Amravati | आधी संसद भवन, आता धानोऱ्यात राष्ट्रपती भवन!, युवकाने बनविली हुबेहुब प्रतिकृती

Amravati | आधी संसद भवन, आता धानोऱ्यात राष्ट्रपती भवन!, युवकाने बनविली हुबेहुब प्रतिकृती
धानोरा येथील युवकाने बनविलेली राष्ट्रपती भवनाची हुबेहुब प्रतिकृती.

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील धानोरा (म्हाली) येथील एका युवकाने हा छंद जोपासलाय. संसद भवनांतर आता तर राष्ट्रपती भवनाची हुबेहुब प्रतिकृती तयार केली आहे.

सुरेंद्रकुमार आकोडे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 04, 2022 | 3:54 PM

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील एका युवकानं एक अनोखा छंद जोपासलाय. त्यानं आधी संसद भवनाची प्रतिकृती साकारली होती. आता तर त्यानं राष्ट्रपती भवनाची प्रतिकृती साकारली. त्यामुळं त्याचं सर्वत्र कौतुक होतंय.

इमारतींची प्रतिकृती बनविण्याचा छंद

कुणाला कशाचा छंद असेल, हे सांगता येत नाही. साधारणत: वाचन, गायन, खेळ, संगीत आदी क्षेत्रातील छंद जोपासणाऱ्या व्यक्ती आपण पाहतो. असाच एक छंद या युवकानं जोपासला. तो म्हणजे इमारतींच्या प्रतिकृती बनविण्याचा. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील धानोरा (म्हाली) येथील एका युवकाने हा छंद जोपासलाय. संसद भवनांतर आता तर राष्ट्रपती भवनाची हुबेहुब प्रतिकृती तयार केली आहे.

304 खोलीच्या भवनाची प्रतिकृती

चांदूर रेल्वे तालुक्यातील धानोरा (म्हाली) येथील अमर सुरेश मेश्राम या युवकाने राष्ट्रपती भवनाची प्रतिकृती देशामध्ये आजपर्यंत झालेल्या सर्व राष्ट्रपतींसोबतच भविष्यामध्ये होणाऱ्या राष्ट्रपतींच्या आठवणीमध्ये बनविलेली आहे. 304 खोलीच्या राष्ट्रपती भवनाची प्रतिकृती तयार करण्यासाठी सदर युवकाला सहा महिन्यांचा कालावधी लागला. याकरिता फाईल शीट, टुथपिक्स व प्लायवुड हे साहित्य वापले आहे.

बारीक-सारीक गोष्टी केल्या नमूद

यापूर्वी सदर युवकाने संसद भवनाची प्रतिकृती तयार केली होती. याशिवाय विविध इमारतींची प्रतिकृती या युवकाने बनविली आहे. राष्ट्रपती भवनाच्या प्रतिकृतीमध्ये तेथे असणाऱ्या बारीक – बारीक गोष्टी त्यामध्ये नमूद केल्या आहेत, अशी माहिती अमर मेश्राम यांनी दिली. अमर मेश्राम याच्या कामगिरीबद्दल गणेश आरेकर, सुधीर नलगे, सरपंच कल्पना नलगे, रवींद्र मोहोड, अब्दूल अमद, प्रदीप निहाटकर, भाविक गुजर, नितीन कातोटे, भूषण अंबूलकर, रवींद्र नन्नावरे यासह अनेकांनी कौतुक केली आहे.

नागपुरात बेकायदेशीर रेती उपशाला जिल्हाधिकारी कायदेशीर करणार काय?, गोंदियात रेती तस्कारांवर जिल्हाधिकाऱ्यांचा पाहारा

Bhandara MLA | आमदारांचे शिवीगाळ प्रकरण : राजू कोरेमोरे बारा तासांच्या तुरुंगवासानंतर बाहेर; आता म्हणतात, पोलिसांविरुद्ध न्यायालयीन लढाई लढणार

Video-Accident | सावधान! मुलांजवळ बाईक देताय? 17 वर्षीय विद्यार्थ्याचा भरधाव ट्रकने घेतला बळी, सीसीटीव्हीत थरारक घटना कैद

 

 

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें