Video – Gadchiroli | महाराष्ट्रातील हत्ती गुजरातमध्ये नेण्यास विरोध; मंत्री, खासदारही मैदानात, कमलापुरातील हत्तीप्रेमींच म्हणण काय?

महाराष्ट्रातील 13 हत्ती गुजरातच्या जामनगरमध्ये नेण्यास विरोध केला जातोय. गडचिरोली जिल्ह्यातील दोन तर चंद्रपूरच्या ताडोबा प्रकल्पातील एकूण 13 हत्तींचा यात समावेश आहे. राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण व केंद्रीय वन व पर्यावरण बदल मंत्रालयाने हा प्रस्ताव दिला होता.

Video - Gadchiroli | महाराष्ट्रातील हत्ती गुजरातमध्ये नेण्यास विरोध; मंत्री, खासदारही मैदानात, कमलापुरातील हत्तीप्रेमींच म्हणण काय?
गडचिरोलीतील हत्ती.
Follow us
| Updated on: Jan 13, 2022 | 2:48 PM

गडचिरोली : महाराष्ट्रातील 13 हत्ती (elephant) गुजरातच्या जामनगरमध्ये नेण्यास विरोध होतोय. गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील आलापल्ली आणि सिरोंचा या दोन तर चंद्रपूरच्या ताडोबा प्रकल्पातील एकूण 13 हत्तींचा यात समावेश आहे. राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण व केंद्रीय वन व पर्यावरण बदल मंत्रालयाने हा प्रस्ताव दिला होता. राज्य सरकारने या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला आहे. यासाठीचे परिवहन नियोजन पूर्ण झाले आहे. तीन टप्प्यात हे 13 हत्ती जामनगरच्या एका खाजगी समूहाद्वारे संचालित 250 एकरातील प्राणिसंग्रहालयात पाठविले जाणार आहेत. जामनगर येथील राधेकृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्ट हत्ती परिवहनाचे काम दोन्ही राज्ये आणि केंद्रीय वनमंत्रालय तज्ज्ञांच्या देखरेखीत करणार आहे. या 13 हत्तींमध्ये ताडोबा प्रकल्पातील 4 नर 2 मादी, अलापल्ली वनविभागातील 2 नर 1 मादी, सिरोंचा वनविभाग कमलापूर कॅम्पमधील 1 नर 3 मादी यांचा समावेश आहे.

काय म्हणतात, नेतेमंडळी?

गेली काही वर्षे ताडोबातील हत्ती बिथरण्याच्या घटना पुढे आल्या होत्या. त्यामुळे हत्ती सफारी थांबविण्यात आली. तर आलापल्ली येथे लाकूड वहनासाठी यंत्र आणि ट्रक्सचा वापर वाढल्याने या हत्तींवरील देखरेख खर्च मोठा मुद्दा झाला होता. राज्याच्या वनविभागाने यावर उपाय शोधण्याऐवजी हत्ती स्थलांतराला मान्यता दिल्याने गडचिरोलीकर संतापले आहेत. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार, खासदार अशोक नेते, हेसुद्धा मैदानात उतरले आहेत. हत्ती वाचवा ही मोहीम समाजमाध्यमांसह सर्वत्र जोरात सुरू आहे. राज्याचे वनविभागाचे अधिकारी मात्र चुप्पी साधून आहेत. कमलापुरातील हत्ती बाहेर नेऊ दिले जाणार नाही, असे खासदार नेते म्हणाले. तर कमलापुरातील हत्तींना दुसरीकडं न्यायाचंच असेल, तर ताडोबात न्या, दुसऱ्या राज्यात नाही, असं विजय वडेट्टीवार यांचं म्हणणंय. या हत्तींना बाहेर नेऊ दिले जाणार नसल्याचं माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं म्हणण आहे.

पर्यटनस्थळ विकसित करण्याची मागणी

वनविभागाची लाकूड वहनाची कामे करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासून पातानिल व कमलापूर येथे हे हत्ती कॅम्प पर्यटन स्थळ विकसित करण्यात आले आहे. जिल्हा व राज्यातून हजारो पर्यटक हत्तींचा मुक्तसंचार अनुभवण्यासाठी कमलापूर येथे येत असतात. कमलापूर येथे वनविभागाच्या अखत्यारीतील हत्तींना गुजरातेत पाठवण्यास विरोधाचे सूर उमटले आहेत. कमलापुरातील सुविधा वाढवून हा कॅम्प सुयोग्य पर्यटन स्थळ करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीधर राव यांनी केली आहे. त्यांना कमलापुरातील गावकरी रजनीता मडावी यांनीही पाठिंबा दर्शविला.

Bhandara | गोसेखुर्दने पाणी साठवणुकीचे उद्दिष्ट गाठले; याचा बाधित गावांवर काय होणार परिणाम?

weather forecast | विदर्भात ऊन-पावसाचा खेळ सुरूच; येत्या दोन दिवसांत काय सांगतो हवामानाचा अंदाज?

फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ.
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला.
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान.
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम.
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.