नागपुरात भटक्या श्वानांच्या नसबंदीवर कोट्यवधींचा खर्च, मोकाट श्वानांची दहशत वाढल्यानं नागरिक हैराण

नागूपर महापालिकेनं शहरातील भटक्या श्वानांच्या नसबंदीवर एक कोटी 62 लाख रुपये खर्च केले आहेत. सहा वर्षात एक कोटी 62 लाख खर्च करुनंही कुत्र्यांची वाढती संख्या असल्याचं समोर आलं आहे

नागपुरात भटक्या श्वानांच्या नसबंदीवर कोट्यवधींचा खर्च, मोकाट श्वानांची दहशत वाढल्यानं नागरिक हैराण
Dog
Follow us
| Updated on: Sep 11, 2021 | 10:58 AM

नागपूर: नागपूर महापालिकेनं गेल्या सहा वर्षात भटक्या श्वानांच्या नसबंदीवर कोट्यवधी रुपये खर्च करुन देखील त्यांची संख्या वाढत असल्याचं समोर आलं आहे. भटक्या श्वानांच्या दहशतीमुळे नागपूरकर मात्र हैराण झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या दीड वर्षा दीड हजारांहून अधिक नागरिकांना भटक्या श्वानांनी चावा घेतल्याचं समोर आलं आहे. तर. अपघाताच्या घटना देखील वाढल्या आहेत.

1 कोटी 62 लाखांचा खर्च

नागूपर महापालिकेनं शहरातील भटक्या श्वानांच्या नसबंदीवर एक कोटी 62 लाख रुपये खर्च केले आहेत. सहा वर्षात एक कोटी 62 लाख खर्च करुनंही कुत्र्यांची वाढती संख्या असल्याचं समोर आलं आहे.

नागपूरात मोकाट श्वानांची मोठी दहशत

नागपूर मनपाने कोट्यवधी रुपये खर्च करुनंही कुत्र्यांची संख्या नियंत्रणाबाहेर गेली आहे. यामुळे नागपूर शहरामध्ये भटक्या श्वानांची मोठी दहशत निर्माण झाली आहे. नागपूरात दीड वर्षात 3565 जणांना भटक्या श्वानांनी चावा घेतला आहे. तर, श्वान दुचाकीच्या मागे धावल्याने अनेक अपघात झाले आहेत.

नागपुरात वीज पडल्यानं दोघांचा मत्यू

नागपूरमध्ये मैदानात वीज पडल्याने दोन तरुणांचा मृत्यु, एक जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा मध्ये मैदानात काही तरुण खेळत असताना वीज पडली,ज्यामुळे दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतांमध्ये 22 वर्षीय तन्मय सुनील दहिकर आणि 25 वर्षीय अनुज कुशवाह या दोन तरुणांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नागपूरमधील चनकापूर येथे खुलै मैदान आहे. या मैदानावर खेळाडून नियमित सरावासाठी येतात. येथे काही खेळाडू धावण्याचा सरावर करतात तर काही खेळाडू क्रिकेट, फुटबॉल असे खेळ खेळतात. शुक्रवारी बरेच खेळाडू चनकापुरातील मैदानावर जमले होते. यावेळी अचानकपणे आकाशात काळे ढग जमा झाले तसेच पावसाला सुरुवात झाली. अचानकपणे पाऊस आल्यामुळे खेळाडू मैदानावर असलेल्या शेडकडे धावले. यावेळी मृत अनुज आणि तन्मय हे मागे मैदानावरच राहिले. दोघेही सोबतच शेडकडे धावत होते. मात्र यावेळी त्यांच्या अंगावर अचाकनपणे वीज कोसळली. थेट अंगावर वीज कोसळल्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला. तर सक्षम गोठीफोडे नावाचा खेळाडू यामध्ये गंभीर जखमी झाला.

लसीकरणानंतरही एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना कोरोना

नागपुरात लसीकरणानंतरंही पुन्हा पाच एमबीबीएसचे विद्यार्थी पॅाझिटिव्ह झाल्याचं समोर आलं आहे. कोरोनाबाधीत एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांची संख्या 16 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत नागपूर जिल्हयात 7 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. नागपूर ग्रामीणमध्ये चार तर शहरात तीन नव्या कोरोना रुग्णांची भर पडलीय. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरंही एमबीबीएसचे विद्यार्थी कोरोना पॅाझिटिव्ह येत आहेत.

इतर बातम्या:

‘बॅकलॅाग भरा अन्यथा कारवाईस तयार राहा’ मंत्री असूनही नागपूर मेट्रो विरोधात मोठी भूमिका स्वीकारणार’, विजय वडेट्टीवारांचा इशारा

सरावासाठी मैदानावर उतरले अन् वीज कोसळली, पूर्ण शरीर भाजल्यामुळे नागपुरात 2 खेळाडूंचा जागीच मृत्यू

Nagpur Municipal Corporation spend One crore sixty two lakh rupees on dog Vasectomy but dog numbers are increased in city

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.