AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vedio : Nagpur | दीक्षाभूमीवर भीमसैनिकांची गर्दी, सामाजिक अंतर पाळत केले बाबासाहेबांना अभिवादन

बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी भावना बौद्ध अनुयायी व्यक्त करतात. 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भिकाची लेकरं टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

Vedio : Nagpur | दीक्षाभूमीवर भीमसैनिकांची गर्दी, सामाजिक अंतर पाळत केले बाबासाहेबांना अभिवादन
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Dec 06, 2021 | 7:51 PM
Share

नागपूर : भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज नागपुरातील दीक्षाभूमीवर अनुयायांची गर्दी होती. नागपूरसह परिसरातील अनेक बौद्ध बांधव दीक्षाभूमीवर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करायला आले होते. बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी भावना बौद्ध अनुयायी व्यक्त करतात. 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भिकाची लेकरं टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

बहुतेक अनुयायांचे घरी राहूनच अभिवादन

महापरिनिर्वाण दिन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यामुळे ओमिक्रॉन या कोरोना विषाणुच्या प्रजातीमुळे कोविड संसर्गाचा वाढलेला धोक्याचा विचार करता महापरिनिर्वाण दिनी सर्व अनुयायी काळजी घेताना दिसले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त बहुतेक अनुयायांनी दीक्षाभूमी येथे न येता घरी राहूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.

मास्क, सॅनिटायझरचा वापर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दीक्षाभूमी येथे अभिवादन करताना कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असणे बंधनकारक होते. तसेच भाविकांच्या शरीराचे तापमानही तपासण्यात आले. ज्यांचे तापमान सामान्य असतील त्यांनाच कार्यक्रमात उपस्थित राहता आले. कार्यक्रमाच्या ठिकाणी मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर रोजीचा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टिकोनातून पूर्ण खबरदारी घेण्यात येत आहे. मागील दोन वर्षापासून सुरु असलेल्या कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात येत आहे. ओमिक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिाकांमध्ये तीव्रतेने पसरते.

संबंधित बातम्या 

Nagpur | बाबासाहेबांच्या वस्तू टिकणार 100 वर्षे, प्रयोगशाळेत केली जातेय रासायनिक प्रक्रिया

Nagpur Deekshabhoomi | बाबासाहेबांच्या निर्वाणाचा सांगावा पोचवणारे दामू मोरे, महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला आठवणीला उजाळा

Follow Us
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने उचलले टोकाचे पाऊल
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... संजय
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... बापरे! संजय राऊत हे काय बोलून गेले? थेट सोने तस्करीशी कनेक्शन!
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण आणि त्याची मैत्रीण... नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई, तब्बल 5 कोटीचं सोनं...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल