AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidarbha cold | विदर्भात तापमानात पाच अंशांची घसरण, थंडीची परमोच्च अनुभूती

विदर्भात शनिवारी सकाळी सर्वाधिक कमी तापमानाची नोंद गोंदियात 7.4 अंश सेल्सिअस झाली. तर त्यानंतर नागपुरात 7.6 अंश सेल्सिअस तापमान होतं. या तापमानामुळं विदर्भवासी चांगलेच गारठलेत.

Vidarbha cold | विदर्भात तापमानात पाच अंशांची घसरण, थंडीची परमोच्च अनुभूती
प्रादेशिक हवामान विभाग, नागपूर
| Edited By: | Updated on: Jan 29, 2022 | 10:38 AM
Share

नागपूर : नागपूरसह विदर्भात थंडीचा (Vidarbha cold) तडाखा कायम आहे. कमाल आणि किमान तापमानात (In temperature) सुमारे चार ते पाच अंशांची घसरण झाली. त्यामुळं विदर्भातील वातावरण चांगलेच गारठले आहे. विदर्भात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद गोंदियात 7.4 अंश सेल्सिअस झाली. नागपुरात तापमानाचा पारा घसरलाय. 7.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद शनिवारी हवामान विभागानं केली. गडचिरोली 8.6, तर वर्धा येथे 8.8 अंश तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भातील इतर जिल्ह्यात सुद्धा थंडीचा मोठा प्रभाव पाहायला मिळतो. सतत वारे वाहत असल्याने ही थंडी बोचरी ठरत आहे. या थंडीचा आनंद नागपूरकर चांगलाच घेत आहेत. गुलाबी थंडीमध्ये कोणी मॉर्निंग वॉकचा (Morning walk) आनंद घेत आहे. तर काही जण शेकोटी पेटवून ऊब घेताना दिसत आहेत. गरमागरम चहा आणि नास्ता करण्याचा आनंद घेत आहेत.

विदर्भात गोंदिया जिल्हा सर्वाधिक थंड

7.4 हे महिन्याभरातील सर्वात कमी तापमान आहे. गोंदिया जिल्ह्यात हे कमी तापमान नोंदविण्यात आले. 28 जानेवारीला 8.4, तर 27 जानेवारीला 8.3 एवढे कमी तापमान नागपुरात नोंदविले गेले होते. त्याहीपेक्षा म्हणजे जानेवारी महिन्यातील सर्वात कमी तापमान शनिवारी नोंदविले गेले. गेल्या तीन दिवसांपासून कमीतकमी तापमान आठ अंश सेल्सिअसच्या जवळपासआहे. त्यामुळे विदर्भवासी गारठून गेले आहेत. सकाळी उठण्याची इच्छा होत नाही. या थंडीमुळं बऱ्याच जणांनी सकाळी बाहेर फिरायला जाणे बंद केले.

बोचऱ्या थंडीने घराबाहेर पडणे कठीण

बोचऱ्या थंडीने नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. दिवसाही शेकोट्या पेटलेल्या पाहायला मिळत आहेत. थंडीचा तडाखा एवढा आहे की लोकांना घराबाहेर पडणे त्रासदायक झाले आहे. मोठ्या प्रमाणावर वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळं यात आणखी भर पडत आहे. लोकांच्या अंगावर गरम कपडे सातत्याने दिसत आहेत. तर दिवसा शेकोट्या पेटलेल्या पहायला मिळत आहेत.

चिखलदऱ्यात दवबिंदू गोठले

चिखलदरा परिसरातील दवबिंदू गोठल्याचे पाहायला मिळाले. सततच्या गारव्यामुळं कमालीची थंडी आहे. तापमान तीन ते चार डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आले. बरमासक्ती परिसरात दवबिंदू गोठल्याचे पाहावयास मिळाले. संक्रांतीपासून थंडी कमी होते. पण, यंदा उलटं चित्र पाहावयास मिळालं. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात थंडीने चांगलेच वातावरण थंड केले.

Nagpur NMC | नागपूर महापालिका निवडणुकीचा धुरळा, काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येणार का?, सामान्य कार्यकर्त्यांना काय वाटतं?

Nagpur Medical | मेडिकलमधील अद्ययावत कँसर हॉस्पिटलचे काय होणार?, बांधकामाचे 33 कोटी परत जाण्याच्या मार्गावर

WhatsApp group | आता व्हॅाट्सॲप ग्रुप ॲडमीनची ‘पॅावर’ वाढणार; म्हणजे मॅसेजबाबत नेमकं काय होणार?

आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.