AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur University | नागपूर विद्यापीठाच्या जागेत 8 हजार वृक्षांचे वन आच्छादन; कुलगुरू व मनपा आयुक्तांच्या हस्ते वृक्षलागवडीचा शुभारंभ

वृक्ष लागवडीसाठी विद्यापीठाने मनपाला 15 एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. या जागेत सावलीची आणि फळझाडे अशी विविध प्रजातींची 8 हजार रोपे लावण्यात येणार आहेत. ओसाड जमिनीवर वृक्ष लागवडीद्वारे वन आच्छादन करून येथे पशू-पक्षी तसेच इतर किटकांसाठी अधिवास निर्माण होणार आहे.

Nagpur University | नागपूर विद्यापीठाच्या जागेत 8 हजार वृक्षांचे वन आच्छादन; कुलगुरू व मनपा आयुक्तांच्या हस्ते वृक्षलागवडीचा शुभारंभ
नागपूर विद्यापीठाच्या जागेत वृक्षलागवड करताना कुलगुरू व मनपा आयुक्त. Image Credit source: tv 9
| Updated on: May 01, 2022 | 7:48 AM
Share

नागपूर : नागपूर महापालिकेतर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर वि‌द्यापीठाच्या (Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University) जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत परिसरातील जागेमध्ये आठ हजार रोपांची लागवड करून येथे वन आच्छादन करण्यात येणार आहे. या वृक्ष लागवड कार्याचा शनिवारी विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरी (Vice-Chancellor Subhash Chaudhary) व मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. (Administrator Radhakrishnan b.) यांच्या हस्ते शुभारंभ झाला. याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू संजय दुधे, कुलसचिव राजू हिवसे, मनपाचे उपायुक्त रवींद्र भेलावे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, विद्यापीठाच्या ज्ञानस्त्रोत विभागाचे संचालक डॉ. विजय खंडार, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. माहेश्वरी, वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता डॉ. संजय कविश्वर, डॉ. दत्तात्रय वाटमोडे, मानवविज्ञान विभागाच्या अधिष्ठाता डॉ. राजश्री वैष्णव यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारा

नागपूर शहरातील वायू गुणवत्ता सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनाकडून 15व्या वित्त आयोगाअंतर्गत मनपाला 2 कोटी 14 लाख रुपये प्राप्त झाले आहेत. या निधीमधून विद्यापीठाच्या 15 एकर जागेमध्ये वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरी व मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू संजय दुधे, कुलसचिव राजू हिवसे यांनी कुदळ मारून वृक्ष लागवड कार्याचा शुभारंभ केला. याशिवाय त्यांनी संयुक्तरित्या वृक्ष लागवडही केली. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी संपूर्ण जागेची पाहणी. या ठिकाणी वृक्ष लागवड, झाडांना पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्याबाबत त्यांनी प्रशासनाला निर्देश दिले.

अर्बन फॉरेस्ट प्रकल्प

वृक्ष लागवडीसाठी विद्यापीठाने मनपाला 15 एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. या जागेत सावलीची आणि फळझाडे अशी विविध प्रजातींची 8 हजार रोपे लावण्यात येणार आहेत. ओसाड जमिनीवर वृक्ष लागवडीद्वारे वन आच्छादन करून येथे पशू-पक्षी तसेच इतर किटकांसाठी अधिवास निर्माण होणार आहे. याशिवाय शहरातील नागरिकांना विरंगुळा करण्यासाठी थंड जागा उपलब्ध होईल. विद्यापीठाच्या 15 एकर मोकळ्या जागेमध्ये संपूर्ण शहराकरिता ‘ब्लॉक प्लँटेशन’ अर्थात ‘अर्बन फॉरेस्ट’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. मनपाद्वारे वृक्ष लागवडीसाठी मे. तेजस सुपरस्ट्रक्चर प्रा. लि. उस्मानाबाद या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर कंत्राटदाराला लागलेल्या झाडांची 3 वर्षांकरिता देखभाल करायची आहे. कार्यक्रमाचे संचालन डॉ. धर्मेश धवनकर यांनी केले.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.