काँग्रेस अध्यक्षांना मी पत्र लिहिलंय, सात जागांवर…; प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

Prakash Ambedkar on Congress and Loksabha Election 2024 : प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद; महाविकास आघाडीबाबत नेमकं मत काय? प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले? लोकसभा निवडणुकीबाबत प्रकाश आंबेडकर यांचं महत्वाचं विधान, काय म्हणाले? वाचा सविस्तर.....

काँग्रेस अध्यक्षांना मी पत्र लिहिलंय, सात जागांवर...; प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Mar 31, 2024 | 11:57 AM

वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी लोकसभा निवडणूक आणि महाविकास आघाडीसोबतच्या भूमिकेवर त्यांनी भाष्य केलं. आम्ही गेले अनेक दिवस महाविकास आघाडीमध्ये त्यांच्यात एक वाक्यता नाही, हे आम्ही सांगत होतो. ते स्पष्ट झालं आहे. यांच्या वेगवेगळ्या याद्या बाहेर येत आहेत. त्यामुळे आम्ही भूमिका घेतली की तुम्ही तुमचा भांडण मिटवा. पण त्याचं भांडण मिटत नाही. त्यांचाच समझोता होत नाही. त्यात आम्ही जाऊन आणखी बिघाड करण्यापेक्षा आम्ही आमची भूमिका घेतली, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

काँग्रेस अध्यक्षांना पक्ष

काँग्रेस अध्यक्षांना मी पत्र लिहिलं. सात जागांवर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ, असं त्यांना सांगितलं आहे. काही सामाजिक राजकीय स्थिती निर्माण झाली. एकाच विचारांची माणसं एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. समझोता होत आहे आणि जिथे होत नाही. अशा ठिकाणी सुद्धा समोरासमोर आहे. भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. लोक विचारात आहेत. बाहेरची लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात का घेण्यात येत आहेत? आम्ही काँग्रेसच्या काही उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं.

‘त्या’ दोन ठिकाणीही पाठिंबा

ओबीसींचा लढा त्यांचं आरक्षण वाचलं पाहिजे. ही आमची भूमिका आहे. आम्ही उमेदवार दिलेल्या चार मतदारसंघात भाजपविरुद्ध वंचित सरळ लढत आहे. मतदार आम्हाला साथ देईल अशी अपेक्षा आहे. जरांगे पाटील यांनी जो निर्णय घेतला त्याच आम्ही स्वागत करतो. आम्ही सोबत आहोत की नाही हे महत्त्वाचं नाही. त्यांनी त्यांची भूमिका घेतली आहे. एमआयएम आमच्या साठी रुल्ड आउट आहे. काँग्रेसने कोल्हापूर आणि नागपूरमध्ये आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्या, म्हटलं आम्ही दोन ठिकाणी पाठिंबा दिला आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

आमचा उमेदवार निवडून आणूच- आंबेडकर

उमेदवार पळवणं. पक्ष फोडणे सुरू आहे . मनसेला सुद्धा सोबत घेण्याची तयारी सुरू आहे. आपण लढत असलेल्या जागांचा विचार केला तर त्यांना यश मिळू शकते. 2 किंवा 3 जागा वंचित ला देतो, असं सांगितलं जातं होतं. मला राहुल गांधींच्या, काँग्रेस सभेत पाच मिनिटं देण्यात आली. वंचितची ताकत भाजप आणि आरएसएस ला अंगावर घेण्याची ताकत आहे. विस्थापिताना बरोबर घेऊन आपण पुढे गेलो पाहिजे असं आमचं मत होतं. मात्र आम्ही इलेक्शनसाठी जी तयारी केली होती. त्यातून आम्ही सगळे मतदारसंघ लढत आहोत. आमचा उमेदवार आम्ही निवडून सुद्धा आणू, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.