बलात्कार पीडिता आणि तिच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी नीलम गोऱ्हे डोंबिवलीत, पोलिसांनाही महत्त्वपूर्ण सूचना

डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. तब्बल 33 आरोपींनी पीडितेवर वारंवार सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बलात्कार पीडिता आणि तिच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी नीलम गोऱ्हे डोंबिवलीत, पोलिसांनाही महत्त्वपूर्ण सूचना

डोंबिवली (ठाणे) : डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. तब्बल 33 आरोपींनी पीडितेवर वारंवार सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आज (1 सप्टेंबर) डोंबिवलीत आल्या होत्या. त्यांनी पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांची भेट घेतली. तसेच पोलिसांची भेट घेऊन या प्रकरणाचा नेमका कुठपर्यंत तपास झाला? याची माहिती मिळवली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

नीलम गोऱ्हे नेमकं काय म्हणाल्या?

“पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींच्या विरोधात चार्जशिट दाखल करावी. मुलीच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन कसे करता येईल याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. पोलिसांनी फार थोड्या वेळात आरोपींना पकडले आहे. सर्व प्रकारची प्रक्रिया पोलिसांनी केली आहे. पीडीत मुलीची शिकण्याची इच्छा आहे. तिच्या ऑनलाईन शिक्षणासाठी काय करता येईल, त्यासाठी तिच्या पालकांशी बोलणे झाले आहे. तिच्या कुटुंबाला मदत केली आहे”, असं नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं.

“पीडितेचे वडील या प्रकरणामुळे कामावर जाऊ शकले नाहीत. त्यांना कामाच्या संदर्भात मदत केली जाईल. पोलीस चाईल्ड वेल्फेअर कमिटीच्या माध्यमातून मदत देण्याचा प्रयत्न करीत आहेत. सरकारच्या मनोधैर्य योजनेतून पीडित कुटुंबाला येत्या पंधरा दिवसात मदत दिली जाईल”, असं आश्वासन नीलम गोऱ्हे यांनी दिलं.

‘आरोपींकडे अंमली पदार्थ कुठून आले त्याचा तपास सुरु’

पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. जे जे पोलिसांसमोर येईल त्याप्रमाणे पोलीस कारवाई करतील, असं विधान नीलम गोऱ्हे यांनी केलं. तसेच सामूहिक बलात्कारच्या घटनेत आरोपी अंमली पदार्थाचे सेवन करीत होते. ते त्यांना कुठून मिळाले. त्याचा तपास पोलीस करत आहेत, असंदेखील निलम गोऱ्हे यांनी सांगितलं.

नीलम गोऱ्हे यांच्या पोलिसांना महत्त्वपूर्ण सूचना

“डोंबिवली प्रकरणातील मुलीच्या आई वडिलांनी मुलगी मिसिंग झाल्याची तक्रार केली होती. मात्र मुलगी परत आली होती. त्यामुळे त्यांची काही तक्रार नाही, असे सांगितले होते. मात्र ज्या मिसिंग आणि अपहरणाच्या केसेस वर्षभरात झालेल्या आहेत, ज्या गायब झाल्या आणि त्या पुन्हा परत आल्या त्या मुली सुरक्षित आहेत की नाही? पुन्हा त्यांना काही अडचणी आहेत का, शिक्षणाच्या आणि इतर अडचणी असतील तर सामाजिक संघटनेच्या मदतीने त्यांचा फॉलोअप करावा. प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये महिलांचा एक गट जोडून द्यावा”, अशी सूचना नीलम गोऱ्हे यांनी पोलिसांना केली.

पीडितेवर 8 महिन्यांपासून लैंगिक अत्याचार

डोंबिवली येथे अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याचे समोर येताच राज्यात संतापाची लाट उसळली होती. भाजप तसेच इतर विरोधी पक्षांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली होती.  15 वर्षीय मुलीने मानपाडा पोलीस ठाण्यात आपल्यावर 8 महिन्यांपासून लैंगिक अत्याचार सुरु असल्याबाबत तक्रार नोंदवल्यानंतर चौकशीमध्ये जी माहिती समोर आली ते ऐकून पोलीस हैराण झाले होते.

हेही वाचा :

लग्नाच्या आमिषाने विवाहित पोलीस उपनिरीक्षकाकडून बलात्कार, कोथरुड पोलिसात तक्रार

उल्हासनगरात वालधुनी नदीत अज्ञात मृतदेह, परिसरात खळबळ, हत्या की आत्महत्या, गूढ कसं उलगडणार?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI