AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राखेनं केली राखरांगोळी, फ्लाय अॅशचा 18 गावांना धोका, सांगा कसं जगायचं?

या परिसरातील २१ गावांपैकी १८ गावे ही फ्लाय अॅश अनेक ठिकाणी साचून राहते. त्यामुळं त्यांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आल्याचं श्रीपाद धर्माधिकारी यांनी सांगितलं.

राखेनं केली राखरांगोळी, फ्लाय अॅशचा 18 गावांना धोका, सांगा कसं जगायचं?
| Edited By: | Updated on: Nov 19, 2021 | 5:48 PM
Share

नागपूर : कोराडी आणि खापरखेडा विद्युतनिर्मिती प्रकल्पातील राखेनं आमच्या आयुष्याचीच राखरांगोळी केली. असं मत स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केलंय. या परिसरातील २१ गावांपैकी १८ गावे ही फ्लाय अॅश अनेक ठिकाणी साचून राहते. त्यामुळं त्यांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आल्याचं श्रीपाद धर्माधिकारी यांनी सांगितलं. सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, मंथन अध्ययन केंद्र आणि असर संस्थेनं याबद्दल सर्वे केला होता.

विद्युत निर्मिती प्रकल्पाची फ्लाय अॅश (राख) पाण्याचे साठे, घरे, शेतजमिनी, मोकळ्या जागा आणि वाहनांवर साचून राहते. तसेच त्यांचे अॅश पॉण्ड यांच्याद्वारे पाण्याचे स्थानिक प्रवाह आणि कोलार आणि कन्हान नदीमध्ये सांडपाणी थेट सोडले जात आहे. हे सांडपाणी फ्लाय अॅश मिश्रित आहे. भूपृष्ठावर पाणी, भूजल आणि वॉटर एटीम अशा २५ ठिकाणांहून पाण्याचे नमुने जमा करण्यात आले. त्यातून हा निष्कर्ष काढण्यात आला.

मर्क्युरी हा सर्वाधिक विषारी

पावसाळ्यासह प्रत्येक मोसमातील पाण्याचे जवळपास सर्व नमुने हे ब्युरो ऑफ स्टॅण्डर्ड्सने पिण्याच्या पाण्यासाठी आखलेले निकष पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत. वॉटर एटीएममधून (ऑटोमेटिक वॉटर डिस्पेन्सेशन सिस्टिम) मिळालेल्या पाण्याचे नमुने हेच फक्त त्यासाठी अपवाद ठरले आहेत. पाण्याच्या कित्येक नमुन्यांत मर्क्युरी, अर्सेनिक, लिथिअम, अॅल्युमिनिअम इ. विषारी घटकांचे प्रमाण सुरक्षित पातळीच्या १० ते १५ पटीने अधिक असल्याचे अभ्यासामध्ये आढळून आले. मानवासाठी ज्ञात विषारी घटकांमध्ये मर्क्युरी हा सर्वाधिक विषारी आहे. आर्सेनिकचा संबंध लिव्हर आणि ब्लड कॅन्सरशी आहे.

फुफ्फुसाचे आजारही वाढले

भूपृष्ठावरील पाणी आणि भूजल दोन्हींमध्ये मोठ्या प्रमाणात गढूळपणा, जडपणा, क्षारता आणि डिसॉवल्ड सॉलिड्स (टीडीएस- विरघळलेली घनतत्वं) यांचे अस्तित्व अधिक पातळीत दिसले. त्याचबरोबर अॅन्टीमॉनी, अॅल्युमिनिअम, आर्सेनिक, बोरोन, फ्लुरॉईड, आयर्न, मँगनिज, मॅग्नेशिअम, मर्क्युरी, मॉलिबडेनम, लिथिअम, लेड आणि सेलेनिअम यांचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात आढळले. आर्सेनिक, कॅडमिअम, क्रोमिअम, लेड, मँगेनीज, मर्क्युरी, सेलेनिअम, कोबाल्ट, कॉपर, निकेल, झिंक, फ्लुरॉईड आणि तेल व ग्रीस असे अनेक प्रदूषक घटक दोन्ही विद्युत निर्मिती केंद्राच्या फ्लाय अॅशमध्ये दिसून आले. फ्लाय अॅश मिश्रित हवा श्वसनाद्वारे ताबडतोब फुफ्फुसापर्यंत पोहचते. त्यावेळी एकीकडे फ्लाय अॅश हे पार्टिक्यूलेट मॅटर (बारीक कणांच्या स्वरुपात प्रदूषण) असल्याने त्रास होतो आणि त्यातील जड धातूदेखील थेट फुफ्फुसात जातात. जेव्हा फ्लाय अॅश पाण्यात मिसळते तेव्हा हेच जड धातू पाण्यात विरघळतात.

कोराडी, खापरखेडा प्रकल्पाचा धोका, हवा-पाणी-माती प्रदूषित, पर्यावरणावर परिणाम

माजी महापौर अटल बहाद्दूर सिंग यांचे निधन, नागपूर मनपातील किंगमेकर हरवला

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.