राज्य सरकारकडून गरबा, दांडियाचे आयोजन रद्द, नागपुरातील दांडिया आयोजकांचे कोट्यावधींचे नुकसान

नवरात्रोत्सवापूर्वी राज्य सरकारने गरबा, दांडियांचे आयोजन रद्द केलं आहे. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयानेही याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यामुळे नागपुरातील दांडियाप्रेमींसह यासाठी वस्त्र पुरवणारे व्यवसायिक, विद्युत रोषणाई, डीजे वाद्यवृंद, कलावंत, गायक गरबा नृत्य प्रशिक्षकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केलीय.

राज्य सरकारकडून गरबा, दांडियाचे आयोजन रद्द, नागपुरातील दांडिया आयोजकांचे कोट्यावधींचे नुकसान
Garba

नागपूर : नवरात्रोत्सवापूर्वी राज्य सरकारने गरबा, दांडियांचे आयोजन रद्द केलं आहे. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयानेही याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यामुळे नागपुरातील दांडियाप्रेमींसह यासाठी वस्त्र पुरवणारे व्यवसायिक, विद्युत रोषणाई, डीजे वाद्यवृंद, कलावंत, गायक गरबा नृत्य प्रशिक्षकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केलीय.

गेल्या आठवड्यात आरोग्यमंत्र्यांनी मुंबई वगळता सर्वत्र गरबा होणार असे जाहीर केल्याने, नागपुरातील दांडिया आयोजनाशी संबंधित सर्व व्यवसायिकांनी यासाठी जय्यत तयारी सुरु केली होती. पण, आता रासगरबा आयोजन सरकारने रद्द केल्याने त्यांचे कोट्यावधींचे नुकसान झालेय. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयावर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे.

ठाणे महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने नवरात्रौत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ठाणेकरांना नवरात्रौत्सव साधेपणाने आणि कोरोनाचे नियम पाळूनच साजरा करण्याचे आवाहन महापालिकेने केलं आहे. तसेच नवरात्रौत्सव साजरा करण्यासाठी उत्सव मंडळांना महापालिकेची पूर्व परवानगी घेणेही बंधनकारक करण्यात आलं असून गरबा आयोजित करण्यास मनाई करण्यात आली आहे.

नाशिकमध्ये नवरात्रोत्सवात गरबा, दांडिया नाही

नाशिक जिल्ह्यात यंदाही नवरात्रोत्सवात साधेपणानेच साजरा करा. या काळात गरबा आणि रास दांडियाचे आयोजन करू नका, असे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत. राज्य सरकारने नवरात्रोत्सव मंडळांनासाठी लागू केलेली नियमावली जिल्ह्यातही जशीच्या तशी लागू केल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. दसऱ्याच्या दिवशी रावण दहन कार्यक्रमही मोजक्या लोकांच्या उपस्थित साजरा करावा. फेसबूकसारख्या सोशल मीडियावरून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी साध्या पद्धतीने उत्सव साजरा करावा. त्यासाठी महापालिका आणि स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घ्यावी. सार्वजनिक मंडळांनी देवीची मूर्ती चार फूट तर घरगुती दोन फूट उंचीची असावी.

संबंधित बातम्या :

नवरात्रौत्सव साजरा करण्यासाठी पूर्व परवानगी सक्तीची, गरबा खेळण्यास मनाई; ठाणे महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी

मंदिरांची दारं पुन्हा खुलणार, शिर्डी ते सिद्धिविनायक, कोणत्या मंदिरात काय नियमावली

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI