नागपूर : कन्हान नदीत पोहायला गेलेले पाच युवक बुडाल्याची घटना नागपूरमध्ये समोर आली आहे. कामठी येथील अम्माचा दर्गा येथे सुरु असलेल्या ‘उर्स’मध्ये सहभागी होण्यासाठी यवतमाळहून एकूण दहा तरुण आले होते. दहा जणांपैकी पाच तरुणांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बुडालेल्या युवकांचा शोध घेण्याचे प्रयत्न कन्हान नदीपात्रात सुरु आहेत.