Nagpur Ration | नागपुरात रेशनचे सर्व्हर डाऊन, बायोमेट्रिक मशीन बंद; लाभार्थ्यांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होतेय?

नागपुरात रेशनचं सर्व्हर डाऊन झालंय. बायोमेट्रीक मशीनही ठप्प आहे. त्यामुळं रेशनच्या धान्यासाठी ग्राहकांना चकरा माराव्या लागतात. गेल्या महिनाभरापासून ही स्थिती असल्यानं प्रशासनाचं याकडं दुर्लक्ष होत असल्याचं सांगितलं जातंय.

Nagpur Ration | नागपुरात रेशनचे सर्व्हर डाऊन, बायोमेट्रिक मशीन बंद; लाभार्थ्यांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होतेय?
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 12:25 PM

नागपूर : नागपुरात रेशनच्या सर्व्हर डाऊनची (Server Down) रोजची समस्या झाली आहे. लाभार्थ्यांना धान्य घेण्यासाठी तासंतास वाट पाहावी लागतेय. गेल्या महिनाभरापासून रेशनचं सर्व्हर कधी बंद तर कधी सुरु असते. सर्व्हर डाऊन असल्याने बायोमेट्रीक मशीन बंद (Biometric Machine) होत आहे. धान्य वितरणात अडचणी येतात, असं रेशन दुकानदार संघटनेचं (Ration Shopkeepers Association) म्हणण आहे. नागपुरात 685 स्वस्त धान्य दुकानं आहेत. तर सव्वातीन लाखांपेक्षा जास्त लाभार्थी दर महिन्याला धान्य घेतात. पण रेशन सर्व्हर डाऊनची रोजची समस्या झाली. बायोमेट्रीक मशीन बंद होऊन त्याचा धान्य वितरणाला मोठा फटका बसतोय, अशी माहिती रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गुड्डू अग्रवाल यांनी दिली. गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी बायोमेट्रीक पद्धती अवलंबली जाते. पण, सर्व्हर डाऊनचा ग्राहकांना आता संताप आलाय.

धान्य केव्हा मिळणार?

रेशनसाठी लोकं रांगेत उभे राहतात. कधीकधी दुकानदारांशी भांडण होतात. मनस्ताप सहन करूनही धान्य मिळत नाही. जानेवारीचा शेवटचा दिवस असल्यानं आज रेशनच्या धान्यासाठी दुकानांसमोर ठिकठिकाणी रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी अद्याप धान्याचा पुरवठा झाला नसल्यानं आता धान्य केव्हा मिळणार असा प्रश्न ग्राहक विचारत आहेत. दुकानदारांनी विभागीय अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली आहे. अधिकारी केवळ पत्रव्यवहार करून जबाबदारी झटकत असल्याचं दिसतंय.

ग्राहक-दुकानदार दोघेही त्रस्त

रविवारी सुटी होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्यानं रेशन दुकानांसमोर गर्दी होती. ग्राहकांना तास दोन तास रांगेत उभे लागावे लागले. काहींना धान्य मिळालेच नाही. रोज रोज दुकानात जायचे. तरीही धान्य मिळत नसतील, तर काय करायचे असा संपात ग्राहक व्यक्त करत आहेत. तर सर्व्हर डाऊन असल्याने धान्य विक्री करताना त्रास होत असल्याचं रेशन दुकानदार म्हणातात. ग्राहक आणि दुकानदार दोघेही यामुळं त्रस्त आहेत. एका दुकानात सुमारे सहाशे ते एक हजार कार्डधारक असतात. जिल्ह्यात तीन लाख सदतीस हजार प्राधान्य सूचीतील कुटुंब आहेत. तर अंत्योदय कुटुंबांची संख्या चवेचाळीस हजार सातशे आहे. या सर्व कुटुंबीयांना सर्व्हर डाऊनचा त्रास होत आहे.

एसटीचे स्टेअरिंग येणार महिला कर्मचाऱ्यांच्या हाती; काय आहे परिवहन महामंडळाचा प्लान?

Nagpur Mihan | मिहानमध्ये तारांकित हॉटेलची होणार उभारणी; रोजगार निर्मितीला कशी मिळेल चालना?

Nagpur NMC Election | नागपूर महापालिका निवडणुकीचा धुरळा; भाजपा उमेदवार निवडीसाठी करणार सर्व्हे

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.