विदर्भात रुग्णसंख्या घटली पण मृतांच्या संख्येत लक्षणीय वाढ, रुग्ण दगावण्याचे नेमके कारण काय ?

विदर्भातील काही जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. असे असले तरी येथे कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. (corona patients mortality rate amravati nagpur)

विदर्भात रुग्णसंख्या घटली पण मृतांच्या संख्येत लक्षणीय वाढ, रुग्ण दगावण्याचे नेमके कारण काय ?
प्रातिनिधिक फोटो

नागपूर : विदर्भातील काही जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. असे असले तरी येथे कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. याच कारणामुळे येथील प्रशासनाची चिंता मोठ्या प्रमाणात वाढली असून कोरोनाग्रस्तांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी येथे मोठे प्रयत्न सुरु आहेत. (Corona patients decreasing in Vidarbha but mortality rate increasing what is the cause Chandrapur Amravati Nagpur Gadchiroli)

विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत मृतांची संख्या वाढली

मागील काही दिवसांपासून विदर्भातील काही जिल्ह्यात दिलासा देणारं चित्र पाहायला मिळत आहे. अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर,गडचिरोली या जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत आहे. मात्र, या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. मृतांचे वाढते प्रमाण पाहता येथील आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली असून मृतांची संख्या कमी कशी करावी याचा अभ्यास येथील प्रशासन करत आहे.

मत्यूदर वाढण्याचे नेमके करण काय ?

राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत विदर्भामध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. याबाबत आरोग्य तज्ज्ञांना विचारण्यात आले. त्यानंतर अनेक तथ्ये समोर आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार विदर्भातील या जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूमध्ये युनिक म्युटेशन झाल्यामुळे संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. तसेच या नवीन म्युटेशनचा प्रसार वेगाने होतो. म्यूटंट कोरोनाची लागण झाली तर त्याचे लक्षणं दिसत नाहीत. त्यानंतर अचाकनपणे ही लक्षणं दिसायला लागतात. याच कारणांमुळे विदर्भामध्ये मृत्यूदर जास्त आहे.

कोरोना चाचणीचे प्रमाण कमी

विशेष म्हणजे येथील मृत्यूदर वाढण्यामागे आरोग्य यंत्रणासुद्धा काही प्रमाणात जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये रुग्ण वाढल्यामुळे वेळेवर उपचार मिळण्यास अडचणी येत आहेत. तसेच बेड्स आणि ऑक्सिजन वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे काही रुग्णांचा मृत्यू होतो. कोरोना चाचणीचे प्रमाण कमी असणे हेसुद्धा मृतांचे प्रमाण वाढण्यामागचे प्रमुख कारण आहे. तसेच अनेक रुग्ण ताप अंगावर काढतात. त्यानंतर उशिराने डॉक्टरांकडे गेल्यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या सर्व कारणांमुळे काही जिल्ह्यात मृत्युसंख्या वाढत असल्याचे डॉक्टर सांगतात.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार रुग्ण दगावण्याचे प्रमाण अमरावती जिल्ह्यामध्ये जास्त आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून इतर जिल्ह्यांत कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवून नागरिकांना वेळेत उपचार देणे गरजेचे आहे. त्यामुळे मृतांच्या संख्येत घट होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

इतर बातम्या :

पुण्यातील भारत बायोटेकच्या प्लांटची वेगाने उभारणी; शास्त्रज्ञ, अभियंत्यांच्या भरतीला लवकरच सुरुवात

लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवत भर रस्त्यात बर्थडे सेलिब्रेशन, शिवसेना नेत्यावर अखेर गुन्हा दाखल

(Corona patients decreasing in Vidarbha but mortality rate increasing what is the cause Chandrapur Amravati Nagpur Gadchiroli)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI