पिंपरी चिंचवडमध्ये म्युकरमायकोसिसचा धोका वाढला, यशवंतराव चव्हाण रुग्णालयात 12 रुग्ण दगावले

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात या आजारामुळे 12 रुग्ण दगावले आहेत. तर दोन दिवसात 70 रुग्ण दाखल झाले आहेत. 

पिंपरी चिंचवडमध्ये म्युकरमायकोसिसचा धोका वाढला, यशवंतराव चव्हाण रुग्णालयात 12 रुग्ण दगावले
यशवंतराव चव्हाण रुग्णालय, पिंपरी चिंचवड
सागर जोशी

|

May 17, 2021 | 6:02 PM

पिंपरी चिंचवड : राज्यात कोरोना रुग्णांमध्ये आता म्युकरमायकोसिसचा धोका वाढलाय. राज्यातील अनेक भागात म्युकरमायकोसिसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातही म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात या आजारामुळे 12 रुग्ण दगावले आहेत. तर दोन दिवसात 70 रुग्ण दाखल झाले आहेत.  यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रोज 3 रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी रुग्णालयांमध्येही म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. (70 patients of Mucormycosis, 16 die at Yashwantrao Chavan Hospital)

म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. शहरातील सर्वात मोठ्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या 12 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेनं दिलीय. तर दोन दिवसांत 70 रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णालयांमध्येही म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मात्र, महापालिकेकडे नेमके किती खासगी रुग्णालयं आहेत, याची माहिती उपलब्ध होऊ सकली नाही.

म्युकरमायकोसिस नवीन बुरशीजन्य रोगाच्या रुग्णांत वाढ

म्युकरमायकोसिस हा नवीन बुरशीजन्य रोगाचे रुग्ण वाढू लागल्याने राज्य सरकारपुढे नवीन आव्हान उभे ठाकले. त्याचा सामना करण्यासाठी डॉ. आशिष भुमकर यांच्यासोबत एक खास टीम तयार करण्यात आली आहे. यात डेंटिस्ट, ईएनटी सर्जन आणि आय स्पेशालिस्ट, भूलतज्ज्ञ अशा डॉक्टरांची टीम एकत्र करण्यात आली आहे. आपल्या सगळ्यांच्या पुढाकाराने हे संकट आपण सगळे मिळून नक्की परतवून लावू, असा विश्वास डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

अशा रुग्णांच्या नाकाची एंडोस्कोपी करावी

म्युकरमायकोसिस या आजाराची लक्षणे प्रामुख्याने मधुमेहग्रस्त व्यक्तीला कोरोना होऊन गेल्यानंतर काही दिवसांनी दिसून येतात. त्यामुळे हा आजार वेळीच टाळायचा असेल तर अशा रुग्णाची वेळच्या वेळी साखरेची पातळी चेक करायला हवी, असं मत राज्याचे कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केलं. तसेच जे रुग्ण 21 दिवसांहून जास्त काळ रुग्णालयात राहून गेले आहेत, अशा रुग्णांच्या नाकाची एंडोस्कोपी करावी, अशी सूचना त्यांनी मांडली.

औरंगाबादमध्ये म्युकरमायकोसिसचा कहर

औरंगाबादमध्ये सध्या कोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिस हा आजार थैमान घालताना दिसत आहे. म्युकरमायकोसिसमुळे औरंगाबादमध्ये गेल्या दीड महिन्यांत 16 जणांचा बळी गेला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 201 रुग्णांना म्युकरमायकोसिसची बाधा झाली आहे. आतापर्यंत 113 जणांचे डोळे काढण्यात आले आहेत. राज्यात म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण औरंगाबादेत आहेत. सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण सुद्धा औरंगाबादमध्येच आहे. त्यामुळे आरोग्ययंत्रणा प्रचंड धास्तावली आहे.

संबंधित बातम्या :

लहान मुलांसाठी सर्वाधिक धोकादायक आहे 2021 चा कोरोना, महाराष्ट्रात 60,684 मुले कोरोना संक्रमित

कोरोनामुक्त मधुमेहींना म्युकोरमायकोसिसचा धोका, लक्षणं कोणती? आजार टाळण्याचे उपाय काय?

Mucormycosis : म्युकरमायकोसिसची भीती वाटतेय? मग ICMR ने सुचवलेल्या ‘या’ गोष्टी कराच…

70 patients of Mucormycosis, 16 die at Yashwantrao Chavan Hospital

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें