AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Temperature | नागपुरात उष्णतेची लाट येणार; मनपाचा हिट ॲक्शन प्लान तयार, विसाव्यासाठी बगीचे 24 तास सुरू

नागपुरात एप्रिल-मे महिन्यात उष्णतेची लाट येणार आहे. त्यामुळं नागपूर मनपाचा हिट ॲक्शन प्लान तयार आहे. उष्णतेच्या लाटेत सुरक्षिततेसाठी हिट ॲक्शन प्लान तयार करण्यात आलाय. 24 तास हेल्पलाईन सुरू आहे. तसेच विसाव्यासाठी 24 तास गार्डन सुरू राहील, असं मनपा प्रशासनानं कळविलंय.

Nagpur Temperature | नागपुरात उष्णतेची लाट येणार; मनपाचा हिट ॲक्शन प्लान तयार, विसाव्यासाठी बगीचे 24 तास सुरू
पूर्व विदर्भात पावसाची शक्यताImage Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Apr 09, 2022 | 3:31 PM
Share

नागपूर : उष्णतेच्या लाटेमुळं नागरिकांच्या संरक्षणासाठी नागपूर महानगरपालिकेचं हिट ॲक्शन प्लान (Hit Action Plan) तयार केलाय. नागपुरात सध्या तापमान वाढलंय. हवामान विभागाकडून (Meteorological Department) उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. पारा 41 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलाय. या उष्णतेच्या लाटेत अनेकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. त्यामुळे उष्णतेच्या लाटेचं संरक्षण व्हावं म्हणून नागपूर मनपाने हिट ॲक्शन प्लान तयार केला आहे. सर्व विभागांना याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. मनपाच्या हिट ॲक्शन प्लाननुसार बाहेर काम करणाऱ्यांना सावलीत विसावा घेता यावा म्हणून शहरातील गार्डन (City Gardens) 24 तास सुरु करण्यात आलेत. 24 तास हेल्पलाईन, कार्यालयात पुरेशा पाण्याची सोय करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. मेयो आणि मेडिकल रुग्णालयात कोल्ड वॅार्ड तयार करण्यात आलेत. पोलीस विभागाला उन्हात ड्युटीच्या वेळात थोडी सवलत देण्याच्या सूचना देण्यात आल्यात, अशी माहिती नागपूर मनपा आयुक्त राधाकृष्ण बी यांनी दिलीय.

भर उन्हात राष्ट्रवादीचे आंदोलन

नागपुरात आज कडाक्याचं ऊन आहे. या 42 डिग्री तापमानात नागपुरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय. काल शरद पवार यांच्या घरावरील मोर्चाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. शरद पवार यांच्या घराबाहेरील आंदोलनामागे भाजप नेते सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, नेते प्रशांत पवार, शेखर सावरबांधे यांच्या नेतृत्त्वात नागपुरातील व्हेरायटी चौकात महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आलं.

उन्हामुळं पाणीटंचाई

बुलडाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील खंडाळा येथे उन्हामुळं पाण्याची समस्या उद्भवत आहे. गावाला चोरपांग्रा धरणावरून शासकीय पाईपलाईन, पाण्याची टाकी आहे. परंतु याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष ओत असल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गावातील महिला पाण्याच्या शोधात तळपत्या उन्हात डोक्यावर हंडा घेऊन खासगी विहिरीवरून पाणी आणतात. याकडे ग्रामपंचायतीचे साफ दुर्लक्ष होत आहे. त्या विरोधात गावकऱ्यांनी रोष व्यक्त केलाय.

Devendra Bhuyar | डॉक्टर अनिल बोंडे 3-4 वाजतानंतर शुद्धीवर नसतात; अमरावतीत देवेंद्र भुयार यांची खोचट टीका

Amravati NCP | राष्ट्रवादीचा उद्या अमरावतीत मेळावा, शरद पवार उपस्थित राहणार, देवेंद्र भुयार राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

Video Nagpur Police | आमदार आशिष जैसवाल यांचे पोलिसांवर गंभीर आरोप; वाहतूक पोलिसांना सुनावले

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.