Dinosaur Fossil चंद्रपुरात आढळले डायनासोरचे जीवाश्म, प्रा. सुरेश चोपणे यांचे संशोधन

चोपणे यांनी जीवाश्म स्थळी भेट देवून निरीक्षणे केले. ती हाडे जीवाश्म असून डायनासोर किंवा हत्तीसारख्या मोठ्या प्राण्याची असावी असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

Dinosaur Fossil चंद्रपुरात आढळले डायनासोरचे जीवाश्म, प्रा. सुरेश चोपणे यांचे संशोधन
जीवाष्माचे निरीक्षण करताना प्रा. सुरेश चोपणे.

चंद्रपूर : चंद्रपुरात डायनासोरचे जीवाश्म आढळले आहेत. भूशास्त्रज्ञ प्रा. सुरेश चोपणे यांनी याबाबत संशोधन केले आहे. हे जीवाश्म चार फूट लांब आहेत. पिजदुरा तसेच गडचिरोली जिल्ह्यातील वडधम येथे यापूर्वी अशाप्रकारचे जीवाश्म सापडले होते. या संशोधनामुळं जागतिक स्तरावर पुन्हा एकदा चंद्रपूरची चर्चा सुरू झाली आहे.

वडधाम येथे डायनासोरचे जीवाश्म

विभाजन पूर्व चंद्रपूर जिल्ह्यातील भूभागावर ज्युरासिक काळात डायनासोरचे अस्तित्व होते. ज्युरासिक काळात येथील जलाशयात जलचर प्राण्यांचा वावर होता. तर, महाकाय डायनासोर येथे अस्तित्वात होते. याचे पुरावे जिल्ह्यातील भूभागात आढळले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील पिजदुरा आणि गडचिरोली जिल्ह्यातील वडधम येथे डायनासोरचे जीवाश्म यापूर्वी आढळले आहेत.

चार फूट लांब पायाचे हाड

देशा-विदेशातील अभ्यासक दरवर्षी पिजदुरा येथे भेट देऊन जीवाश्मांचा अभ्यास करतात. आता नव्यानं डायनासोरचे जीवाश्म आढळले आहेत. जिल्ह्यातील भूशास्त्रज्ञ प्रा. सुरेश चोपणे यांनी चार फूट लांब डायनासोरचे जीवाश्म शोधून काढले. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात ४ फूट लांब आणि १ फूट रुंद पायाचे हाड, ३ फूट लांब बरगडीचे हाड प्रा. चोपणे यांनी शोधले. त्यांचा आकार पाहता ते डायनासोर या विशालकाय प्राण्याचे असावे, असा अंदाज प्रा. चोपणे यांनी काढला आहे.

हिमयुगीन दगड गाळाचा थर

वरोरा तालुक्याच्या पश्चिमेला तुळाना गावाजवळून वर्धा नदी वाहते. नदीच्या पात्रात काही ठिकाणी हिमयुगीन काळातील दगड-गाळाचा थर आढळला. याच ठिकाणी पुरातन बेसाल्ट खडकाचे थर आढळले. दोन्ही थरांची सळमिसळ झाल्याने काळाचा अंदाच घेणे कठीण असल्याचे चोपणे म्हणतात. स्थानिक शेतकरी विजय ठेंगणे, शाळकरी मुले नदी पात्रात फिरत असताना त्यांना हाड सदृश्य खडक आढळला. याची माहिती संशोधक प्रा. चोपणे यांना मिळाली. चोपणे यांनी जीवाश्म स्थळी भेट देवून निरीक्षणे केले. ती हाडे जीवाश्म असून डायनासोर किंवा हत्तीसारख्या मोठ्या प्राण्याची असावी असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

Nagpur Tiger महाराजबागेतील प्राण्यांची विशेष काळजी, थंडीपासून बचावासाठी हिटरची ऊब

Vidarbha Movement! विदर्भ राज्य आंदोलन पार्टी आक्रमक, केंद्र सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

Published On - 5:52 pm, Thu, 2 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI