AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी? प्रकाश आंबेडकर आणि अभिजीत दीपके एकत्र लढणार? आंबेडकर काय म्हणाले?

प्रकाश आंबेडकरांनी अभिजीत दीपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीसोबत आगामी निवडणुकांमध्ये आघाडी करण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. दीपके यांनी अद्याप राजकारणात प्रवेश केला नसल्याने त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच नसल्याचे आंबेडकर म्हणाले. अमेरिकेवरील भाजपच्या अवलंबित्व आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या डीबीटी धोरणावर त्यांनी सरकारला लक्ष्य केले.

महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी? प्रकाश आंबेडकर आणि अभिजीत दीपके एकत्र लढणार? आंबेडकर काय म्हणाले?
Prakash AmbedkarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 22, 2026 | 3:55 PM
Share

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना देशभर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातही दीपकेंना तरुणांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. मात्र, दीपके यांनी राजकारणात उतरण्याचा अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. एक दबाव गट म्हणून काम करण्यावर त्यांनी भर दिला आहे. तसं त्यांनी वारंवार बोलूनही दाखवलं आहे. मात्र, अभिजीत दीपके आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर दोघेही एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यावर अखेर प्रकाश आंबेडकर यांनीच भाष्य करून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

प्रकाश आंबेडकर हे नागपुरात होते. यावेळी मीडियाने त्यांना आगामी निवडणुकांमध्ये कॉकरोच जनता पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार का? असा सवाल केला. त्यावर आंबेडकर यांनी थेटच भूमिका मांडली. आम्ही आता असणाऱ्या राजकीय पक्षासोबत जाऊ. ज्यांनी अजून राजकीय भूमिका स्वीकारली नाही त्यांच्यासोबत का जाऊ? असा सवाल करत प्रकाश आंबेडकर यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

भारत नव्हे, भाजप अमेरिकेवर अवलंबून

अमेरिकेकडून लावल्या जात असलेल्या टॅरिफवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. माझ्यासारखा पंतप्रधान असता तर अमेरिकेला 100 टक्के टॅरिफ नव्हे तर २०० टक्के टॅरिफ लाव म्हणाला असता. कारण भारत अमेरिकेवर अवलंबून नाही. तर संघ आणि भाजप अमेरिकेवर अवलंबून आहेत. 56 इंचाची छाती सत्तेत बसली नाही, तर 16 इंचाची छाती सत्तेत बसली आहे. त्यांच्यात दम नाही, असं आंबेडकर म्हणाले. पंतप्रधानांनी ब्रिक्समध्ये नेमकं काय निर्णय झाले हे देशाला सांगावेत. चीन संदर्भात आम्ही विषय जनतेसमोर आणला आहे. ब्रिक्समध्ये यावर चर्चा झाली नाही, असंही त्यांनी सांगितलं.

सरकारच बदलावं लागेल

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. डीबीटी धोरण फडणवीस सरकारने आणलं. विद्यार्थ्यांनी अनेकदा बँकेमार्फत दिली जाणारी रक्कम आम्हाला सांभाळता येत नाही असे फडणवीस यांना सांगितलं. मात्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांचं न ऐकता स्वतःचंच खरं असल्याचं सांगितलं. त्यामुळे आता सरकारच बदलण्याची वेळ आली आहे, असंही ते म्हणाले.

Follow Us
आमच्या बळावर निवडून आले, अन् आता...भाजप आमदाराविरोधात कार्यकर्त्यांचा
Bhandara : आमच्या बळावर निवडून आले, अन् आता...भाजप आमदाराविरोधात कार्यकर्त्यांचा संताप
संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा भव्य जिवंत देखावा
Video: संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा भव्य जिवंत देखावा, पाहून विश्वासच बसणार नाही
चौथीही मुलगीच झाली, धीरेंद्रशास्त्रींची भविष्यवाणी खोटी ठरली
Video : पर्चीवर लिहून म्हणाले पुत्रप्राप्ती होणार, आता चौथीही मुलगीच झाली, धीरेंद्रशास्त्रींची भविष्यवाणी खोटी ठरली; व्हिडीओ व्हायरल!
11 जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा! 16 ऑक्टोबरला मतदान तर निकाल कधी?
By Election : 11 जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा! 16 ऑक्टोबरला मतदान तर निकाल कधी?
युपीआय शुल्कावरून पेट्रोल पंप चालक संतप्त, बंदचा इशारा
Video : युपीआय शुल्कावरून पेट्रोल पंप चालक संतप्त, बंदचा इशारा
विशाखा राऊतांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा! रिक्त जागेवर...
Vishakha Raut : विशाखा राऊतांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा! रिक्त जागेवर...; कोर्टने नेमके काय दिले आदेश?
सोलापुरात पावसाचा येलो अलर्ट: शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित, पण...
Video : सोलापुरात पावसाचा येलो अलर्ट: शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित, पण दुष्काळाची चिंता कायम
दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, बड्या नेत्यावर दिली..
दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, बड्या नेत्यावर दिली जबाबदारी
शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांना नव्या कोऱ्या बोलेरो गाड्या... कारण काय?
शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांना नव्या कोऱ्या बोलेरो गाड्या... नेमकं कारण काय?
कर्नाटकात दुष्काळ जाहीर महाराष्ट्रात कधी? आजच्या कॅबिनेट बैठकीवर लक्ष
Maharashtra Farmer Issue : कर्नाटकात दुष्काळ जाहीर महाराष्ट्रात कधी? आजच्या कॅबिनेट बैठकीवर राज्याचं लक्ष