संजय राऊतांना खोटं बोलण्याचं व्यसन, त्यांच्या बोलण्यात ‘तेवढंच’ सत्य; भाजप नेत्याचा पलटवार
Sudhir Mungantiwar on Sanjay Raut Statement About BJP Nitin Gadkari : संजय राऊत यांनी नितीन गडकरी आणि भाजपविषयी एक विधान केलं. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्या वक्तव्याला भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलंय. वाचा...

सामनाच्या आजच्या ‘रोखठोक’ सदरात एक वक्तव्य केलं आणि त्याची राज्याच्या राजकारणात चर्चा होतेय. संजय राऊतांच्या वक्तव्यावर भाजप नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. भाजप नेते प्रविण दरेकर आणि सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊतांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार करण्यासाठी संजय राऊत यांनी प्रयत्न केले. हे जेवढं सत्य आहे. हे तेवढंच संजय राऊतांनी नितीन गडकरींबाबत केलेल्या विधानात सत्य आहे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणालेत. नितीन गडकरी यांच्या पराभवासाठी पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न केले. गडकरींच्या पराभवासाठी फडणवीसांनी रसद पुरवली असं संघाचे लोक सांगतात, असं विधान संजय राऊत यांनी केलं. त्याला आता भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर दिलंय.
मुनगंटीवार काय म्हणाले?
संजय राऊतांची खोट बोलण्याची सवय व्यवसानात रुपांतरीत झाली आहे. नितीन गडकरींच्या पाठिशी मोदी, शाह आहेत. म्हणूनच ते विकास करू शकले. संजय राऊतांचा आरोप निराधार आहे. वर्तमानपत्रात बातमी यावी म्हणून आरोप करतात आरोपांना तथ्य नाही. उद्धवजींना इंडिया आघाडीच्या मोठ्या नेत्यांनी बोलवलं पण उद्धवजींना बाहेर कुणी बोलवलं का?, असा सवालही सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला आहे.
प्रविण दरेकरांचं प्रत्युत्तर
4 जूननंतर संजय राऊत यांचे थोबाड फुटलेलं दिसेल. योगी आदित्यनाथ यांनी देशाची गरज मोदी आहे. देशाच्या भविष्यासाठी मोदींची गरज आहे. हे जाहीर सभांमधून अनेकदा ठणकावून सांगितलं आहे. मोदी-योगी असे चित्र उभे करू नका. संजय राऊत आपल्या पक्षाची, घराची काळजी करा. हा देश, आमचा पक्ष मोदींच्या नेतृत्वाखाली चालेल हे सर्वश्रुत आहे. संजय राऊत भ्रमिष्ठ झालेत म्हणून अशा प्रकारचे शोधून शोधून काही काढून प्रसिद्धीत राहण्याचा आणि नौटंकी करण्याचा प्रयत्न करताहेत, अशा शब्दात प्रविण दरेकरांनी संजय राऊतांवर पलटवार केलाय.
सामन्याच्या दाव्याला आम्ही काडीमात्र किंमत देत नाही. गडकरी त्यांच्याबाबतीतले वक्तव्य म्हणजे संजय राऊत यांचा मूर्खपणाचा कळस आहे. प्रचारात राज्यभर व्यस्त असतानाही देवेंद्रजींनी आणखी विजय भक्कम व्हावा यासाठी काय योगदान दिलेय हे नागपूरवासियांना माहित आहे. संजय राऊत यांचे दुटप्पी बोलणे आहे. अगोदर बोलायचे विरोधात रसद पुरवली, नंतर बोलायचे प्रचारात उतरले. संजय राऊत नेमके टीका करतानाही काय नेमके हे निश्चित करून घ्या, असंही प्रविण दरेकर म्हणाले.
