अमरावतीत शिवसेनेचा चक्क एमआयएमला पाठिंबा; नव्या भूमिकेने खळबळ!

असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमला संकट समजणाऱ्या शिवसेनेने चक्क अमरावती महापालिकेच्या स्थायी समितीत पाठिंबा दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (Shiv Sena Enters Into Alliance With AIMIM For Amravati Municipal Corporation Committee Polls)

अमरावतीत शिवसेनेचा चक्क एमआयएमला पाठिंबा; नव्या भूमिकेने खळबळ!
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Mar 14, 2021 | 10:45 AM

अमरावती: असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमला संकट समजणाऱ्या शिवसेनेने चक्क अमरावती महापालिकेच्या स्थायी समितीत पाठिंबा दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेसने एमआयएमला थेट तर मायावतींच्या बीएसपीने अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याने खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या या नव्या भूमिकेवर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. (Shiv Sena Enters Into Alliance With AIMIM For Amravati Municipal Corporation Committee Polls)

अमरावती महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत भाजपाचे शिरीष रासने यांनी बाजी मारली. या निवडणुकीत रासने यांना 9 मते मिळाली तर एमआयएमचे अफजल हुसेन मुबारक हुसेन यांना 6 मते मिळाली. त्यामुळे महापालिकेच्या चाव्या भाजपच्या हाती आल्या आहेत. मात्र, या निवडणुकीत शिवसेनेने एमआयएमला पाठिंबा दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व सोडल्याची टीकाही होत आहे.

बसपाची साथ भाजपला?

भाजपने स्थायी समिती सभापतीसाठी शिरीष रासने यांचे नाव जाहीर केल्यानंतर भाजपचे दोन सदस्य नाराज झाले होते. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवावं यासाठी काँग्रेस, शिवसेना, एमआयएम व बीएसपी यांनी एकत्र येण्याचं ठरवलं. मात्र ऐनवेळी बसपाचे गटनेते चेतन पवार हे निवडणुकीत गैरहजर राहिले. यामुळे विरोधकांचे संख्याबळ कमी झालं. बीएसपीचे गटनेते चेतन पवार जर काँग्रेस शिवसेना एमआयएमच्या बाजूने उभे राहिले असते तर भाजपाचे 2 नाराज सदस्य गैरहजर राहणार होते. अशा परिस्थितीत ईश्वर चिठ्ठीने ही निवडणूक पार पडली असती. मात्र ऐन वेळी बीएसपीचे चेतन पवार गैरहजर राहिल्याने एमआयएमच्या वतीने अफजल हुसेन मुबारक हुसेन यांना स्थायी समिती सभापती पदासाठी उभे करण्यात आले. भाजपला रोखण्यासाठी एमआयएमच्या सदस्याला हिंदुत्ववादी समजल्या जाणाऱ्या शिवसेनेने पाठिंबा दिला तर धर्मनिरपेक्ष समजल्या जाणाऱ्या बहुजन समाज पक्षाने निवडणुकीत गैरहजर राहून अप्रत्यक्षपणे भाजपला मदत केली. आमदार रवी रणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या एका सदस्याने भाजपच्या रासने यांना पाठिंबा दिला. त्यामुळे रासने यांचा विजय सोपा झाला.

शिवसेनेने हिंदुत्व सोडलं

स्थायी समिती सभापती निवडणुकीत शिवसेनेने एमआयएम सोबत युती केली असून शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याचा प्रत्यय दिला आहे, असा दावा भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केला आहे. शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर जोपासलेलं हिंदुत्व शिवसेनेने सत्तेच्या लाचारीसाठी सोडलं आहे. याची प्रचिती अमरावतीत पुन्हा पाहायला मिळाली आहे, अशी टीकाही त्यांनी केली. अमरावती महानगरपालिका स्थायी समितीत एकूण 16 सदस्यांपैकी 8 भाजप, 1 युवा स्वाभिमान पार्टी असे एकूण 9 सदस्य आहेत. तर विरोधात काँग्रेसचे 3, एमआयएम 2, शिवसेना1, बसपा 1 असे 7 सदस्य आहेत. स्थायी समिती निवडणुकीत भाजपकडून सचिन रासने तर विरोधात एमआयएमचे अफजल हुसेन मुबारक हुसेन या दोघात लढत झाली. (Shiv Sena Enters Into Alliance With AIMIM For Amravati Municipal Corporation Committee Polls)

अमरावती महानगरपालिकेत पक्षीय बलाबल

भाजपा 8 युवा स्वाभिमान- 1 काँग्रेस – 3 एमआयएम- 2 शिवसेना -1 बीएसपी -1

संबंधित बातम्या:

सचिन वाझेंनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्लॉट केली; NIA चा आरोप

सचिन वाझेंच्या चौकशीवेळी NIAच्या हाती सबळ पुरावा? ठाण्यातील ‘त्या’ नेत्याची चौकशी होण्याची शक्यता

सचिन वाझेंची नार्को टेस्ट करा; अन्यथा ठाकरे सरकारचा खरा चेहरा समोर येईल: राम कदम

(Shiv Sena Enters Into Alliance With AIMIM For Amravati Municipal Corporation Committee Polls)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.