लहान मुलांसाठी सर्वाधिक धोकादायक आहे 2021 चा कोरोना, महाराष्ट्रात 60,684 मुले कोरोना संक्रमित

आकडेवारी पाहिल्यास महाराष्ट्रात 60,684 मुले कोरोना संक्रमित आहेत, ज्यात 5 वर्षाखालील 9 हजाराहून अधिक मुलांचा समावेश आहे. (The most dangerous for children is the corona of 2021, with 60,684 children infected with corona in Maharashtra)

लहान मुलांसाठी सर्वाधिक धोकादायक आहे 2021 चा कोरोना, महाराष्ट्रात 60,684 मुले कोरोना संक्रमित
लहान मुलांसाठी सर्वाधिक धोकादायक आहे 2021 चा कोरोना

नवी दिल्ली : देशभरात कोरोना साथीच्या आजाराच्या केसेस सतत वाढत आहे. कोरोना महामारीची ही दुसरी लाट आता लहान मुलांसाठी आणखी धोकादायक सिद्ध होत आहे. देशातील 5 राज्यांत 80 हजाराहून अधिक मुलांना कोरोना संसर्ग झाला आहे. या पाच राज्यात महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडचा समावेश आहे. आकडेवारी पाहिल्यास महाराष्ट्रात 60,684 मुले कोरोना संक्रमित आहेत, ज्यात 5 वर्षाखालील 9 हजाराहून अधिक मुलांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशात 3,004 मुले कोरोना संसर्गग्रस्त आहेत आणि पाच वर्षाखालील 471 मुलांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, दिल्लीत 2,700 पेक्षा जास्त मुलांना कोरोना संसर्ग झाला आहे, ज्यात 5 वर्षांखालील 411 मुलांचा समावेश आहे. (The most dangerous for children is the corona of 2021, with 60,684 children infected with corona in Maharashtra)

कोरोना वॉर कॉन्क्लेव्हवर तज्ज्ञांची माहिती

दुसरीकडे, कर्नाटकात 7,327 मुलांना कोरोना संसर्ग झाला आहे, ज्यात पाच वर्षांखालील 871 मुलांचा समावेश आहे. छत्तीसगडमध्ये 5,950 मुलांना कोरोना संसर्ग झाला असून त्यामध्ये पाच वर्षांखालील 922 मुलांचा समावेश आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंतची ही सर्व आकडेवारी आहे. 2021 मध्ये, कोरोना मुलांमध्ये झपाट्याने पसरत आहे. मुलांमध्ये सौम्य किंवा मध्यम लक्षणे दिसून येत आहेत. टीव्ही 9 भारतवर्षच्या कोरोना वॉर कॉन्क्लेव्हवर बोलताना तज्ज्ञांनी हे सांगितले आहे.

गेल्या 24 तासात 1,501 बाधितांचा मृत्यू

देशात गेल्या 24 तासात कोरोना संक्रमणामुळे 1,501 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 2 लाख 61 हजारांहून अधिक कोरोनाच्या केसेस नोंदविण्यात आल्या आहेत, जी मागील दिवसांच्या 2.34 लाखांच्या तुलनेत 11.5 टक्के जास्त आहेत. सक्रिय केसेसची एकूण संख्या 18,01,316 आहे आणि डिस्चार्ज झालेल्या प्रकरणांची एकूण संख्या 1,28,09,643 आहे.

मुलांमधील या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

नवी मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटलचे बालरोग तज्ज्ञ डॉ. सुभाष राव म्हणतात, “कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे उलटत चालली आहे.” गेल्या वर्षी, जेथे बहुतेक मुले एसिम्प्टोमॅटिक होते, म्हणजेच, त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. तर यावर्षी मात्र कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत, प्रथम लक्षणे मुलांमध्ये दिसून येत आहेत आणि संसर्ग लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत पसरत आहे. म्हणूनच जर आपल्याला ही लक्षणे मुलांमध्ये दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
– ताप
– सर्दी आणि खोकला
– कोरडा खोकला
– जुलाब
– उलटी होणे
– भूक न लागणे
– जेवण नीट न जेवणे
– थकवा जाणवणे
– शरीरावर पुरळ उठणे
– श्वास घेताना अडचण जाणवणे

पालकांनी या गोष्टी ठेवा लक्षात

मुलास कॅविड संसर्ग झाल्याची पुष्टी झाल्यास आणि डॉक्टरांनी मुलास घरात अलिप्त राहण्याचा सल्ला दिला तर मुलाला घरात इतर लोकांपासून दूर ठेवा. शक्य असल्यास कुटुंबातील इतर सदस्यांकडून मुलासाठी स्वतंत्र बेडरुम आणि बाथरुमची व्यवस्था करा. संक्रमित मुलाची काळजी घेताना, पालकांनी डबल मास्क घालावे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत. (The most dangerous for children is the corona of 2021, with 60,684 children infected with corona in Maharashtra)

इतर बातम्या

‘तुझा खर्च लागला वाढू, सांग कितीदा कर्ज काढू…’ हे गाणं तुम्ही आजही गुणगुणता; कुणी लिहिलंय माहित्ये?

मविआच्या ‘या’ आमदाराकडेही रेमडेसिवीरचा साठा, पण वाटप करत नाही, मनसेचा गंभीर आरोप

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI