Satish Uke अटक प्रकरण : हे तर भाजपचं बदनाम करण्याचं षडयंत्र, नाना पटोले यांची टीका

रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणामध्येही ते माझे वकील आहेत. वकील आपली केस लढतात. याचा अर्थ सतीश उके हे नाना पटोलेंचे वकील, अशी हवा तयार केली जात आहे. हे भाजपचे मला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

Satish Uke अटक प्रकरण : हे तर भाजपचं बदनाम करण्याचं षडयंत्र, नाना पटोले यांची टीका
नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 12:17 PM

नागपूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे मुंबईवरून एकाच विमानानं नागपूरला आले. या दोन्ही नेत्यांनी एकाच विमानातून प्रवास केला. नाना पटोले म्हणाले, राजकीय विरोध असू शकतो. पण, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे चांगले मित्र आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधातील पिटीशनमध्ये सतीश उके (Satish Uke) हे माझे वकील आहेत. रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणामध्येही ते माझे वकील आहेत. वकील आपली केस लढतात. याचा अर्थ सतीश उके हे नाना पटोलेंचे वकील, अशी हवा तयार केली जात आहे. हे भाजपचे मला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

उकेंच्या वडिलांचे आरोप चौकशीचा भाग

काँग्रेसमध्ये अनुसूचित जाती, जमातींचा सहभाग वाढायला लागला आहे. त्यामुळं अशा प्रकरणावर काँग्रेसला आणि नाना पटोलेंना बदनाम करण्याचं षडयंत्र या पद्धतीनं सुरू झालं आहे. माध्यमांमध्ये माझे वकील म्हणून टार्गेट केलं जातंय. हे योग्य नव्हे. काँग्रेसला समर्थन मिळतंय. म्हणून भाजप असा षंडयंत्र करतंय का, असा प्रश्न निर्माण झालाय. स्थानिक पोलिसांना माहिती न देता मुंबईवरून ईडी येते. कारवाई करते, याचा अर्थ मोठं षडयंत्र आहे. हे लपविता येणार नाही. उकेच्या वडिलांना आरोप केले आहेत. तो चौकशीचा भाग असू शकतो, असंही नाना पटोले म्हणाले. नागपूर विमानतळावर आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

ईडी कायद्याने कारवाई करेल – फडणवीस

सतीश उके यांना काल ईडीनं अटक केली. सतीश उके हे नाना पटोले यांचे वकील आहेत. त्यामुळं उकेंना टार्गेट केला जात असल्याचा आरोप होतोय. उकेंच्या वडिलांना देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील केसेस लढत असल्यामुळं ही कारवाई केली असल्याचा आरोप केलाय. परंतु, देवेंद्र फडणवीस म्हणतात, मला या प्रकरणाची माहिती माध्यमांमधूच झाली. सतीश उके यांच्यावर जमिनीशी संबंधित गुन्हा पोलिसांनी दाखल केला होता. या प्रकरणी ईडीनं ही कारवाई केली आहे. मूळ कारवाई ही नागपूर पोलिसांची आहे. उके यांच्याविरुद्ध 2005 पासून वेगवेगळ्या प्रकारच्या एफआयआर आहेत. वेगवेगळ्या न्यायाधीसांची खोटी तक्रार केल्याबद्दल कंटेम्ट ऑफ कोर्ट मुंबई उच्च न्यायालयात झाला. त्यांनी त्यांना शिक्षा दिली. सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं ती शिक्षा का वाढविण्यात येऊ नये, अशाप्रकारचा निर्णय दिला. त्यामुळं ईडी कायद्यानुसार कारवाई करेल, असंही फडणवीस म्हणाले.

MRI काढताना नागपुरात चिमुकल्याचा मृत्यू, पालकांचा डॉक्टरांवर गंभीर आरोप

Nagpur | मनपाचे प्रशासक पद आयुक्तांकडे; नगरसेवक, महापौर झाले माजी, प्रतीक्षा निवडणूक जाहीर होण्याची

Nagpur School | आजपासून पहिली ते नववीच्या शाळा सकाळी सात ते दुपारी बारापर्यंत; जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांचे आदेश

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.