश दिले. या बैठकीमध्ये पांदण रस्ते योजनेअंतर्गत झालेल्या कामाच्या मजबुतीकरण, मातीकाम याबद्दलचा आराखडा घेण्यात आला. या कामांसाठी जिल्हास्तर समिती, जिल्हा कार्यकारी समिती, तालुकास्तर समिती अशा विविध समित्या आहेत. नागपूर जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील 731 ग्राम पंचायतीसाठी क्रियान्वन यंत्रणा म्हणून जिल्हा परिषण बांधकाम, सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत काम केले जाते.

आंभोरा तिर्थक्षेत्र राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक व्हावे

महाराष्ट्र, मध्यप्रदेश, तेलगंना येथील भाविकांना आपले श्रद्धास्थान व पंरपरा पाळताना हे स्थळ सर्वधर्मियांसाठी राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक व्हावे. परंपरा, श्रद्धा आणि सौंदर्यीकरणाचा हा प्रकल्प आदर्श ठरावा अशा पद्धतीने याठिकाणचे नूतनीकरण करण्यात यावे. याबाबत लवकरच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक लावण्यात येईल. या प्रकल्पामुळे नागपूरच्या पर्यटन नकाक्षाला नवा आयाम मिळाला पाहिजे अशी सूचना आंभोरा तीर्थक्षेत्र संदर्भात लावण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी केले. आंभोरा तीर्थक्षेत्र विकास करताना प्राचीन शिवमंदिर, बुद्धविहार, लेजर टुरिझम, वॉटर स्पोर्ट याकडे लक्ष वेधावे. याशिवाय परंपरागतरित्या सुरू असलेल्या या भागातील प्रथा पाळताना नागरिकांना आधुनिक सुविधा उपलब्ध होतील याकडे लक्ष देण्याचे त्यांनी सांगितले.

मोठा ताजबाग विकासासंदर्भात चर्चा

या बैठकीनंतर मोठा ताजबाग विकासाबाबतही विकासकासोबत चर्चा करण्यात आली. मोठा ताजबाग नूतनीकरण व सौंदर्याकरण करताना देखभाल दुरुस्ती हा विषय कळीचा मुद्दा आहे. स्थानिक ट्रस्टला विश्वासात घेऊन आवश्यक खर्च करावा. लोकोपयोगीता हा निकष ठेवून विस्तारीकरणाची भूमिका पूर्ण करायची आहे. त्यासाठी ट्रस्टसोबत बसून निर्णय घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली. या बैठकीला नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी उपस्थित होते.

election | नगरपंचायत, जिल्हा परिषदेच्या उर्वरित जागांसाठी मतदान; उद्याच्या निकालाकडं साऱ्यांचे लक्ष

Nagpur Crime | नागपुरातील अल्पवयीन मुलीला युवकाने पळविले; दोन वर्षांनी परतली ती बाळासहच!

Nagpur Corona | नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे चार बळी; अडीच हजारांच्या उंबरठ्यावर बाधित

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें