Nagpur Crime | दाभा, बेलतरोडीत दरोडेखोरांचा धुमाकूळ, पोलिसांची उडविली होती झोप; सराफा व्यवसायिकासह सात जणांना अटक

20 दिवसांत सात आरोपींना अटक केली. मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे. ही आंतरराज्यीय टोळी असल्यानं आरोपींना अटक करण्यास वेळ लागला.

Nagpur Crime | दाभा, बेलतरोडीत दरोडेखोरांचा धुमाकूळ, पोलिसांची उडविली होती झोप; सराफा व्यवसायिकासह सात जणांना अटक
डॉ. रेखा कदम यांच्या घराची झडती, काळवीटाचे कातडे जप्त
सुनील ढगे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Dec 25, 2021 | 10:54 AM

नागपूर : दाभा, बेलतरोडी हद्दीत दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला होता. तीन-चार घरी दरोडा पडल्यानं पोलिसांची झोप उडाली होती. तपासाचे चक्र फिरवत त्यांनी 20 दिवसांत सात आरोपींना अटक केली. मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे. ही आंतरराज्यीय टोळी असल्यानं आरोपींना अटक करण्यात वेळ लागला.

 

असा लागला आरोपींचा शोध

दाभा, बेलतरोडीत दरोड्याच्या घटना वाढल्या होत्या. तीन डिसेंबरला अनिता मेश्राम यांच्याकडे घरफोडी झाली. दहा डिसेंबरला मंगेश वांद्रे यांच्याकडे दरोडा पडला. त्यामुळं पोलिसांची तारांबळ उडाली. सीसीटीव्हीची आधार घेण्यात आला. दरोडेखोर रामझुला, संविधान चौकाच्या फुटपाथवर राहत होते. तिथंच त्यांनी हिस्सेवाटप केले होते. चंगीराम नावाचा आरोपी तिथंच वास्तव्यास असल्याचं दिसत होतं. याचा धागा पकडून मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशात छापेमारी करण्यात आली.

 

अटकेतील आरोपी

अलाहाबाद गुन्हे शाखेची मदत घेण्यात आली. तिथल्या पारधी बेड्यावर छापा मारण्यात आला. रायसेनजवळील गुलगाव सांचीचा मोंग्या चंगीराम गोसाई (वय 21), माणिकपूरचा निर्मल रोशनलाल मोंग्या (वय 20), चित्रकूटचा रोहित भगत (वय 24), विदिशाजवळील धामरमुडा येथील पिंट्या मोंग्या अशा आरोपींना अटक केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याची विल्हेवाट लावणारे गोधनीचे सराफा व्यापारी प्रवीण कानोले त्यांचा नोकर संदेश रोकडे तसेच बोलेरोचालक कपीलनगरचा हरी श्रीराम आसोले यांना अटक करण्यात आली. या टोळीविरुद्ध अनेक राज्यांत गुन्हे दाखल आहेत.

 

यांनी केली कामगिरी

पोलिसांनी या टोळीकडून आठ मोबाईल, बोलेरो पिकअप जप्त केली. मुख्य आरोपी चंगीराम व त्याचे साथीदार फरार आहेत. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहआयुक्त अस्वती दोरजे, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त चिन्मय पंडित, यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, सहायक निरीक्षक मयूर चौरसिया, गणेश पवार, उपनिरीक्षक बलराम झाडोकर, लक्ष्मीछाया तांबूसकर, कर्मचारी संतोष मदनकर, राजेश तिवारी, आशीष ठाकरे आदींनी ही कामगिरी बजावली.

NMC Scam | स्टेशनरी घोटाळा : साकोरे कुटुंबीयांना 40 वर्षांपासून कंत्राट; पाच नव्हे सात कंपन्या!

Nagpur Crime | जीवन नकोसे झाले! विष घेऊन गळफास; 20 दिवस व्हेंटिलेटवर तरीही तुटली नाही आयुष्याची दोरी

Nagpur | सामूहिक बलात्कार प्रकरण : अडीच महिन्यांपासून आरोपी फरार; कसे आले पोलिसांच्या जाळ्यात?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें