5

नागपुरात सिवेज लाईन, दुर्गंधीच्या तक्रारी सोशल मीडियावर; NMC कडून जनजागृती केव्हा होणार?

नागपुरात सिवेज लाईन, दुर्गंधीसारख्या तक्रारींमुळं नागरिक संतप्त झाले आहेत. याचा राग सोशल मीडियाचा आधार घेत व्यक्त केला जात आहे. या समस्यांबाबत उहापोह करून महापालिकेचे धिंडवडे काढले जात आहे. पण, महापालिकेकडून दखल घेतली जात नाही.

नागपुरात सिवेज लाईन, दुर्गंधीच्या तक्रारी सोशल मीडियावर; NMC कडून जनजागृती केव्हा होणार?
Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 5:00 AM

नागपूर : नागपूर महापालिकेत प्रशासक नियुक्ती झाली. माजी नगरसेवकही नॉट रिचेबल झालेत. सामान्य नागरिक सिवेज लाईन, कचरा गाडी, दुर्गंधी आदी किरकोळ समस्यांनी त्रस्त झाला आहे. महापालिकेने अद्यापही सामान्य नागरिकांसाठी टोल फ्री क्रमांक किंवा संपर्कासाठी अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक जाहीर केले नाहीत. त्यामुळं समस्येच्या तक्रारी कुठे करायच्या? याबाबत सामान्य नागरिक अजूनही अनभिज्ञ आहे. संतापलेल्या काही नागरिकांनी सोशल मीडियावर समस्या टाकून महापालिकेचे धिंडवडे काढणे सुरू केले आहे. माजी नगरसेवक समस्यांकडे लक्ष देत नाहीत. महापालिकेचे अधिकारीही ऐकत नाहीत. त्यामुळं प्रभागांमध्ये समस्यांचा डोंगर (Mountains of Problems in Wards) तयार होत आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर (Municipal Corporation Website) तक्रार करणे शक्य आहे. परंतु यासंदर्भात माहितीच नसल्याने सुशिक्षितांचीही परवड होत आहे. त्यामुळे नागरिकांनी वेब नागपूर या पोर्टलवर जाऊन त्यांची समस्या महापालिकेच्या संकेतस्थळावर करू शकतात, असे सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसे (Social Media Analyst Ajit Parse) यांनी सांगितले.

सोशल मीडियावर तक्रार कुठे कराल?

अजित पारसे यांनी तयार केलेल्या www.webnagpur.com या संकेतस्थळाचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मागील वर्षी लोकार्पण करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर महापालिका तक्रार यावर क्लिक करून नागपूरकरांना थेट दिवानखान्यातूनच तक्रार नोंदविता येते. सद्यस्थितीत नागरिकांसाठी महापालिकेने तक्रार करण्यासाठी कुठलेही व्यासपीठ उपलब्ध करून दिले नाही. महापालिकेचे ॲप असले तरी त्याबाबत जनजागृतीही केली नाही. प्रशासक नियुक्तीनंतर माजी नगरसेवकांनीही प्रभागातील समस्यांबाबत हात वर केले आहेत. अनेकदा समस्येबाबत फोन केल्यानंतरही माजी नगरसेवक प्रतिसाद देत नाही. अशावेळी नागरिक झोन कार्यालयात समस्या घेऊन जातात. परंतु अधिकारी त्यांना टाळतात किंवा एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर फिरायला लावत आहेत.

ऑनलाईन सुविधा कोणकोणत्या

महापालिकेसंदर्भात वेबनागपूर या निःशुल्क असलेल्या पोर्टलवर जाऊन महापालिका तक्रार यावर क्लिक केल्यास मनपाच्या संकेतस्थळावरू जाऊन तक्रार नोंदविता येते. तक्रार नोंदविल्यानंतर त्याचा क्रमांक मिळतो. याच मनपाच्या संकेतस्थळावरून तक्रारीचा निपटारा झाला अथवा नाही, याबाबतही कळते. केवळ महापालिकाच नव्हे तर जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित सातबारा काढणे. पाहणे, आधार कार्ड डाऊनलोड करणे, अपडेट करण्यासोबत बऱ्याच सुविधा वेबनागपूरवर आहेत, असे अजित पारसे यांनी कळविले.

Nagpur | अर्धवट जळलेल्या तरुणीच्या मृतदेहाचं गूढ उकललं! आत्महत्या केल्याचं उघड, का दिला जीव?

Wardha Accident | नादुरूस्त टिप्परवर धडकली Travels; एक ठार, तीन गंभीर

विदर्भातील 11 प्रमुख नद्यांच्या पाण्याचे कलश, नागपुरात 22 मार्चपर्यंत जलजागृती

Non Stop LIVE Update
सगळ्यात जास्त बुद्धीची गरज कुणाला? नितेश राणे यांनी थेटच सांगितलं...
सगळ्यात जास्त बुद्धीची गरज कुणाला? नितेश राणे यांनी थेटच सांगितलं...
फडणवीसांनी घेतलं टीव्ही ९ च्या बाप्पाचे दर्शन, काय मागितलं मागणं?
फडणवीसांनी घेतलं टीव्ही ९ च्या बाप्पाचे दर्शन, काय मागितलं मागणं?
अजित दादा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? कुणी केलं सूचक वक्तव्य?
अजित दादा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? कुणी केलं सूचक वक्तव्य?
OBC आंदोलनासंदर्भात वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय चर्चा ?
OBC आंदोलनासंदर्भात वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय चर्चा ?
चौपाट्यांवर आलेत स्ट्रिंग रे अन् जेलीफिश; महापालिकेचं आवाहन काय?
चौपाट्यांवर आलेत स्ट्रिंग रे अन् जेलीफिश; महापालिकेचं आवाहन काय?
लालपरी, बस स्थानक अस्वच्छ दिसल्यास आगारप्रमुखांवरच कारवाई, किती दंड?
लालपरी, बस स्थानक अस्वच्छ दिसल्यास आगारप्रमुखांवरच कारवाई, किती दंड?
'त्या' फोटोवरून प्रफुल्ल पटेल यांना शरद पवार यांचा सवाल, म्हणाले...
'त्या' फोटोवरून प्रफुल्ल पटेल यांना शरद पवार यांचा सवाल, म्हणाले...
ऑनलाईन गेमच्या नादात गमावले तब्बल ५८ कोटी, बघा नेमकं काय घडलं?
ऑनलाईन गेमच्या नादात गमावले तब्बल ५८ कोटी, बघा नेमकं काय घडलं?
बावनकुळे यांचा भाजपच्या नव्या कार्यकारिणी थेट इशारा, 'तर राजीनामा घेऊ'
बावनकुळे यांचा भाजपच्या नव्या कार्यकारिणी थेट इशारा, 'तर राजीनामा घेऊ'
रामदास कदमांचा नाव न घेता इशारा, 'राजकीयदृष्ट्या स्मशानात जावं लागणार'
रामदास कदमांचा नाव न घेता इशारा, 'राजकीयदृष्ट्या स्मशानात जावं लागणार'