AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Crime | एकटी पाहून मध्यरात्री घरात घुसले; चाकूच्या धाकावर 58 वर्षीय महिलेवर दोघांकडून बलात्कार, नागपुरात चाललंय काय?

नागपुरात दुर्दैवी घटना उघडकीस आली. रात्री 58 वर्षीय महिला घरात एकटी झोपली होती. आरोपीने डाव साधून घरात प्रवेश केला. चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बळजबरी बलात्कार केला. त्यानंतर तो पळून गेला.

Nagpur Crime | एकटी पाहून मध्यरात्री घरात घुसले; चाकूच्या धाकावर 58 वर्षीय महिलेवर दोघांकडून बलात्कार, नागपुरात चाललंय काय?
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Feb 10, 2022 | 4:16 PM
Share

नागपूर : ही घटना आहे वाडी पोलीस (Wadi Police) हद्दतील. घरकुल योजनेअंतर्गत महिलेला घर मिळाले आहे. सोमवारी रात्री अडीच वाजले होते. पीडित 58 वर्षीय महिला घरी एकटीच होती. दोन आरोपींनी घराचा दरवाजा ठोठावला. पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश केला. महिलेला चाकूचा धाक दाखवला. दोन्ही आरोपींनी महिलेवर बळजबरी बलात्कार (Forced rape of a woman) केला. धमकी देऊन पळ काढला. महिला रात्रभर घाबरत घरात बसून राहिली. मंगळवारी पीडितेने शेजार्‍यांना आपल्यावर घडलेली आपबिती सांगितली. घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. अत्याचाराची घटना असल्यानं पोलिसांचा ताफा (Police convoy) घटनास्थळी धावून आला.

अज्ञात आरोपींचा शोध सुरू

पोलीस अधिकारी नवीनचंद्र रेड्डी आणि विनिता साहूही घटनास्थळी पोहोचले. वैद्यकीय तपासणीनंतर रात्री उशिरापर्यंत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. महिलेने दिलेल्या वर्णनाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केलाय. यापूर्वीही असाच प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. परंतु, त्यावेळी तक्रार करण्यात आली नव्हती. भीतीपोटी काही जण तक्रार करत नाहीत. त्यामुळं आरोपींची हिंमत आणखी वाढते.

दीड वर्षांची चिमुकली छतावरून खाली पडली

दुसऱ्या एक घटनेत, मानेवाड्याजवळील कैलासनगरात हेमंत वानखेडे राहतात. त्यांची इशा दीड वर्षांची मुलगी दुसऱ्या माळ्यावर खेळत होती. घटनेच्या वेळी इशाची आई छतावर कपडे वाळू घालत होती. इशा भिंतीवर उभी झाली आणि त्याठिकाणाहून खाली पडली. इशाची आर्त किंचाळी एकताच परिसरातील नागरिक धावून आले. जखमी अवस्थेत इशाला मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. इशाच्या डोक्याला गंभीर जखम झाली. उपचारादरम्यान अतिरक्तस्त्रावाने तिचा मृत्यू झाला. लहान मुलांना छतावर नेण्यापूर्वी विचार केला पाहिजे.

Nagpur | नितीन गडकरींच्या घरासमोर भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं काय?

अंकिता पिसुड्डे जळीतकांड : द्वितीय पुण्यस्मरण करून आई-वडील न्यायालयात, आज न्यायाची अपेक्षा

Video – Nagpur NMC | नगरसेवकांचा भूमिपूजनाचा सपाटा, नागपुरात नागरिकांचा विरोध, विक्की कुकरेजा यांच्याविरोधात नागरिक संतप्त

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.