AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पब्लिकली कशाला भांडता? त्यापेक्षा राजीनामा द्या; प्रकाश आंबेडकर यांचा भुजबळ यांना सल्ला

राज्य सरकारने मराठा समाजातील सगेसोयऱ्यांनाही आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. ओबीसी आरक्षणातून हे आरक्षण दिलं जाणार आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ओबीसी नेत्यांमध्येही अस्वस्थता पसरली आहे. ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांनी या निर्णयावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भुजबळ यांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला आहे.

पब्लिकली कशाला भांडता? त्यापेक्षा राजीनामा द्या; प्रकाश आंबेडकर यांचा भुजबळ यांना सल्ला
balasaheb ambedkarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 29, 2024 | 2:36 PM
Share

विठ्ठल देशमुख, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, वाशिम | 29 जानेवारी 2024 : छगन भुजबळ यांनी पब्लिकली भांडू नये. त्यांनी पब्लिकली भांडण्यापेक्षा कॅबिनेटमध्ये भांडावं. कॅबिनेटमध्ये त्यांचं ऐकलं जात नसेल तर भुजबळांनी ओबीसींसाठी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. मंत्रिमंडळातून बाहेर पडावं, असा सल्ला वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना दिला आहे. भुजबळ यांनी राजीनामा दिला तर त्यांच्या म्हणण्याला वजन प्राप्त होईल. नाही तर एका बाजूला सत्ता उपभोगायची आणि दुसऱ्या बाजूला रडत राहायचं या दोन गोष्टी एकत्र कशा राहतील?, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला.

प्रकाश आंबेडकर यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. एकनाथ शिंदे मराठा समाजाचे सध्या सर्वात टॉलेस्ट नेते झाले आहेत. त्यांच्या सिक्सरमुळे इतर मराठा नेते बोल्डआउट झाले आहेत. भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी खेळ सुरू केला होता. भाजपने ओबीसींना गोंजारत राहायचं आणि शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर बोलत राहायचं. पण त्यात शिंदे यांनी सरशी घेतली आहे. शिंदे यांनी एकच सिक्सर मारून मराठा समाजातील सर्वात मोठे नेते झाले आहेत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

भाजपचा मोठा लॉस

कोणत्याही परिस्थितीत तुमच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असा विश्वास भाजपकडून ओबीसींना दिला जात होता. आमच्या आरक्षणाला धक्का लागला आणि भाजपने आम्हाला फसवलं अशी भावना आता ओबीसींची झाली आहे. ओबीसींची विकेट पडली आहे. भाजप मराठा समाजातून कधीच आऊट झालेला आहे. आता ओबीसींचाही विश्वास गमावला. त्यामुळे भाजपचा मोठा लॉस झाला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

भाजप काहीही करू शकते

यूजीसीमध्ये उमेदवार मिळत नसल्याने SC, ST, Obc च्या जागा ओपनसाठी दिल्या जाणार आहेत आणि आरक्षण संपवण्याचा हा आरएसएस आणि भाजपचा डाव आहे, असं ट्विट काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुळात ट्रान्सफर करणं जसं एका प्रवर्गातून दुसऱ्या प्रवर्गात म्हणजे एसीची कॅटेगरी ट्रायबलला ट्रान्सफर करणं किंवा ट्रायबल किंवा एसटीची कॅटेगरी जनरलला करणं हे सुप्रीम कोर्टाने बंद केलेलं आहे. ते करता येत नाही. फार फार प्रयत्नानंतरही कँडिडेट मिळाला नसेल तर रेशोखाली करून ते मिळतात का हे बघण्यासाठी सांगितलेलं आहे. ती प्रोसेस घेतल्याशिवाय निर्णय घेता येत नाही. परंतु भाजपचं सरकार काही करू शकते. कारण त्यांना नियम आणि नियमावली या दोन्हीही मान्य नाही, असं आंबेडकर म्हणाले.

शून्य टक्के आरक्षण जाणार नाही

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही ओबीसी- मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मराठ्यांना कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र मिळत नव्हते, मात्र आता प्रमाणपत्र मिळणे सोपे होईल. मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याचा निर्णय सरकार घेईल. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आरक्षण दिले होते. मात्र आता ज्याच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना आरक्षण देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे ओबीसीचे शून्य टक्के आरक्षण कमी होणार नाही. मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्यावर भाजप ठाम आहे. सर्वपक्षीय बैठकीत ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यावर एकमत झाले आहे. ओबीसीवर अन्याय होणार नाही, ओबीसी आरक्षण टिकवणे, मंत्रालय टिकवणे हे फडणवीसांनी काम केलं आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

ओबीसींनी घाबरू नये, अधिसूचना काढल्यावर हरकती येणार आहेत, हा अध्यादेश नाही. पंकजा मुंडे यांची भूमिका भाजपपेक्षा वेगळी नाही. सरकारने अधिसूचना काढली आहे, त्यावर आक्षेप मागितले आहेत. सुनावणी होईल, अधिसूचना अंतिम करण्यापूर्वी सुनावणी होईल, त्यात आपले म्हणणे मांडता येईल, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला