Nagpur | विनामास्क फिरणाऱ्यांची ऑन द स्पॉट टेस्ट!; साखळी खंडीत करण्यासाठी मनपा करतेय कारवाई

कोरोना साखळी खंडीत करण्यासाठी मनपाने आता नवी शक्कल लढविली आहे. जिथे जिथे गर्दी दिसते आणि मास्क वापरलेले लोक दिसत नाही. तिथे तिथे लगेच कोरोना टेस्ट केली जात आहे.

Nagpur | विनामास्क फिरणाऱ्यांची ऑन द स्पॉट टेस्ट!; साखळी खंडीत करण्यासाठी मनपा करतेय कारवाई
नागपुरात ऑन द स्पॉट टेस्ट करताना आरोग्य कर्मचारी.
Follow us
| Updated on: Jan 09, 2022 | 4:31 PM

नागपूर : नागपूर शहरात वाढत्या कोरोना रुग्णाची संख्या लक्षात घेता कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागने आता सुपर स्प्रेडर्सवर लक्ष केंद्रित केले आहे. आरोग्य विभागाच्या चमू तर्फे शहरातील बाजारपेठा, रहदारीचे रस्ते, उद्यान, दुकाने, मंगल कार्यालय, खाजगी कार्यालयात काम करणाऱ्या तीन हजारांहून अधिक सुपर स्प्रेडर्सची कोरोना चाचणी केली.

गर्दीच्या ठिकाणी केल्या चाचण्या

मागील काही दिवसांपासून मनपा हद्दीत कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जास्तीस्त जास्त चाचण्या करून त्यांचे निदान करणे गरजेचे आहे. शहरात विविध ठिकाणी काम करणारे, बाजारपेठेत फिरणाऱ्या नागरिकांना लक्षणे दिसत नसले तरी ते अनेकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे ते कोरोना संसर्गाचे सुपर स्प्रेडर्स ठरत आहेत. अशांची शनिवारी दोरा चौक ते कमाल चौकपर्यंत नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. आरोग्य विभागाच्या चमूने कळमना मार्केट, गोंडवाना क्लब, कॉटन मार्केट, धंतोली उद्यान, मंगळवारी झोन कार्यालय, इंटर्निटी मॉल, सीताबर्डी, नारायणा विद्यालय, दलालंपुरा भाजी मार्केट लकडगंज, सदर पोलीस स्टेशन, सीताबर्डी मार्केट, धरमपेठ, पाचपावली, गांधीबाग, महाल, सक्करदरा बुधवार बाजार तसेच शहरातील अनेक रहदारीच्या ठिकाणी नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली.

संसर्गाचा वेग दहापट वाढला

कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेप्रमाणेच सुरू झाली आहे. संसर्गाचा वेग दहापट वाढला आहे. तिसरी लाटेच्या संक्रमणाचा आठवडाभरात आकडा प्रचंड फुगला आहे. नागपूर जिल्ह्यात तब्बल चौदा पटीने संसर्ग वाढला आहे. आठवडाभरात बाधितांच्या संक्रमणाचा वेग वाढला आहे. सात दिवसांत दोन हजार 709 बाधित आढळले. महिनाभरापूर्वी जिल्ह्यात 39 कोरोनाबाधित शिल्लक होते. सध्या शहरात दोन हजार 217, ग्रामीणमध्ये 361 व जिल्ह्याबाहेरील 31 असे जिल्ह्यात दोन हजार 609 सक्रिय कोरोनाबाधित आहेत. यातील काही रुग्ण मेडिकल, मेयो तसेच एम्ससह खासगी कोविड सेंटरमध्ये दाखल आहेत.

Nagpur | रेल्वे रुळाचे काम करत होत्या महिला; धडधड येणाऱ्या ट्रेनने उडविले, दोन महिला मजूर ठार

Nagpur RSS | रेकी प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा, एटीएस, एनआयए करणार; कोण होता रेकी करणारा रईस?

Transportation | नागपुरात साकारलीय एकाच ठिकाण चारस्तरीय वाहतूक व्यवस्था!; नेमका काय आहे प्रकार?

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.