विजय वडेट्टीवार यांचा मोठा बॉम्ब, आरोग्य विभागात तब्बल 50 कोटींचा घोटाळा?

विधीमंडळाचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस आहे. या दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आरोग्य विभागावर गंभीर आरोप केले आहेत. आरोग्य विभागात अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये 50 कोटींचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय.

विजय वडेट्टीवार यांचा मोठा बॉम्ब, आरोग्य विभागात तब्बल 50 कोटींचा घोटाळा?
vijay wadettiwarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 19, 2023 | 9:23 PM

नागपूर | 19 डिसेंबर 2023 : विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा आरोप केला आहे. आरोग्य विभागात मोठा घोटाळा झाल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला. वडेट्टीवार यांनी आज विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. “आरोग्य विभागाच्या एकूण भ्रष्टाचाराच्या संदर्भात सभागृहामध्ये चर्चा झाली आणि त्यामध्ये बोलताना आरोग्य विभागातील भ्रष्टाचार आम्ही उघड केला. आरोग्य विभागामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार चाललेला आहे. भ्रष्टाचारामध्ये बदल्यांचा रॅकेट मोठ्या प्रमाणात आहे. पैसे घेतल्याशिवाय बदल्या होत नाहीत”, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. “नियम डावलून पदोन्नती केली जाते, म्हणजे ज्युनिअर माणसाला सहसंचालक पदापर्यंत, एकतर नागपूरच्या उपसंचालकाची बदली पहिल्यांदा केली आणि दुसऱ्या दिवशी ती बदली रद्द केली. त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार संबंधित खात्याने आणि मंत्र्यांनी केला”, असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

“असे अनेक विषय आहेत. या आरोग्य यंत्रणेचं संपूर्ण बट्ट्याबोळ करण्याचं काम झालं आहे. आरोग्य विभागात खूप मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. पण जवळपास 1200 डॉक्टरांची बदली ही बदली नियमबाह्य केली आणि प्रत्येकी 4 लाख रुपये त्या ठिकाणी घेतल्या गेल्याची माहिती आहे”, असा धक्कादायक दावा विजय वडेट्टीवार यांनी केला. “जवळपास 50 कोटी रुपये या बदल्यांमध्ये वसूल केले गेलेत. दोन संचालकांची पदे बोली लावून रिक्त ठेवली आहेत, म्हणजे जो जास्त देईल त्यासाठी ती पदे रिक्त आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा संचालकांची दोनही महत्वाची पदे आरोग्य खात्याची रिक्त राहावीत हे अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणजे या संवेदनशील अशा खात्यात केवळ भ्रष्टाचाराचा अड्डा आहे. आरोग्य विभागामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेची परमिशन द्यायची आहे. हॉस्पिटलला तर 30 ते 35 लाख रुपये मोजल्याशिवाय देत नाही”, असा मोठा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला.

‘सुविधा लोकांचा जीव वाचवण्यासाठी की…?’

“आरोग्य सुविधा या लोकांचा जीव वाचवण्यासाठी आहे की या खात्याच्या लोकांचं पोट भरायसाठी आहे? हा खरा प्रश्न उपस्थित झालाय. मुंबई महापालिकेतही खूप मोठ्या भ्रष्टाचाराचा पाऊस सुरु आहे. लोकप्रतिनिधी राहिले नाही, अधिकाऱ्यांना कोणाचा धाक करायला नाही. अधिकारी मनाप्रमाणे, त्या डेव्हलपर बिल्डरला हाताशी धरून तिजोरीची लूट केली जात आहे. हेही अत्यंत खेदाने आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे”, अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली.

‘आम्ही खूप आग्रह केला तरीपण…’

“विदर्भात हे अधिवेशन होत आहे. या दरम्यान आज कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. आम्ही आग्रही होतो की कोणत्याही परिस्थितीत विदर्भातील प्रश्नाला न्याय मिळावा. पुढचे दोन दिवस गुरुवार आणि शुक्रवार फक्त आणि फक्त विदर्भातील प्रश्नावर चर्चा होण्यासाठी दोन दिवस हे अधिवेशन वाढवावं, अशी आग्रही भूमिका आम्ही सर्वांनी केली. पण सरकारला चर्चा करायची नाही. विदर्भाच्या प्रश्नावर बोलायचं नाही किंवा विदर्भाचे प्रश्न सोडवायचे नाहीत. विदर्भातील लोकांचं ऐकायचंच नाही, अशा प्रकारची एक भूमिका मला शासनाची दिसली, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

“आम्ही खूप आग्रह केला तरीपण त्यांनी हे अधिवेशन उद्या संध्याकाळपर्यंत गुंडाळायचा निर्णय घेतला. त्यांनी बहुमताच्या जोरावर कामकाज सल्लागार समितीमध्ये उद्या अधिवेशन संपण्याचा निर्णय घेतला. खूप आग्रही असूनही आणि विदर्भातल्या अनेक विषयांची चर्चा होणे बाकी असताना सुद्धा हे अधिवेशन गुंडाळण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याचा आम्ही निषेध करतो. आजही आणि उद्याही नक्कीचं काही प्रश्नांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त करतो”, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.

Non Stop LIVE Update
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.