Nagpur | आजपासून 4 एप्रिलपर्यंत पोषण पखवाडा, दोन आठवडे विविध स्पर्धा, जनजागृती अभियान

Nagpur | आजपासून 4 एप्रिलपर्यंत पोषण पखवाडा, दोन आठवडे विविध स्पर्धा, जनजागृती अभियान
नागपूर महापालिका
Image Credit source: tv 9

पोषण पखवाड्याच्या पहिल्या आठवड्यात 21 ते 27 मार्च 2022 या कालावधीत स्वस्थ बालक बालिका स्पर्धा अभियानाचे आयोजन केले जाईल. 28 मार्च ते 4 एप्रिल 2022 या कालावधीत केंद्र शासनाने निश्चित करून दिलेल्या जेंडर सेन्सिटिव्ह वॉटर मॅनेजमेंट याविषयी जनजागृतीसाठी विशेष उपक्रम घेतले जाईल.

गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Mar 21, 2022 | 5:00 AM

नागपूर : केंद्र शासन, महिला व बाल विकास मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार 21 मार्च ते 4 एप्रिल 2022 पर्यंत नागपूरसह संपूर्ण देशात पोषण ( Nutrition) पखवाडाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण व आढावा समिती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर अभियान यशस्वी करण्याचे आवाहन आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. पोषण पखवाड्याच्या पहिल्या आठवड्यात 21 ते 27 मार्च 2022 या कालावधीत स्वस्थ बालक बालिका स्पर्धा अभियानाचे (Girls Competition Campaign) आयोजन केले जाईल. 28 मार्च ते 4 एप्रिल 2022 या कालावधीत केंद्र शासनाने निश्चित करून दिलेल्या जेंडर सेन्सिटिव्ह वॉटर मॅनेजमेंट याविषयी जनजागृतीसाठी विशेष उपक्रम घेतले जाईल. तसेच अॅनेमिया प्रतिबंध आणि व्यवस्थापन, आदिवासी क्षेत्रातील (Tribal Areas) माता व बालकांचे आरोग्य सुदृढ होण्याकरिता स्थानिक व पारंपरिक आहाराचा नियमित भोजनात वापर करण्यासाठी आवाहन करणे अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

पोषण ट्रॅकर अॅप

महापालिका क्षेत्रामध्ये स्थानिक बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प यांच्या मदतीने शिबिराचे आयोजन करण्यात येईल. सेवाभावी संस्था, लायन्स क्लब, रोटरी क्लब, खाजगी हॉस्पिटल, महिला बचतगट, युवक मंडळ तसेच महापालिका अंतर्गत आरोग्य व शिक्षण विभाग, समाज विकास विभाग, झोनल कार्यालय, बालवाड्या, नर्सरी शाळा इत्यादीचा सहभाग राहील. सदर दिवशी विशेष कॅम्पचे आयोजन केले जाईल. सर्व बालकांचे वजन, उंची मोजून त्याची नोंद केंद्र शासनाने तयार केलेल्या पोषण ट्रॅकर अॅपमध्ये करण्यात येईल. ज्या बालकांची वजन, उंची मोजलेली नाही अशा बालकांची घरीच वजन, उंची मोजून नोंद करण्यासाठी पालकांना मार्गदर्शन करण्यात येईल.

Police भरतीसंदर्भात ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, NCC झालेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळणार : सुनील केदार

Photo – Nagpur Tourism | रामटेक येथे साहसी व वारसा पर्यटन महोत्सव; शिवकला, बैलगाडी राईड आणि बरचकाही…

वर्ध्यात railway तिकिटांचा काळाबाजार; ग्लोबल इंटरनेट कॅफेत छापा, RPF जवानांची कारवाई

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें