देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांना जीवे मारण्याची धमकी, पोलीस सतर्क

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना थेट जीवे मारण्याची धमकी एका दाम्पत्याकडून देण्यात आली आहे. या दाम्पत्याने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत दोन्ही नेत्यांना जीवे मारण्याची धमकी दिलीय. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओची दखल पोलिसांनी घेतली आहे.

देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांना जीवे मारण्याची धमकी, पोलीस सतर्क
Follow us
| Updated on: Nov 21, 2023 | 5:01 PM

निलेश डाहाट, Tv9 मराठी, चंद्रपूर| 21 नोव्हेंबर 2023 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे विद्यमान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे फडणवीस आणि मुनगंटीवार यांना उघडपणे सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करुन धमकी देण्यात आली आहे. संबंधित धमकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भातील बाबा मस्की आणि शोभा मस्की या दाम्पत्याकडून धमकी देण्यात आली आहे. या दाम्पत्याकडून व्हिडीओत शिवीगाळ देखील करण्यात आलीय. तसेच फडणवीस आणि मुनगंटीवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय.

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात राहणाऱ्या आणि विविध आंदोलनात सतत सहभागी होणाऱ्या बाबा मस्की आणि शोभा मस्की या दाम्पत्याने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओत देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या राजुरा येथील कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी संबंधित व्हिडीओची गंभीर दखल घेतली आहे.

पोलिसांकडून गुन्हा दाखल

भाजप कार्यकर्त्यांनी या दाम्पत्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी या दाम्पत्यावर सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी संदर्भात गुन्हा दाखल केलाय. गडचांदूर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत पुढील कारवाई सुरु केली आहे.

भाजप कार्यकर्त्यांनी धमकी देणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. वेगळा विदर्भ -शेतजमिनीचे पट्टे , वन्यजीवाद्वारे पिकांचे होणारे नुकसान यासंदर्भात भाष्य करताना फडणवीस आणि मुनगंटीवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी कॅमेऱ्यावर अधिक बोलण्यास नकार दिलाय.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.