भाजपचे 9 आमदार, 30 नगरसेवकांचे कष्ट पाण्यात, संघाच्या स्वंयसेवकाची काँग्रेसच्या पॅनेलमधून मार्केट कमिटीत दमदार एन्ट्री

नागपूर जिल्ह्यातील कळमना मार्केट कमिटीत काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसच्या पॅनेलनं भाजपप्रणित पॅनेलचा पराभव केला. सुनिल केदार यांचं वर्चस्व या निकालामुळं प्रस्थापित झालंय. मात्र, या निकालातील वेगळेपणाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

भाजपचे 9 आमदार, 30 नगरसेवकांचे कष्ट पाण्यात, संघाच्या स्वंयसेवकाची काँग्रेसच्या पॅनेलमधून मार्केट कमिटीत दमदार एन्ट्री
अतुल सेनाड
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 10:35 AM

नागपूर: नागपूर जिल्ह्यातील कळमना मार्केट कमिटीत काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसच्या पॅनेलनं भाजपप्रणित पॅनेलचा पराभव केला. सुनिल केदार यांचं वर्चस्व या निकालामुळं प्रस्थापित झालंय. मात्र, या निकालातील वेगळेपणाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कट्टर स्वयंसेवक काँग्रेस समर्थनाने विजयी झाला आहे. सुनिल केदार गटातून संघ स्वयंसेवक विजयी झाला आहे. कळमना मार्केट संचालक पदी अतुल सेनाड विजयी झाले आहेत. ‘भाजपचे 30 नगरसेवक आणि 9 आमदार मला हरवायला लागले होते’ मात्र, मी विजय मिळवला असून ‘व्यापारी, शेतकरी हितासाठी काम करणार’ असल्याचं अतुल सेनाड यांनी टीव्ही 9 मराठीसोबत बोलताना सांगितलं आहे.

संघ स्वयंसवेक काँग्रेसच्या गटातून विजयी झाल्यान आश्चर्य

खुल्या बाजारात आशिया खंडीतली सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून कळमना बाजारपेठेची ओळख आहे. या कळमना बाजरपेठेच्या निवडणूकीत काँग्रेस नेते सुनील केदार गटातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक अतुल सेनाड संचालक म्हणून निवडणूक आलेय. संघाचा कट्टर स्वयंसेवक काँग्रेस समर्थित पॅनलवरुन निवडून आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

भाजपचे 30 नगरसेवक, 9 आमदार कामाला तरीही विजयी

“मला हरवण्यासाठी भाजपचे 30 नगरसेवक, 9 आमदार कामाला लागले होते, माझी उमेदवारी इतकी जिव्हारी त्यांना लागली होती, की आपला माणूस तिकडे कसा, असा त्यांना प्रश्न पडला होता. पण, सेवा करण्यासाठी कुठलंही बॅनर नाही, मी जन्मापासून संघाचा स्वयंसेवक आहे, मात्र, कळमना बाजारपेठेत सुनील केदारंच काही करु शकतात” विजयानंतर ही अशी प्रतिक्रिया अतुल सेनाड यांनी दिली आहे.

कळमना मार्केट कमिटीत सुनील केदारांचं वर्चस्व

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती ( कळमना मार्केट) च्या निवडणुकीत महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास ,क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांच्या सहकार पॅनलने इतिहास घडवत सर्व 18 ही जागांवर धडाक्यात विजय मिळवत विरोधकांचा धुव्वा उडविला आहे. सुनील केदार यांच्या सहकार पॅनेलचे सेवा सहकारी संस्था मतदार संघातून विजय चौधरी, वसंतराव लांडगे, प्रकाश नागपुरे, अजय राऊत, बेनिराम राऊत, अहमदभाई शेख, बाबाराव शिंदे, रवीचंद्राबाई नांदूरकर, अंजली शिंदे, हरिभाऊ गाडबैल, अशोक सोनवाने तसेच ग्रामपंचायत मतदारसंघातील संजय कुंटे, दीपक राऊत, महेश चोखंद्रे, नारायण कापसे तसेच व्यापारी मतदारसंघातील प्रकाश वाधवाणी,अतुल सेनाड व हमाल मतदारसंघातून किशोर पलांदूरकर यांनी घवघवीत विजय मिळविला आहे.भाजप ला मात्र या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही.

इतर बातम्या:

VIDEO | ट्रकची जोरदार धडक, केमिकल्सवाहू टँकर उलटून पेटला, दोघांचा मृत्यू

अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, पुण्यात जन्मदात्रीकडून तीन महिन्यांच्या बाळाचा खून

Nagpur Atul Senad RSS worker won election of Kalamana Market Committee in panel of Congress

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.