AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Plane Emergency Landing : विमान हवेत असताना अचानक पक्षी धडकला, त्यानंतर…विमानात 272 प्रवासी, नागपुरची घटना

Plane Emergency Landing : एविएशन इंडस्ट्रीमध्ये पक्ष्याची धडक एक गंभीर घटना मानली जाते. खासकरुन टेक-ऑफ आणि लँडिंगच्यावेळी यामुळे गंभीर धोका उत्पन्न होऊ शकतो. अनेकदा पक्ष्याच्या धडकेमुळे किंवा पक्षी इंजिनमध्ये फसल्याने टेक्निकल खराबी येते.

Plane Emergency Landing : विमान हवेत असताना अचानक पक्षी धडकला, त्यानंतर...विमानात 272 प्रवासी, नागपुरची घटना
Plane Emergency Landing
| Updated on: Sep 02, 2025 | 11:52 AM
Share

नागपुरहून कोलकाता येथे निघालेल्या इंडिगोच्या विमानाने अचानक इमर्जन्सी लँडिंग केलं. विमानाला अचानक पक्षी धडकला. या नंतर वैमानिकाने नागपूर येथे विमानाचं इमर्जन्सी लँडिंग केलं. या घटनेच्यावेळी विमानात 272 प्रवासी होते. हवेत विमान उड्डाणवस्थेत असताना पक्षी धडकल्याने विमानाच्या पुढच्या भागाच नुकसान झालं. वैमानिकाने वेळीच निर्णय घेतल्याने एक मोठा हवाई अपघात टळला. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. कुठलही नुकसान झालेलं नाहीय.

विमानाला पक्षी धडकल्यानंतर विमानाच संतुलन बिघडलं. प्रवाशांमध्ये घबराट पसरली. लोक दहशतीमध्ये आले. केबिन क्रू ने प्रवाशांना शांत राहण्याचं आवाहन केलं. पायलट समयसूचकता दाखवत तात्काळ विमानाचं इमर्जन्सी लँडिंग केलं. विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगनंतर सीनियर एयरपोर्ट डायरेक्टर आबिद रूही यांचं स्टेटमेंट समोर आलय. इंडिगोच्या नागपूर-कोलकाता 6E812 विमानाला पक्षी धडकल्याची शक्यता आहे. आम्ही घटनेची चौकशी करत आहोत.

पक्ष्याची धडक एक गंभीर घटना

इर्मजन्सी लँडिंगमागे बर्ड हिट मुख्य कारण आहे. एविएशन इंडस्ट्रीमध्ये पक्ष्याची धडक एक गंभीर घटना मानली जाते. खासकरुन टेक-ऑफ आणि लँडिंगच्यावेळी यामुळे गंभीर धोका उत्पन्न होऊ शकतो. अनेकदा पक्ष्याच्या धडकेमुळे किंवा पक्षी इंजिनमध्ये फसल्याने टेक्निकल खराबी येते. पक्ष्याच्या धडकेमुळे विमान उड्डाण बाधित होतं.

याआधी 2 जूनला असं घडलेलं

याआधी 2 जूनला सुद्धा असच एक प्रकरण समोर आलं होतं. झारखंडची राजधानी रांची येथे जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटचं बर्ड हिटमुळे इमर्जन्सी लँडिंग करावं लागलेलं. पक्ष्याच्या धडकेमुळे आपातकालीन लँडिंग केल्याच अधिकाऱ्यांनी सांगितलेलं. विमानातील सर्वच्या सर्व 175 प्रवासी सुरक्षित होते.

3000 ते 4000 फूट उंचीवर ही घटना

रांचीच्या बिरसा मुंडा एअरपोर्टचे संचालक आरआर मौर्य यांनी सांगितलेलं की, इंडिगोच्या एक विमानाची रांचीजवळ पक्ष्याबरोबर धडक झाली. जवळपास 3000 ते 4000 फूट उंचीवर ही घटना घडली.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; कोर्टाने थेट....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; कोर्टाने थेट....
हा रडीचा डाव जनता उधळून लावेल; सामनातून सरकारवर हल्लाबोल
Saamana On BJP : हा रडीचा डाव जनता उधळून लावेल; सामनातून सरकारवर हल्लाबोल
10 तारखेनंतर शरद पवारांसोबत पुन्हा बैठक; राष्ट्रवादीच्या विलीनीकरण....
NCP  : 10 तारखेनंतर शरद पवारांसोबत पुन्हा बैठक; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मोठा निर्णय होणार?
गोकुळ तुमची जहागीर नाही...; सरकारी हस्तक्षेपावरून सतेज पाटलांचा...
Satej Patil On Gokul : गोकुळ तुमची जहागीर नाही...; सरकारी हस्तक्षेपावरून सतेज पाटलांचा सरकारला थेट इशारा
सहकारी संस्थांवर सरकारचा मोठा निर्णय; 500 कोटींच्या उलाढालीच्या....
Gokul Milk Union : सहकारी संस्थांवर सरकारचा मोठा निर्णय; 500 कोटींच्या उलाढालीच्या संस्थांवर...
61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य..
Raju Shetti On Sugarcane Farmers Protest : 61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य; राजू शेट्टींकडून आंदोलन मागे
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? तटकरेंच्या विधानावर अनिल....
NCP Merger : आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? सुनील तटकरेंच्या विधानावर अनिल देशमुखांचा थेट सवाल
गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Raj Thackeray On Gokul : गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर राज ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता...
NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता; त्या बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ