AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाणे बनले ‘स्मार्ट सिटी’, 1500 सीसीटीव्हींमुळे सोनसाखळी चोरी, वाहनचोरींना लगाम!

ठाण्यात स्मार्ट सिटी योजनेतून शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि संवेदनशील ठिकाणे अशा भागात एकूण 1500 कॅमेरे बसविण्यात आले आहेत. (Thane civic body installed 900 CCTVs to keep watch on illegal activities)

ठाणे बनले 'स्मार्ट सिटी', 1500 सीसीटीव्हींमुळे सोनसाखळी चोरी, वाहनचोरींना लगाम!
CCTV
| Edited By: | Updated on: Oct 02, 2021 | 10:41 AM
Share

ठाणे: ठाण्यात स्मार्ट सिटी योजनेतून शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि संवेदनशील ठिकाणे अशा भागात एकूण 1500 कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे ठाण्यातील चोऱ्यामाऱ्या थांबल्या आहेत. सोनसाखळी चोरांचा मार्ग काढणे, वाहनचोरीच्या घटनांना पायबंद घालणे, संशयास्पद हालचालींवर नजर ठेवणे, विविध रस्त्यांवरील वाहतूक कोंडींची तात्काळ माहिती, बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करणे आदी कामे करणे सीसीटीव्हीमुळे सहज शक्य झाले आहे.

हाजुरी येथील अद्ययावत नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून सीसीटीव्हीचे नियंत्रण केले जाते. या कॅमेऱ्यातील चित्रीकरणाच्या आधारे काही गुन्हेगारांना शोधण्यात ठाणे तसेच मुंबई पोलिसांना मदत झाली आहे. या सर्व यंत्रणांचे आज सर्व पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, अभिनेते, जेष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. ठाणे महानगरपालिका व ठाणे स्मार्ट सिटीच्या या कामाचे महापौर नरेश गणपत म्हस्के व इतर पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

तसेच कोव्हिड- 19चा सामना करण्यासाठी शहरात प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कोव्हिड -19च्या अनुषंगाने आवश्यक आणि मूलभूत माहिती आणि सूचना देण्यासाठी हाजूरी येथील इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर येथे सुरू करण्यात आलेल्या कोव्हिड वॅारच्या कामकाजाची माहितीही देण्यात आली.

ही कामे सुरू

यामध्ये वॅार रूमच्या माध्यमातून नागरिकांकडून येणाऱ्या सर्व तक्रारींचे समाधानकारक निराकरण करणे, तक्रारीच्या अनुषंगाने महापलिकेच्या संबंधित विभागाशी अथवा शासनाच्या संबंधित विभागांशी समन्वय ठेवणे आदी कामे करण्यात येत आहेत. तसेच मंत्रालय कोव्हिड 19 वॅार रुमशी समन्वय ठेवणे, कोरोना बाधित रूग्णांना आवश्यकता पडल्यास रूग्णालयांमध्ये दाखल होण्यासाठी मार्गदर्शन करणे, रुग्णवाहिका, शववाहिका उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने समन्वय ठेवणे आदी कामे प्रभावीपणे करण्यात येत आहेत. हाजुरी येथे उभारण्यात आलेल्या इंटिग्रेटेड कमांड अँन्ड कंट्रोल सेंटरच्या वॅार रूम व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या प्रात्याक्षिकाचे सादरीकरण सर्व पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, अभिनेते, जेष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी यांच्यासमोर करण्यात आले.

खड्डे बुजवण्याचे काम सुरू

ठाणे शहरात फार कमी प्रमाणात खड्डे आहेत. ते देखील बुजवण्याचे काम सुरु आहे. तसेच अवजड वाहामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. आता वाहतूक कोंडी न होण्यासाठी त्यांच्यासाठी पार्किंग प्लाझाचे काम विविध भागात होणार आहे, महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

VIDEO : भर दिवसा महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावत पळ, सीसीटीव्हीत घटना जशीच्या तशी

बलात्कार पीडिता आणि तिच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी नीलम गोऱ्हे डोंबिवलीत, पोलिसांनाही महत्त्वपूर्ण सूचना

उल्हासनगरात वालधुनी नदीत अज्ञात मृतदेह, परिसरात खळबळ, हत्या की आत्महत्या, गूढ कसं उलगडणार?

(Thane civic body installed 900 CCTVs to keep watch on illegal activities)

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.