Nagpur Congress | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात, काँग्रेस कोणत्याही हल्ल्याचे समर्थन करत नाही

पटोले म्हणाले, सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यावेळी मी उशिरापर्यंत कार्यक्रमात होतो. त्यामुळं मला त्याबद्दल फारसे काही कळलं नाही. आताच त्यावर काही बोलणे योग्य होणार नाही.

Nagpur Congress | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात, काँग्रेस कोणत्याही हल्ल्याचे समर्थन करत नाही
नाना पटोले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 2:55 PM

नागपूर : भाजपचे नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांच्यावर हल्ला झाला. अशा हल्ल्यांचे काँग्रेस समर्थन करत नाही. याच काय पण, अशा कोणत्याही हल्ल्यांचे काँग्रेस समर्थन करत नाही (Congress does not support the attacks), असे स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी दिलंय. पटोले म्हणाले, सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यावेळी मी उशिरापर्यंत कार्यक्रमात होतो. त्यामुळं मला त्याबद्दल फारसे काही कळलं नाही. आताच त्यावर काही बोलणे योग्य होणार नाही, असंही ते म्हणाले. नाना पटोले म्हणाले, लतादीदी लवकर बऱ्या होऊन याव्या, असं मला वाटतं होतं. मी आशा दीदींशी बोललो. त्यावेळी त्यांनी त्यांची प्रकृती सुधारत आहे, असं सांगितलं. त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी काँग्रेस परिवाराकडून ईश्वराला प्रार्थना केली होती. पण, अखेर त्या सोडून गेल्या.

सीबीआय चौकशी लावणे योग्य का?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक टि्वट केलं. त्यामध्ये फडणवीस म्हणतात, सोमय्या यांच्यावरचा हल्ला ही लोकशाहीचा खून आहे. त्यावर नाना पटोले म्हणाले, लोकांना धमक्या देणे आणि डीडी लावणे सीबीआयची चौकशी लावणे, योग्य आहे का, असा सवाल त्यांनी केला. हे जर लोकशाही चांगली बाजू आहे, असे देवेंद्र फडणवीस यांना सोमय्यांच्या हल्ल्यानंतर वाटत असेल तर त्याचा विचार झाला पाहिजे, असंही पटोले यांनी सांगितलं.

बावनकुळेंबाबत मवाळ भूमिका

बावनकुळेंवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. यावर नाना पटोले म्हणाले, मी भ्रष्टाचाराचे समर्थन करत नाही. कुणाच्या घरात जर पैसे निघत असतील तर मी काही ठेवले नाही. जशी करणी असेल तसे भोगावे लागेल. सोनिया गांधींना पत्र लिहत कारवाईची मागणी केली आहे. यावर पटोले म्हणाले, आता सगळे भाजपावाले काँग्रेसमय होत आहेत. त्यामुळे ते सोनिया गांधींना पत्र लिहीत आहेत. चांगली बाब असेल तर त्याचं समर्थन करू. पण, बावनकुळेंवर भ्रष्टाचाराचे आरोप लागत असले तरी मी काही चौकशी अधिकारी नाही. त्या घटनेची माहिती मला नाही. आणि ईडीची चौकशी करा, अशी काही मागणीही मी करणार नाही म्हणत मवाळ भूमिका नाना पटोले यांनी घेतली.

भाजपाने मनोहर पर्रीकर कुटुंबीयांना वाळीत टाकलं

देशात गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तरप्रदेश या पाचही राज्यांच्या निवडणुकामध्ये काँग्रेसचे विजयी होईल, असा आशावाद नाना पटोले यांनी व्यक्त केला. एवढेच नाही तर उत्तर प्रदेशमध्येही भाजप निवडून येणार नाही. गोव्याचे सिटिंग मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे सुद्धा निवडणूक हरणार आहेत, असे भाकित पटोले यांनी केलंय. गोव्यात भाजपची अवस्था अतिशय वाईट आहे. लोकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. मनोहर पर्रीकर यांच्या कुटुंबाला वाळीत टाकण्याचे काम भाजपने केले आहे, असा आरोपही पटोले यांनी केला.

Nagpur Crime | नागपुरात विजेचा शॅाक लागून बिबट्याचा मृत्यू; शेतात विद्युत करंट लावण्याचे कारण काय?

Nagpur | एका सुरेल युगाचा अंत; लतादीदींच्या निधनावर डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला शोक

नागपुरातील रस्त्यांच्या सफाईसाठी मेकॅनिकल रोड स्विपिंग मशीन; रात्रीच्या वेळी होणार प्रमुख मार्गांची स्वच्छता

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.