नागपूरचे व्यापारी फडणवीसांना भेटले, तिथेच ठरलं, सरकारने ऐकलं नाही तर ‘असहकार आंदोलन’ करायचं, पुढचं पुढं बघू!

नागपूरमधील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कोरोनाने ओढावलेली परिस्थिती शिष्टमंडळाने फडणवीसांच्या कानावर घातली.

नागपूरचे व्यापारी फडणवीसांना भेटले, तिथेच ठरलं, सरकारने ऐकलं नाही तर 'असहकार आंदोलन' करायचं, पुढचं पुढं बघू!
नागपूरमधील व्यापाऱ्यांचं शिष्टमंडळाने फडणवीसांची भेट घेतली...
Follow us
| Updated on: Aug 02, 2021 | 1:48 PM

नागपूर : नागपूरमधील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने (Nagpur Traders) आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांची भेट घेतली. कोरोनाने ओढावलेली परिस्थिती फडणवीसांच्या कानावर घातली. आता आम्हाला जगायचं असेल तर दुकानं चालू करणयाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सरकारने जर आता नागपूरमधले निर्बंध शिथील केले नाहीत तर आम्ही सरकारचं न ऐकता दुकानं उघडू, प्रसंगी असहकार आंदोलन छेडू, असा आक्रमक पवित्रा व्यापाऱ्यांनी फडणवीसांना भेटल्यावर व्यक्त केला.

पॉझिटिव्ही रेट कमी असतानाही निर्बंध शिथिल नाही, व्यापारी फडणवीसांच्या भेटीला

नागपूर जिल्हयात कोरोना पॉझिटिव्ही रेट कमी असतानाही, निर्बंध शिथिल झाले नाही. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील व्यापारी संतप्त आहे. व्यापाऱ्यांच्या एका शिष्टमंडळानी आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीय. आणि त्यांच्यासमोर व्यापाऱ्यांच्या व्यथा मांडल्या.

तर बुधवारपासून असहकार आंदोलन…!

शिवाय आज सरकारने निर्बंध शिथील करण्याबाबत निर्णय घेतला नाही, तर नागपुरातील व्यापारी बुधवारपासून असहकार आंदोलनाच्या तयारीत आहेत. निर्बंध शिथील न झाल्यास सरकारचे निमय न पाळता उशीरापर्यंय दुकान सुरु ठेवणार, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिलाय.

नागपूरचं लॉकडाऊन उठवा, आठवड्याभरापूर्वी फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपुरातील कोरोना संसर्गाचे प्रमाण आता लक्षणीयरित्या कमी झालेले आहे. सतत्याच्या लॉकडॉऊनमुळे आधीच विविध छोटे व्यवसायी आणि दुकानदारांची स्थिती हलाखीची झाली असल्याने आता स्थिती सुधारत असताना त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. त्यामुळे नागपुरात निर्बंधांमध्ये तातडीने शिथिलता देण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मागील आठवड्यात लिहिलं होतं.

दुकानदार, व्यावसायिकांचं जगणं कठीण झालंय, शिथीलता द्या

सातत्याच्या निर्बंधांमुळे व्यापार संपत चालला आहे आणि त्यातून अर्थकारणावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. छोटे दुकानदार, व्यवसायिक यांना जगणे कठीण होऊन बसले आहे. हॉटेल्सचा व्यवसाय खरे तर दुपारी 4 नंतर सुरू होतो. पण, 4 वाजता सारे बंद करावे लागत आहे. व्यवसाय अडचणीत आल्याने नोकरदारांना वेतन देणे सुद्धा या व्यवसायिकांना कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे कोरोनाची स्थिती जेथे बर्‍यापैकी आटोक्यात आली आहे, तेथे निर्बंधात तातडीने शिथिलता देण्याबाबतचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी फडणवीसांनी या पत्राच्या माध्यमातून मुख्ममंत्र्यांकडे केली होती.

(Nagpur Traders Meet Devendra fadanvis And Demand Relaxation In Lockdown otherwise Non-cooperation Agitation)

हे ही वाचा :

‘नागपुरातील कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी, उद्धवजी, आता निर्बंध शिथील करा’; देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.