Devendra Fadanvis | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रथमच नागपुरात, भाजप कार्यकर्त्यांकडून धडाक्यात स्वागत, विजय रॅलीत पत्नी अमृता यांचाही समावेश

आजच्या विजयी रॅलीनंतर फार सेलिब्रेशन न करता लगेचच कामाला लागणार असल्याचं वक्तव्यही देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

Devendra Fadanvis |  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रथमच नागपुरात, भाजप कार्यकर्त्यांकडून धडाक्यात स्वागत, विजय रॅलीत पत्नी अमृता यांचाही समावेश
Image Credit source: ANI
Follow us
| Updated on: Jul 05, 2022 | 12:27 PM

नागपूर | देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज प्रथमच नागपुरात हजेरी लावली. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार उलथवून देत भाजप आणि शिंदेसेनेचं सरकार (Eknath Shinde Government) येण्यात देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका आहे. नागपूरचे भूमीपुत्र असल्यानं देवेंद्र फडणवीसांच्या कामगिरीनिमित्त भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. नागपूर विमानतळावर सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास देवेंद्र फडणवीस पोहोचले. विमानतळापासूनच भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी हजेरी लावली. फडणवीस यांनी विमानतळावर प्रवेश करताच, कोण आलं रे कोण आलं… असं म्हणत कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरु झाली. त्यानंतर विजयी रथावर स्वार होत देवेंद्र फडणवीस यांनी शहरातून रॅली काढण्यात आली. यावेळी फडणवीस यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यादेखील उपस्थित होत्या.

फडणवीसांच्या त्यागाची बॅनरबाजी

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या बाहेर राहून काम करण्याची इच्छा देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवली होती. मात्र ऐनवळी दिल्लीतील पक्ष श्रेष्ठींनी त्यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे अनुभवाने मोठे असूनही देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. फडणवीसांच्या या त्यागाची राज्यभर चर्चा आहे. याच मुद्द्यावरून आज नागपुरात मोठी बॅनरबाजी करण्यात आली. फडणवीस हे सकाळी साडे अकरा वाजता विमानतळावर पोहोचताच ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं.

भंडारा, गोंदिया, गडचिरोलीतील कार्यकर्ते

देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला केवळ नागपूर शहरातील भाजपचे कार्यकर्तेच नाही तर संपूर्ण विदर्भातील भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जमा झाले. फडणवीस यांच्या स्वागत करण्यासाठी भंडारा, गोंदिया, गडचिरोली येथून हजारो कार्यकर्ते आले. फडणवीस यांच्या विजयी रॅलीत या कार्यकर्त्यांनी उत्साहात सहभाग नोंदवला.

‘विदर्भ-मराठवाड्याचा विकास होणार’

देवेंद्र फडणवीस यांनी आज विमानतळावर पोहोचताच कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला. यावेळी टीव्ही 9 ला प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, आता विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या मागास भागाचा प्राधान्याने विचार केला जाईल. शेतकरी-कष्टकरी जनतेचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावले जातील. आजच्या विजयी रॅलीनंतर फार सेलिब्रेशन न करता लगेचच कामाला लागणार असल्याचं वक्तव्यही देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.