AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकाच घरात दोन-तीन पक्षांची मंडळी आहेत, नाना पाटेकर यांची टीका

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या बायकोला चेक देण्याची वेळ येते. यासारखी दुर्दैवी बाब नाही.

एकाच घरात दोन-तीन पक्षांची मंडळी आहेत, नाना पाटेकर यांची टीका
नाना पाटेकर
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Dec 02, 2022 | 8:03 PM
Share

नागपूर – एकाच घरात दोन-तीन पक्षांचे लोकं आहेत. असं असेल तर सोडून द्या राजकारणातून बाहेर पडा, असा सल्ला अभिनेता नाना पाटेकर यांनी दिला. नागपुरात ते बोलत होते. एकमेकांना आपण सांभाळणार आहोत. हे कधी कळणार आपल्याला, असा सवालही त्यांनी केला. पुन्हा पुन्हा त्याच चक्रव्युव्हार का जातोय. एखादा अधिकारी भ्रष्ट अधिकारी असेल. सगळे मिळून का बोलत नाहीत. तो एक असतो. तुम्ही सगळे आहात. सगळे मिळून त्याच्याविरोधात बोला, असंही पाटेकर म्हणाले. एकत्र व्हा. आपल्यामध्येच राज्यकर्त्यांनी आपल्यामध्ये भींती बांधून टाकल्या आहेत. त्या तोडा. मग, हे सर्व सगळं संपेल. धर्म, जात कधी पाहिली नाही. अभिनेता म्हणून माझा चित्रपट पाहिला जातो. आवडला तर बघतात अन्यथा नाही, असंही त्यांनी सांगितलं.

नाना पाटेकर म्हणाले, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या बायकोला चेक देण्याची वेळ येते. यासारखी दुर्दैवी बाब नाही. हा स्वागत समारंभ असू शकत नाही. प्रत्येकानं यामध्ये आपला सहभाग दिला पाहिजे.

मला माझ्या वैयक्तिक पातळीवर शेतकऱ्यांसाठी काय करता येईल. याचा प्रयत्न करतो. सरकार त्यांच्या पातळीवर काम करतं. प्रत्येकवेळी सरकारवर अवलंबून असणं योग्य नाही. आपण काय करू शकतो, हे महत्त्वाचं आहे. कोकण, पुण्यात पाऊस आल्यानंतर सगळ्या मोहोर गळून पडतो. कुठलं पीक घेतलं तर शेतकऱ्याला फायदा होईल, याचा विचार केला पाहिजे. असा प्रयोग केला होता, याची आठवण त्यांनी करून दिली.

शेतकऱ्याला तीन हजारांऐवजी एकरी तीन लाख रुपये मिळाले पाहिजे. शेतकऱ्याला हमी देता आली पाहिजे. शासकीय दृष्टीकोनातून विचार करावा. पुढं येऊन काम करणारी माणसं हवीत.

शेतकऱ्यानी पारंपरिक पद्धतीनं शेती करून नये. पद्धत बदलली पाहिजे. लोकसंख्या वाढली. जमीन तेवढीच आहे. सगळं तेच आहे. माणसं वाढली. पण, आपण सर्व एक दिवस जाणार आहोत. इतिहासात नोंद व्हायला पाहिजे, असं नाही. समाधान नावाची गोष्ट हवी. प्रत्येक गोष्टीला पुरस्कार कशाला हवा, असा टोलाही नाना पाटेकर यांनी लगावला.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?