AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्नाटकचे संसदीय मंत्री म्हणतात, मुंबई आमची, सुनील राऊत यांची प्रतिक्रिया काय?

सुनील राऊत यांनी सांगितलं की, शिवसेना एकच आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. बाकी कुठंलीही शिवसेना आम्हाला माहिती नाही.

कर्नाटकचे संसदीय मंत्री म्हणतात, मुंबई आमची, सुनील राऊत यांची प्रतिक्रिया काय?
सुनील राऊत
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Dec 28, 2022 | 4:57 PM
Share

नागपूर : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि मंत्री वक्तव्य करत आहेत. संसदीय मंत्री मधू स्वामी यांनी मुंबई आमची असा दावा केला आहे. त्यावर बोलताना भांडुपचे आमदार सुनील राऊत म्हणाले, कर्नाटकात काय दावा केला. याला मुंबईत, महाराष्ट्रात किंमत दिली जाणार नाही. १०५ हुतात्मे घेऊन मुंबई मिळवलेली आहे. या मुंबईवर फक्त मराठी माणसाचाच हक्क आहे. मुंबई फक्त मराठी माणसाचीच आहे, असं वक्तव्य सुनील राऊत यांनी केलं. कोणी काय दावे केले याला आम्ही शून्य किंमत देतो

मुंबईत २० टक्के कानडी भाषिक आहेत. त्यामुळं मुंबई आमची असल्याचा दावा कर्नाटकचे मंत्री करतात. महाराष्ट्राच्या विधानभवनात सीमावादावर ठराव घेण्यात आला. तरीही कर्नाटकचे मंत्री शांत बसण्याचे नाव घेत नाहीत. त्यावर बोलताना सुनील राऊत म्हणाले,  महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना ते किंमती देत नाहीत. आधीचं केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या बैठका झाल्या. तिथं झाल्याल्या ठरावांचं पालन केलं गेलं पाहिजे. कुणीही विनाकारण काही बोलू नये.

उद्धव ठाकरे यांनी बेळगाव केंद्रशासित करण्याची मागणी केली होती. त्यावर आता कर्नाटकी मंत्री हे मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी करत आहेत. त्यावर बोलताना सुनील राऊत यांनी सांगितलं की, बेळगावात मराठी माणसांची मुस्कटदाबी होत आहे. मराठी माणसांवर अन्याय अत्याचार केला जात आहे. बेळगावच्या मागणीला ७० वर्षे पूर्ण होत आहेत. मुंबई मराठी माणसाच्या बापाची असल्याचं कर्नाटकला सांगावं लागेल.

सुनील राऊत  यांनी सांगितलं की, शिवसेना एकच आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. बाकी कुठंलीही शिवसेना आम्हाला माहिती नाही. उद्धव ठाकरे, संजय राऊत हे अजूनही नागपुरात आहेत. ते बाँबस्फोट करतील. रोज काहीतरी होत आहे. एकदा टाईम बाँब लावला जाईल. चिंता करू नका.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच