Nagpur Temperature | पारा भडकल्याने आरोग्य सांभाळा, मनपाने सांगितले कशी घ्यायची काळजी

विदर्भात बहुतेक सर्व ठिकाणी तापमानाने चाळीशी पार केली. त्यामुळं उन्हापासून संरक्षण करणे गरजेचे झाले आहे. नागपुरात पारा 40.9 डिग्री सेल्सिअसवर पोहचला. त्यामुळं मनपाच्या आरोग्य विभागाने काळजी कशी घ्यावी, याच्या काही सूचना केलेल्या आहेत.

Nagpur Temperature | पारा भडकल्याने आरोग्य सांभाळा, मनपाने सांगितले कशी घ्यायची काळजी
राज्यात उष्णतेमध्ये कमालीची वाढImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 5:00 AM

नागपूर : नागपूर शहरातील तापमानात (Nagpur City Temperature) वाढ होऊ लागली आहे. नागपुरात तापमान 40.9 डिग्री सेल्सिअस होते. आठवडाभर आता येवढेच तापमान राहण्याची शक्यता हवामान विभागानं (Meteorological Department) व्यक्त केली आहे. अकोल्यात तापमान 42.9 डिग्री सेल्सीअसवर पोहचले. अमरावतीत 41 डिग्री सेल्सिअस तापमान पोहचले. चंद्रपुरात 40.6 डिग्री सेल्सिअस तापमान होते. वाढत्या उन्हामुळे उष्माघातासारख्या गंभीर आजारांचा धोका संभावतो. उष्णतेच्या लाटेपासून होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर निघणे शक्यतो टाळा. उन्हाच्या वेळेत बाहेर फिरणे टाळा. भरपूर पाणी प्या, स्वत:सह इतरांच्याही तब्येतीची काळजी घ्या, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे (Municipal Health Department) करण्यात आले आहे.

मनपाच्या आरोग्य विभागाचे आवाहन

उष्माघात टाळण्यासाठी मनपातर्फे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार, भरपूर पाणी पिणे, हलकी, पातळ व सच्छिद्र कपडे वापरावे. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री किंवा हॅट, बूट किंवा चप्पलचा वापर करावा. प्रवासादरम्यान पाण्याची बाटली सोबत ठेवणे आवश्यक आहे. उन्हात काम करताना हॅट किंवा छत्रीचा वापर करावा. ओल्या कपड्यांनी डोके, मान, चेहरा झाकावे. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ.आर.एस., लिंबूपाणी, ताक आदी पेय नियमित प्यावे. घर थंड ठेवण्यासाठी ओलसर पडदे, पंखा, कुलर आदींचा वापर करण्यात यावा, असेही आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

अशी घ्या काळजी

उष्माघात टाळण्यासाठी उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे. उन्हात कष्टाची कामे करू नका. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नका. गडद, घट्ट व जाड कपडे परिधान करणे टाळावेत. उन्हात स्वयंपाक करणे टाळा. स्वयंपाक करताना स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवा. मद्य, चहा, कॉफी, सॉफ्टड्रिंक्स ही पेय टाळा. शिळे आणि उच्च प्रथिने असलेले अन्न खाणे टाळा, असेही आवाहन आरोग्य विभागाद्वारे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बहिरवार आणि सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी यांनी केले आहे.

Yavatmal Crime | बनावट दारू बनविणाऱ्या कारखान्यावर धाड, 5 लाख रुपयांचे साहित्य जप्त

Video – नागपूरच्या सुदाम टॉकीजबाहेर नारेबाजी, BJP युवा मोर्च्याने जय श्री रामचे लावले नारे

photo – वाशिममध्ये दोन मोटारसायकल समोरासमोर भिडल्या, अपघातात शिक्षक ठार, दोन जण गंभीर 

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.