संजय राऊत अब्रुनुकसान प्रकरणी मोठी बातमी, नितेश राणे यांच्याविरोधात कोर्टाकडून वॉरंट

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. संजय राऊत अब्रुनुकसान प्रकरणी माझगाव कोर्टाने बेलेबल वॉरंट जारी केलं आहे. कोर्टाने नितेश राणे यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी आज कोर्टात हजर राहण्याचं समन्स बजावलं होतं. पण नितेश राणे कोर्टात हजर राहिले नाहीत. त्यामुळे कोर्टाने त्यांच्याविरोधात बेलेबल वॉरंट जारी केलं आहे.

संजय राऊत अब्रुनुकसान प्रकरणी मोठी बातमी, नितेश राणे यांच्याविरोधात कोर्टाकडून वॉरंट
NITESH RANE AND RAUT
Follow us
| Updated on: Nov 21, 2023 | 4:12 PM

अक्षय कुडकेलवार, Tv9 मराठी, मुंबई | 21 नोव्हेंबर 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अब्रुनुकसानीच्या दावा प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना वॉरंट बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नितेश राणे यांना माझगाव कोर्टाने सुनावणीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं होतं. पण माझगाव कोर्टाने समन्स बजावल्यानंतरही नितेश राणे सुनावणीला हजर राहिले नाहीत. त्यानंतर माझगाव कोर्टाकडून नितेश राणे यांच्याविरोधात बेलेबल वॉरंट जारी करण्यात आलं. त्यामुळे आता नितेश राणे यांना कोर्टात उपस्थित राहून जामीन घ्यावा लागणार आहे.

नितेश राणे यांच्याकडून 7 मे रोजी एक वक्तव्य करण्यात आलं होतं. येत्या 10 जूनपर्यंत संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील, असं नितेश राणे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर संजय राऊत यांनी अब्रुनुकसानीचा दावा केला होता. याच प्रकरणी माझगाव कोर्टाने नितेश राणे यांना समन्स बजावले होते.

नितेश राणे यांच्याविरोधात बेलेबल वॉरंट

दुसरीकडे नितेश राणे यांनी कोर्टाकडून बजावण्यात आलेलं समन्स आपल्यापर्यंत पोहोचलं नाही, असं नितेश राणे यांनी सांगितलं आहे. नितेश राणे यांनी आज कोर्टात हजर राहणं आवश्यक होतं. ते कोर्टात हजर राहिले नाहीत तरी त्यांच्या वकिलांकडून उत्तर देणं अपेक्षित होतं. पण तसं काही झालं नाही. त्यामुळे कोर्टाने नितेश राणे यांच्याविरोधात बेलेबल वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे आता नितेश राणे यांना कोर्टात उपस्थित राहून जामीन घ्यावं लागणार आहे.

नितेश राणे यांच्याकडून संजय राऊतांवर टीका

नितेश राणे आणि संजय राऊत यांच्यात सातत्याने वाकयुद्ध रंगलेलं बघायला मिळतं. नितेश राणे यांच्याकडून सातत्याने संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली जाते. संजय राऊत यांनी नुकतंच एका कॅसिनोतला फोटो ट्विट केला होता. या फोटोवरुन नवा वाद निर्माण झाला होता. फोटोतील व्यक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असल्याची चर्चा होती. तर भाजपने त्यावर स्पष्टीकरण दिलं होतं. बावनकुळे आपल्या आयुष्यात कधीच जुगार खेळले नाहीत, असं स्पष्टीकरण भाजपकडून देण्यात आलं होतं. राऊतांनी ट्विट केलेल्या या फोटोवर नितेश राणे यांनी सडकून टीका केली होती.

Non Stop LIVE Update
गुणरत्न सदावर्तेंना सर्वात मोठा झटका, ST कर्मचारी बँकेतील 17 संचालक...
गुणरत्न सदावर्तेंना सर्वात मोठा झटका, ST कर्मचारी बँकेतील 17 संचालक....
५ राज्यांचा एक्झिट पोल, कुठं कुणाची सत्ता येणार? बघा tv9 मराठीवर
५ राज्यांचा एक्झिट पोल, कुठं कुणाची सत्ता येणार? बघा tv9 मराठीवर.
अस्मानी संकट पण सुलतान कुठे? शिंदेंच्या प्रचार दौऱ्यावरून कुणाची टीका?
अस्मानी संकट पण सुलतान कुठे? शिंदेंच्या प्रचार दौऱ्यावरून कुणाची टीका?.
मोदींसोबत जवळीक वाढवण्यासाठी शिंदेंचा खटाटोप, उबाठा नेत्याचा टोला काय?
मोदींसोबत जवळीक वाढवण्यासाठी शिंदेंचा खटाटोप, उबाठा नेत्याचा टोला काय?.
मनोज जरांगे पाटील लहान, त्यांनी अभ्यास करावा; कुणी दिला खोचक सल्ला
मनोज जरांगे पाटील लहान, त्यांनी अभ्यास करावा; कुणी दिला खोचक सल्ला.
... अन् छगन भुजबळ यांच्यासमोरच शेतकरी महिलेला अश्रू अनावर
... अन् छगन भुजबळ यांच्यासमोरच शेतकरी महिलेला अश्रू अनावर.
तेव्हा NCP चा CM का झाला नाही? अजितदादा तुम्हीच सांगा; तटकरेंचं साकडं
तेव्हा NCP चा CM का झाला नाही? अजितदादा तुम्हीच सांगा; तटकरेंचं साकडं.
अजित पवार ३१ डिसेंबरला मुख्यमंत्री होणार? संजय राऊतांचं नवं भाकीत काय?
अजित पवार ३१ डिसेंबरला मुख्यमंत्री होणार? संजय राऊतांचं नवं भाकीत काय?.
मग तुमच्या मनात जे आहे ते, अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य
मग तुमच्या मनात जे आहे ते, अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य.
... तेव्हा झोपले होते, भाजपच्या नेत्यानं आरक्षणावरून कुणाला सुनावलं
... तेव्हा झोपले होते, भाजपच्या नेत्यानं आरक्षणावरून कुणाला सुनावलं.