भरती न केल्याचा आरोप, रुग्णालयाच्या प्रतीक्षालयातच महिलेची प्रसुती, मृत बाळाच्या जन्माने हळहळ

नागपूरच्या डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात एक मलहिला प्रसुतीसाठी आली होती. या महिलेची प्रसुती रुग्णालयाच्या प्रतीक्षालयात अर्थात वेटिंगरुममध्येच झाली. महिलेने मृत बाळाला जन्म दिल्याचं सांगण्यात येत आहे.

भरती न केल्याचा आरोप, रुग्णालयाच्या प्रतीक्षालयातच महिलेची प्रसुती, मृत बाळाच्या जन्माने हळहळ
Nagpur Daga hospital

नागपूर : नागपूरच्या डागा स्मृती शासकीय रुग्णालयात धक्कादायक घटना घडली. डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयाच्या वॉर्डात महिलेची जमिनीवर प्रसुती झाली. डॉक्टर आणि परिचारिकांना विनंती करुनही भरती न केल्यानं, रुग्णालयाच्या प्रतीक्षालयातच महिलेची प्रसुती झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.  महिलेने मृत बाळाला जन्म दिला. मात्र विनंती करूनही भरती न केल्यानं रुग्णालयाचा हलगर्जीपणा याला कारणीभूत आहे, असा दावा नातेवाईकांनी केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

नागपूरच्या डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात एक मलहिला प्रसुतीसाठी आली होती. या महिलेची प्रसुती रुग्णालयाच्या प्रतीक्षालयात अर्थात वेटिंगरुममध्येच झाली. महिलेने मृत बाळाला जन्म दिल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र या महिलेच्या नातेवाईकांनी केलेला आरोप धक्कादायक आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या महिलेला अॅडमिट करण्यासाठी क्टर आणि परिचारिकांना विनंती केली. मात्र त्यांनी रुग्णालयात दाखलच करुन घेतलं नाही.

महिलेला प्रसवकळा इतक्या होत्या की, तिची प्रसुती प्रतीक्षालयातच झाली. यावेळी बाळही मृतच जन्माला आल्यामुळे नातेवाईकांच्या संतापाचा कडेलोट झाला. त्यांनी रुग्णालयाला धारेवर धरलं. महिलेला दाखल करुन न घेतल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. इतकंच नाही तर नातेवाईकांनी पोलिसातही तक्रार दाखल केली. रुग्णायलयातील हा संपूर्ण प्रकार नातेवाईकांनी आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आहे.

रुग्णालयाचं स्पष्टीकरण

दरम्यान, याप्रकरणी रुग्णालयानेही स्पष्टीकरण दिलं आहे. कुटुंबीयांनी कामकाजात हस्तक्षेप केला, महिला रुग्णालयात उशिरा आली, बाळ अपुऱ्या दिवसाचे होते, त्यामुळं बाळाचा मृत्यू झाल्याचं रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे. दरम्यान, रुग्णालय प्रशासनानेही महिलेच्या नातेवाईकांविरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे.

संबंधित बातम्या 

मुंबईत विवाहितेवर बलात्कार, व्हिडीओ शूट करुन पतीला पाठवला, पतीने व्हायरल केला

पालकमंत्र्यांचा नागपूर लॉकडाऊनचा इशारा, व्यापारी संतापले, म्हणाले, ‘जरा थांबा, आत्मघातकी निर्णय घेऊ नका’

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI