माजी महापौर संदीप जोशींच्या ट्विटची जोरदार चर्चा, सॉरीनंतर पुन्हा शेम ऑन यू

माजी महापौर संदीप जोशींच्या ट्विटची जोरदार चर्चा, सॉरीनंतर पुन्हा शेम ऑन यू
संदीप जोशी यांनी वंजारीनगराला जोडणाऱ्या पुलाच्या बांधकामावरुन टीका केली आहे.

हिल्या ट्विटमध्ये चुकीची माहिती असल्याचे लक्षात येताच संदीप जोशी यांनी सॉरी म्हणत सार्वजनिक बांधकाम विभागााला शेम ऑन यू म्हटलंय. (Sandip Joshi wanjari nagar pool)

prajwal dhage

|

Jan 21, 2021 | 8:55 AM

नागपूर : माजी महापौर संदीप जोशींनी नव्या पुलाच्या बांधकामावरुन केलेल्या ट्विटची नागपुरात जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांनी केलेल्या पहिल्या ट्विटमध्ये चुकीची माहिती असल्याचे लक्षात येताच त्यांनी सॉरी म्हणत पुन्हा एकादा ट्विट करत शेम ऑन यू म्हटलंय. त्यांनी पहिल्या ट्विटमध्ये वंजारीनगरला जोडण्यात येणाऱ्या नव्या पुलाच्या बांधकामावर आक्षेप नोंदवला. मात्र, पुलाचे बांधकाम करणाऱ्या संस्थेच्या नावाबाबत त्यांच्याकडून गफलत झाल्याचे लक्षात येताच त्यांनी दुसरे ट्विट करत आधी सॉरी म्हणत पुन्हा सार्वजनिक विभागाला उद्देशून  शेम ऑन यू म्हटलं आहे. (former mayor Sandip Joshi criticizes PWD on construction of wanjari nagar pool)

नेमकं प्रकरण काय?

नागपुरातील वंजारीनगराला जोडण्यासाठी नव्या पुलाचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामावर संदीप जोशी यांनी आक्षेप नोंदवला आहे. वंजारी नगराला जोडण्यात येणारा हा पूल आगामी काळात अपघाताचे नवे स्थळ होणार असल्याचे संदीप जोशी यांनी म्हटलंय. आपल्या पहिल्या ट्विटमध्ये पुलाच्या बांधकामाचा फोटो टाकत त्यांनी राष्ट्रीय प्राधिकरणाला धारेवर धरलं. तसेच, शेम ऑन यू म्हणत प्राधिकरणावर जोरदार टीका केली. त्यांच्या या ट्विटनंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, काही वेळानंतर हा पूल राष्ट्रीय प्राधिकरणाने नव्हे तर सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधल्याचे त्यांच्या लक्षात आले. आपली ही चूक दुरुस्त करत त्यांनी पुन्हा एक ट्विट केले.

आपल्या पहिल्या ट्विटमध्ये चुकीची माहिती दिल्याबद्दल सॉरी म्हणत वंजारीनगरचा पूल राष्ट्रीय प्राधिकरणाने बांदला नसून सांर्वजनिक बांधकाम विभागाने बांधल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी सार्वजिनक बांधकाम विभागालासुद्धा पुलाच्या बांधकामावरुन धारेवर धरत शेम ऑन यू म्हटलं.

दरम्यान, संदीप जोशी यांच्या या ट्विट्समुळे नागपुरात अनेक चर्चांना उधाण आले आहे. जोशी यांचा टोला नेमका कोणाला होता?, याची चर्चा सध्या सुरु आहे. तसेच त्यांच्या ट्विटमध्ये ट्विस्ट का आले?, अशी कुजबूज नागपुरात सुरु आहे.

संबंधित बातम्या :

नागपुरात भाजपचा महापौर निश्चित, तरीही काँग्रेसकडून दोघांना उमेदवारी

नागपूरचा नवा महापौर, उपमहापौर कोण? निवडणूक ऑनलाईन होणार!

नागपूर महापौरपदी भाजपचे दयाशंकर तिवारी, काँग्रेस उमेदवाराचा पराभव

(former mayor Sandip Joshi criticizes PWD on construction of wanjari nagar pool)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें