OBC : ओबीसींचे आरक्षण संपले? आरक्षणाच्या वादावर कोण भाजतोय पोळी? बबनराव तायवाडे यांच्या वक्तव्याने या नेत्यांना झोंबणार मिरची

OBC Reservation : मराठा आरक्षण जीआरमुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात येणार अशी टीका अनेकजण करत आहेत. पण ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांच्या वक्तव्याने त्यांना मिरच्या झोंबणार आहेत. नागपूर सध्या ओबीसी आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरत आहे, काय म्हणाले तायवाडे?

OBC : ओबीसींचे आरक्षण संपले? आरक्षणाच्या वादावर कोण भाजतोय पोळी? बबनराव तायवाडे यांच्या वक्तव्याने या नेत्यांना झोंबणार मिरची
बबनराव तायवाडे
| Edited By: | Updated on: Sep 16, 2025 | 12:31 PM

Babanrao Taywade : ओबीसी-मराठा आरक्षणासह बंजारा, धनगर, आदिवासी आरक्षणावरून राज्यात मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. त्यात मराठा आरक्षणाविषयीच्या जीआरने सध्या मोठा वाद सुरू आहे. ओबीसी नेत्यांनी या जीआरला विरोध सुरू केला आहे. या जीआरमुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात येण्याची दवंडी राज्यात पिटवण्यात येत आहे. राज्यात पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. ओबीसी आंदोलनाची राजकीय भूमी आणि भूमिका तापवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचवेळी ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांच्या वक्तव्याने ओबीसी नेत्यांना मिरच्या झोंबल्याशिवाय राहणार नाहीत. काय म्हणाले तायवाडे?

नेत्यांनी जाहीर भूमिका मांडावी

सध्या मराठा विरुद्ध ओबीसी आंदोलनाचे स्वरूप दिसत आहे. भरत कराड या तरुणाने भीतीपोटी आत्महत्या केली. नेते मंडळी बोलतात ओबीसींचे आरक्षण संपले. म्हणून आत्महत्या केली. अत्यंत दुःखदायक आणि वेदना पोहोचविणारी घटना.अशा प्रसंगी नेत्यांनी संपूर्ण समाजाचे मनोधैर्य वाढविण्याचे काम करायला हवे, असा भीम टोला तायवाडे यांनी ओबीसी आंदोलनावरून पोळी भाजणाऱ्या नेत्यांना लगावला.

आम्ही ओबीसींच्या संनिवधानिक आरक्षणाचे रक्षण करण्यास सक्षम आहोत असे नेत्यांनी सांगितले पाहिजे. तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे सांगायला हवे. आरक्षण टिकवू. ठाण्याचे आहे. आत्महत्येने पाहणे सुटत नाही. सर्व तरुणांनी सोबत आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबियांना मदत करा

मी महाराष्ट्र शासनाला विनंती करेन की मराठा समाजाच्या आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींना कुटुंबाला मदत केली आणि अरकारी नोकरीचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे ओबीसी समाजातील आत्महत्या करणाऱ्यांच्या कुटुंबियांना मदत आणि नोकरी दिली पाहिजे, अशी मागणी तायवाडे यांनी केली. सर्वांनी हिमतीने पुढे यायला हवे, आणि सोबत एकत्र आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी समाज बांधवांना केले.

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का नाही

ओबीसींचे आरक्षण संपले हे चुकीचे संदेश दिले जात आहे. मी पहिल्या दिवसापासून जबाबदारीने वक्तव्य केले की 2 सप्टेंबरच्या जी आर ने ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही, असा दावा तायवाडे यांनी पुन्हा केला. मराठा समाजात दोन गट आहेत. एक अभ्यासक लोकांचा गट आहे, तो गट म्हणतो की वंशावळीच्या ओबीसी नोंदी नसतील तर मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळणार नाही.

मराठा आणि ओबीसी आरक्षणाविषयी गैरसमज कोण पसरवत आहे ते सर्वांना माहीत आहे. लोकांचे राजकीय नेत्यांवर विश्वास असतो. म्हणून हे होते असा चिमटा तायवाडे यांनी राजकारण करणाऱ्यांना नेत्यांना काढला. नेत्यांनी सांगावे की आम्ही सक्षम आहोत. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असे सांगावे, अशी मागणी त्यांनी केली.

मेळाव्यातून मनोधैर्य वाढावे

मंत्री छगन भुजबळ यांच्या मेळाव्यावरही त्यांनी मत व्यक्त केले. साठ टक्के समाज असल्याने अनेक नेते असू शकतात. मेळावा होत असेल तर स्वागत करेन. पण त्यातून मनोधैर्य वाढावे असे वातावरण तयार करायला हवे, असे आवाहन त्यांनी केले. नेत्यांमुळे दिशाभूल आणि नैराश्याचे वातावरण असे म्हणणार नाही, असे त्यांनी सांगितले.

ज्यांना वाटते की समाजावर अन्याय त्यांनी कोर्टात जावे, मेळावे घ्यावे, मोर्चे काढावे, योग्य वाटते ते मार्ग स्वीकारावा. पण त्यातून समाजाचे मनोधैर्य वाढावे हाच हेतू असायला हवा. आम्ही चौदा मागण्या सविस्तर मांडल्या. बारा मागण्या मंत्र्यांनी मानल्या. दोन साठी मुख्यमंत्र्याशी बोलावे लागेल असे म्हणाले. आमची मुंबईत बैठक झाली. नंतर, त्यात सचिव स्तरावर आदेश देण्यात आले. आजच्या उपसमिती मध्ये चर्चा होईल.

लसीकरणाचे जुन्या रेकॉर्ड वर जातीचे उल्लेख त्याचा फायदा होईल काय? इंग्रजांच्या काळातील नोंदी असतील. पण ते कुठे राहत होते काय. 67 नंतर महाराष्ट्रात राहायला हवे असले पाहिजे. निवासी दाखले हवे.राजकारणी लोकांना राजकारण हवे असते. मी राजकारणी नाही, तर समाजसेवी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. मी आंदोलन केल्याने सरकारने 58 जी आर काढले, असे सांगायला बबनराव तायवाडे विसरले नाहीत.