नागपूर जिल्हा सेतू केंद्र 1 फेब्रुवारीपासून बंद; कुठून मिळविता येतील प्रमाणपत्र?

गजानन उमाटे

गजानन उमाटे | Edited By: गोविंद हटवार, Tv9 मराठी

Updated on: Jan 30, 2022 | 4:00 AM

नागपूर शहरातील विविध भागामध्ये 172 ऑनलाईन आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात आलेले आहेत. सदर सेवा केंद्रावर जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र, वय, अधिवास, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, ईडब्ल्यू प्रमाणपत्र, शपथपत्रासाठी अर्ज सादर करता येतो व प्रमाणपत्र मिळविता येते.

नागपूर जिल्हा सेतू केंद्र 1 फेब्रुवारीपासून बंद; कुठून मिळविता येतील प्रमाणपत्र?
सेतूचा प्रातिनिधीक फोटो

नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू केंद्र (Setu Center in the Collectorate) 1 फेब्रुवारीपासून बंद करण्यात येत आहे. त्यानुषंगाने नागरिक व विद्यार्थ्यांनी शहरात कार्यरत आपले सरकार पोर्टलद्वारे विविध प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी ऑनलाईन सुविधेचा उपयोग करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला (Collector R. Vimala) यांनी केले आहे. नागपूर शहरातील विविध भागामध्ये 172 ऑनलाईन आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात आलेले आहेत. सदर सेवा केंद्रावर जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र, वय, अधिवास, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, ईडब्ल्यू प्रमाणपत्र, शपथपत्रासाठी अर्ज सादर करता येतो व प्रमाणपत्र मिळविता येते. आपल्याकडे ऑनलाईन सुविधा उपलब्ध (Online facility available) असल्यास शासनाचे http://aaplesarkar.mahaonline. gov.in या संकेतस्थळावर विविध प्रमाणपत्राकरिता अर्ज करता येते. घरबसल्या प्रमाणपत्र मिळविता येते.

आपले सरकार सेवा केंद्रावरून करावा अर्ज

कोरोना रोगाचा प्रादुर्भावाचा व संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता शासनाने नेमून दिलेल्या दिशानिर्देशानुसार कार्यालयीन कामे पार पाडावयाची आहेत. शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा सेतू केंद्र 1 फेब्रुवारी 2022 पासून बंद करण्यात येत आहे. नागरिक व विद्यार्थ्यांनी जिल्हा सेतू केंद्रात गर्दी न करता आपल्या नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रावरुन अर्ज सादर करावा किंवा ऑनलाईन सुविधेचा लाभ घ्यावा.

खालील इमेलवरही साधता येईल संपर्क

ऑनलाईन केंद्रावर अर्ज करताना काही अडचणी किंवा तक्रारी असल्यास त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील माहिती तंत्रज्ञान विभागाचे जिल्हा माहिती व तंत्रज्ञान अधिकारी हरीश अय्यर किंवा जिल्हा सेतू केंद्र येथे तक्रार नोंदवावी, असे प्रभारी अधिकारी सेतू तथा उपजिल्हाधिकारी, भूसंपादन हेमा बडे यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी या ई-मेलवर संपर्क साधावा. nagpurdistrictsetu@gmail.com किंवा dpmnagpur.itcell@maharashtra.gov.in

Kharif Season: अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षाही कमी, घोषणांचा पाऊस, सवलतीचे काय?

Onion Market: ज्याच्यामुळे केला अट्टाहास त्याचीच पुन्नरावृत्ती, सोलापुरात नेमकं काय घडलं?

सोयाबीन दरवाढीच्या आशेचा आता एकच किरण, शेतकऱ्यांनी पुन्हा घेतला साठवणूकीचा निर्णय

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI