पुण्यातील भारत बायोटेकच्या प्लांटची वेगाने उभारणी; शास्त्रज्ञ, अभियंत्यांच्या भरतीला लवकरच सुरुवात

केंद्र आणि राज्य सरकारकडून 30 ते 45 दिवसांत आवश्यक परवाने घेण्यात येतील | Bharat Biotech covaxin

पुण्यातील भारत बायोटेकच्या प्लांटची वेगाने उभारणी; शास्त्रज्ञ, अभियंत्यांच्या भरतीला लवकरच सुरुवात
Bharat Biotech covaxin
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 7:36 AM

पुणे: भारत बायोटेक कंपनीकडून मांजरी येथील कोरोना लसीच्या प्लांटमधून येत्या ऑगस्ट महिन्यांच्या अखेरीस कोव्हॅक्सिन (Covaxin) लसीचे उत्पादन सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध स्तरावर तयारी सुरू असून या प्लांटमधून जास्तीत जास्त लसीचे उत्पादन घेण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात या कंपनीकडून शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांची भरती करण्यात येईल. यासाठी भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) हैदराबाद आणि नॅशनल इन्स्ट्यिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) मधील निवृत्त शास्त्रज्ञांचीही मदत घेण्यात येणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात अन्न व औषध प्रशासन, महावितरण, केंद्रीय आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, कामगार विभागाच्या परवानग्या घेण्याचे काम सुरु आहे. तर तिसऱ्या टप्प्यात यंत्रसामग्री तपासणीचे काम पूर्ण करण्यात येईल.

‘कोव्हॅक्सिन’चा प्रकल्प विदर्भात होणार होता, अजित पवारांनी पुण्यात पळवला, भाजपचा आरोप

महिनाभरात परवाने मिळणार

केंद्र आणि राज्य सरकारकडून 30 ते 45 दिवसांत आवश्यक परवाने घेण्यात येतील. यानंतर ऑगस्टअखेर प्रत्यक्ष लस उत्पादित करण्याचे नियोजन असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

‘कोव्हॅक्सिन’चा प्रकल्प विदर्भात होणार होता, अजित पवारांनी पुण्यात पळवला, भाजपचा आरोप

भारत बायोटेक कंपनी कोव्हॅक्सिन लसीच्या निर्मितीसाठी नागपूरच्या मिहानमध्ये प्रकल्प सुरु करणार होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपले राजकीय वजन वापरून हा प्रकल्प पुण्याला पळवला, असा आरोप भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी केला होता. कृष्णा खोपडे हे पूर्व नागपूर मतदारसंघाचे आमदार आहेत.

सिरम आणि भारत बायोटेकला (Bharat Biotech) मिहानमध्ये निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, अजित पवार यांनी ऐनवेळी राजकीय वजन वापरुन भारत बायोटेकचा प्रकल्प पुण्यात नेला. हा विदर्भावर अन्याय असल्याचे त्यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

Corona vaccine : कोविशील्डबाबत महत्वाची घोषणा, दुसऱ्या डोससाठी झालेली नोंदणी कायम राहणार

Corona vaccine : कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर ‘कोव्हॅक्सीन’ परिणामकारक, भारत बायोटेकचा दावा

मोदीजी, आमच्या मुलांची व्हॅक्सिन परदेशात का पाठवली?, राहुल गांधी म्हणाले, मलाही अटक करा!

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.