AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत बायोटेकचा प्रकल्प पुण्याला पळवल्याचा भाजपचा आरोप, अजित पवारांचं रोखठोक उत्तर

भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी अजित पवार यांनी भारत बायोटेकचा कोरोना लसनिर्मिती प्रकल्प पुण्याला पळवल्याचा आरोप केला होता. (ajit pawar slams bjp mla krushna khopde)

भारत बायोटेकचा प्रकल्प पुण्याला पळवल्याचा भाजपचा आरोप, अजित पवारांचं रोखठोक उत्तर
AJIT PAWAR
| Updated on: May 17, 2021 | 7:06 PM
Share

मुंबई : ‘भारत बायोटेकचा प्रकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याला पळवला, हा भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा आरोप तद्दन खोटा, जनतेची दिशाभूल करणारा, औट घटकेच्या प्रसिद्धीसाठी करण्यात आला आहे. राजकीय सनसनाटी निर्माण करण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे,’ असे रोखठोक उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला दिले. भाजप आमदार कृष्णा खोपडे (Krushna Khopde) यांनी अजित पवार यांनी भारत बायोटेकचा कोरोना लसनिर्मिती प्रकल्प पुण्याला पळवल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपांना उत्तर म्हणून अजित पवार (Ajit Pawar) यांनी वरील भाष्य केले. (Ajit Pawar slams BJP MLA Krushna Khopde on alleging Ajit Pawar moved Bharat Biotech project to Pune)

अजित पवार यांच्यावर कोणता आरोप ?

देशावरील कोरोना संकट आणि लसनिर्मितीची गरज लक्षात घेऊन भारत बायोटेक लस उत्पादक कंपनीने स्वत:हून पुण्यात लसनिर्मिती प्रकल्पासाठी जागा मिळावी, अशी मागणी केली होती. त्यासाठी, भारत बायोटेकने मांजरी येथील बंद पडलेल्या ‘इंटरवेट इंडिया प्रा लि.’ (बायोवेट) कंपनीची जागा वापरण्यासाठी मिळावी असा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला होता. त्या प्रस्तावावर तातडीने निर्णय व्हावा म्हणून भारत बायोटेकने उच्च न्यायालयात धाव घेतली घेतली होती, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. मात्र, मांजरी येथील ‘इंटरवेट इंडिया प्रा लि.’ (बायोवेट) कंपनीची जागा देऊन भारत बायोटेकचा प्रकल्प अजित पवारांनी पुण्याला पळवला, असा आरोप भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केला.

अजित पवार यांचे रोखठोक उत्तर

पुण्याच्या हवेली तालुक्यातील मांजरी येथील जागा भारत बायोटेक कंपनीला कोरोना लसनिर्मिती प्रकल्पासाठी देण्याचे खुद्द मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन होईल हे पाहण्याची पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी जबाबदारी पार पाडली आहे. भारत बायोटेकचा लसनिर्मिती प्रकल्प पुणे, नागपूरसह राज्यात कुठेही झाला असता तरी मला आनंदच झाला असता. त्यामुळे ‘भारत बायोटेकचा प्रकल्प अजित पवारांनी पुण्याला पळवला’ हा भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा आरोप तद्दन खोटा, जनतेची दिशाभूल करणारा, औट घटकेच्या प्रसिद्धीसाठी, राजकीय सनसनाटी निर्माण करण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे, असे रोखठो उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

प्रकल्प सुरु करण्याचे न्यायालयाचे निर्देश

तसेच पुढे बोलताना “उच्च न्यायालयाने कोरोनाचे संकट व लसनिर्मितीची गरज लक्षात घेऊन पुण्याच्या हवेली तालुक्यातील मांजरी येथे भारत बायोटेकचा प्रकल्प सुरु करण्याचे निर्देश दिले. राज्याचा उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून न्यायालयाच्या आदेशाचे पालन सुनिश्चित करण्याची जबाबदारी पार पाडली. भारत बायोटेकच्या प्रकल्प पुण्यात न्यायालयाच्या आदेशाने सुरु होतं,” असंसुद्धा अजित पवार यांनी सांगितलं.

दरम्यान, कोरोनाविरुद्धच्या लढ्यात संपूर्ण महाराष्ट्र एकजुटीने लढत आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र एक असून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याचा, विभागाचा औद्योगिक, आर्थिक, पायाभूत विकासासाठी महाविकास आघाडी सरकार बांधील आहे. विरोधकांनी खोटे, तथ्यहीन आरोप करुन जनतेची दिशाभूल करण्याचे प्रयत्न आता थांबावावेत, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले.

इतर बातम्या :

सतत केंद्राकडे बोट दाखवण्याची सवय सोडा, कधी तरी आत्मचिंतन करा; फडणवीसांचा सरकारला सल्ला

पिंपरी चिंचवडमध्ये म्युकरमायकोसिसचा धोका वाढला, यशवंतराव चव्हाण रुग्णालयात 12 रुग्ण दगावले

(Ajit Pawar slams BJP MLA Krushna Khopde on alleging Ajit Pawar moved Bharat Biotech project to Pune)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.