नारीशक्तीचा जागर… महिलांच्या लेखणीतून उतरलेला आगळावेगळा दिवाळी अंक

दिवाळी निमित्ताने बाजारात अनेक दिवाळी अंक आले आहेत. मात्र, याही पेक्षा सर्वात हटके असलेल्या 'ती चं पान' या दिवाळी अंकाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. हटके विषय आणि आकर्षक मांडणीमुळे वाचकांच्या पसंतीला उतरलेला हा दिवाळी अंक येत्या 14 नोव्हेंबर रोजी प्रकाशित होणार आहे. या दिवाळी अंकाचं ऑनलाईन प्रकाशन होणार असून त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हा अंक आणखी एका वेगळ्या कारणाने खास ठरलाय...

नारीशक्तीचा जागर... महिलांच्या लेखणीतून उतरलेला आगळावेगळा दिवाळी अंक
diwali ankImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 11, 2023 | 4:59 PM

नागपूर | 11 नोव्हेंबर 2023 : दिवाळीचा उत्सव प्रचंड जल्लोषात सुरू आहे. प्रत्येकजण दिवाळीचा आनंद आपआपल्या पद्धतीने लुटताना दिसत आहे. दिवाळी निमित्ताने अजूनही खरेदी केली जात आहे. लोक एकमेकांना भेटवस्तू देऊन त्यांचं स्वागत करत आहेत. दिवाळी म्हटल्यावर जशी दिव्यांची रोषणाई, सुंदर रांगोळ्या आणि फराळाची रेलचेल असते तशीच लेखक, कवी आणि वाचकांना उत्सुकता असते ती दिवाळी अंकाची. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवाळी अंक बाजारात आले आहेत. वेगवेगळ्या विषयांना वाहिलेले हे दिवाळी अंक आहे. त्यातील एका दिवाळी अंकाची सर्वांनाच उत्सुकता आहे. खास महिलांनी तयार केलेला हा दिवाळी अंक आहे.

‘ती’ चं पान’ असं या दिवाळी अंकाचं नाव आहे. सायली अक्षय देशपांडे आणि अक्षय देशपांडे यांनी हा दिवाळी अंक तयार केला आहे. विशेष म्हणजे महिलांनीच हा दिवाळी अंक तयार केला असून महिलांनीच या दिवाळी अंकात लिखाण केलं आहे. येत्या 14 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी ती चं पान या दिवाळी अंकाचे ऑनलाइन प्रकाशन होईल.

या दिवाळी अंकाचे प्रकाशन अजिता देशमुख यांच्या हस्ते होईल. तर या प्रकाशन सोहळ्याचे निवेदन प्राजक्ता बर्वे करणार आहेत. पाहुण्यांचा परिचय डॉ. मानसी मोहरील करतील. तर आभार प्रदर्शनाची जबाबदारी पल्लवी शिंदे माने यांच्यावर असणार आहे. या दिवाळी अंकाच्या संपादिका सायली अक्षय देशपांडे असून अक्षय देशपांडे हे संचालक आहेत. अतिथी संपादक म्हणून सुषमा देशपांडे- मुलमुले यांनी दिवाळी अंकाचं काम पाहिलंय. अनेक कथा आणि विविध लेखांनी सजलेला हा दिवाळी अंक नक्कीच वाचकांना आवडेल असा विश्वास सायली देशपांडे यांनी व्यक्त केला.

17 लेखिकांचे लेख

या दिवाळी अंकात एकूण 17 लेखिकांचे लेख असून हा खऱ्या अर्थाने नारीशक्तीचा जागर आहे. या दिवाळीअंकात सायली देशपांडे, पल्लवी शिंदे माने, प्राजक्ता बर्वे, मृण्मयी सारंग, मानसी मोहरील, तनुजा पत्की, अपूर्वा भालेराव, जयश्री दाणी, वर्षा पटके, सोनाली गायकवाड, रेणुका देशपांडे, संध्या दुर्गे, डॉ. स्वाती धर्माधिकारी, डॉ. सुरुची डबीर, मैथिली अंजानकर, स्नेहा जोशी, सना पंडित आदी लेखिकांनी लेख लिहिले आहेत. या लेखिका पुणे, मुंबई, अहमदनगर, नागपूर, नेदरलँड आणि अमेरिकेतील डेनवर येथील राहणाऱ्या आहेत.

दर महिन्याला अंक

ती चं पान हे मासिक आहे. दर महिन्याला त्याचे ऑनलाईन प्रकाशन होत असतं. तर दरवर्षी मार्चमध्ये ती चं पान या मासिकाचा वार्षिक अंक काढला जातो. तो प्रिंट स्वरुपात मिळतो. आजवर ती चं पान चे दोन वार्षिक अंक प्रकाशित झाले आहेत. पहिला वार्षिक अंक नागपुरातील ज्येष्ठ स्त्री साहित्यिक आशा पांडे आणि डॉ. प्रज्ञा आपटे यांच्या हस्ते प्रकाशित झाला.

दुसरा वार्षिक अंक सुप्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहर आणि सुप्रसिद्ध गीतकार गुरू ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशित झाला. सुरुवातीच्या काळात यात लिहिणाऱ्या लेखिकांची संख्या 9 होती. पण गेल्या 2 वर्षात 25 लिहिते हात अंकाला जोडल्या गेले आहेत. दिवाळी अंक आणि वार्षिक अंक हे दोन अंक सगळ्या वयोगटातील लेखक लेखिकांसाठी मुक्त असतात.

अशी सूचली कल्पना

कोरोनाच्या काळात लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्यामुळे अनेक लोक घरात अडकले होते. लॉकडाऊन कधी बंद होईल याची कुणाला काहीच माहिती नव्हती. त्यामुळे अनेक लोक घरात बसून त्रस्त झाले होते. त्यामुळे सायली आणि अक्षय यांना फक्त महिलांचा दिवाळी अंक सुरू करण्याची कल्पना सूचली. नवोदितांना लिहिण्यास उद्युक्त करण्यासाठी हा ती चं पान सुरू करण्याचं ठरलं.

त्यानंतर 8 मार्च 2021 रोजी महिला दिनाचं औचित्य साधून पहिला अंक काढला गेला. तेव्हापासून सुरू झालेला हा प्रवास अजून सुरू आहे. कसदार साहित्य, वेगळे विषय, आकर्षक मांडणी, चांगला लेआऊट, आणि वाचकांची मिळालेली पसंती यामुळे या अंकाला प्रचंड मागणी असते.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.